How to fill property tax Online:नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया काय घ्या जाणून? संपूर्ण माहिती !

How to fill property tax Online मालमत्ता कर/Property Tax  म्हणजे स्थानिक सरकार किंवा नगरपालिका यांच्याद्वारे आकारला जाणारा कर, जो मालमत्तेच्या मालकांना त्यांच्या अचल मालमत्तेवर भरावा लागतो. हा कर विविध कारणांसाठी भरला जातो.

मालमत्ता कराचे महत्त्व काय आहे ते जाणून घेवूयात, करामुळे स्थानिक विकास, सामाजिक सेवांचा वित्तपुरवठा, गुणवत्ता सुधारणा, ग्राम पंचायत किंवा नगरपालिकासाठी स्थिर उत्पन्न अशा अनेक गोष्टींसाठी कर हा आवशयक असतो.

मालमत्तेचे मालक होण्यासाठी एकत्रित रक्कम भरली जाते, परंतु त्या मालमत्तेवर त्यांची मालकी कायम राखण्यासाठी मालमत्ता कर (Property Tax) हा नियमितपणे भरावा लागतो. भारतात मालमत्ता कर हा विकासासाठी आणि नागरी संस्थांच्या उत्पन्नाकरिता महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. अचल मालमत्ता ज्याकडे आहे अशा प्रत्येक जनाला हा मालमत्ता कर भरणे बंधनकारक आहे.

मालमत्ता कर हा स्थानिक संस्थांच्याद्वारे (उदा.नगरपालिका) आकारला जातो आणि हा कर प्रत्येक ठिकाणासाठी विभिन्न असू शकतो. विविध अशा घटकांचा विचार करून मालमत्ता कराची रक्कम निश्चित करण्यात येते. या लेखात आपण नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचा मालमत्ता कर ऑनलाइन कसा भरायचा, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया | How to fill property tax Online

How to fill property tax Online

1. स्थानिक नगरपालिकेची वेबसाइट https://mahaulb.in/MahaULB/index – नगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा, तिथे मालमत्ता कर भरण्याची माहिती तुम्हाला मिळेल.

2. तिथे तुमची  नोंदणी करा- जर तुम्ही पहिल्यांदा कर भरणार असाल, तर प्रथम तुम्हाला वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल, व तिथे आवश्यक माहिती भरा.

3. मालमत्ता माहिती भरा – तुम्हाला तुमच्या मालमत्तेची माहिती, जसे की पत्ता, क्षेत्रफळ, आणि मालकाचे नाव अशी सर्व माहिती भरणे आवश्यक असेल.

4. कराची रक्कम – नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला भरावयाच्या कराची रक्कम तुमच्यासमोर दिसेल.

5. भरणा पद्धती निवडा – तुम्ही क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड, नेट बँकिंग, किंवा ई-वॉलेटद्वारे ज्याद्वारे तुम्हाला भरणा करायचा आहे त्याद्वारे तुम्ही भरणा करू शकतात.

6. भरणा भरा- आवश्यक ती माहिती भरा आणि भरणा प्रक्रियेस सुरुवात करा. एकदा भरणा झाला की तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल.

7. कन्फर्मेशन जतन करा – भरणा भरून झाल्यानंतर, मिळालेल्या पावतीचे प्रमाणपत्र जपून ठेवा. याचा उपयोग भविष्यात तुम्हाला गरजेचा असू शकतो

मालमत्ता कर ऑनलाइन भरणे ही एक सोपी प्रक्रिया आहे, ज्यामुळे तुमचा वेळ वाचण्यास मदत होईल. आपल्या स्थानिक शासकीय संस्थेच्या वेबसाइटवरून तुम्ही हे काम सहजपणे करू शकणार आहात. यामुळे तुम्ही मालमत्तेच्या कराची रक्कम वेळेवर भरू शकता.

Property-Bill-Payment

तुमच्यासाठी खाली काही महत्वपूर्ण नगर परिषदेच्या लिंक्स देत आहोत.

मुंबई महापालिका (BMC): https://portal.mcgm.gov.in

पुणे महापालिका: https://www.pmc.gov.in

नागपूर महापालिका: https://www.nmcnagpur.gov.in

नाशिक महापालिका: https://www.nashikcorporation.in

ठाणे महापालिका: https://thanelive.com

सोलापूर महापालिका: http://www.solapurcorporation.gov.in

कल्याण-डोंबिवली महापालिका: http://kdmc.gov.in

Aurangabad महापालिका: https://www.aurangabad.gov.in

अकोला महापालिका: http://www.akolamc.gov.in

कोल्हापूर महापालिका: http://www.kolhapurcorporation.gov.in

निष्कर्ष | How to fill property tax Online

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली नगरपरिषद किंवा नगरपंचायतीचा प्रॉपर्टी टॅक्स ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया ! याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. How to fill property tax Online