how to apply for ladki bahin yojana:महत्वाचे अपडेट
नमस्कार मित्रांनो आज बघुयात पूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या लाडकी बहिणी या योजने बद्दलचे नवीन अपडेट.या
योजनेची घोषणा झाल्यापासूनच प्रत्येक सेतू कार्यालयात आणि ग्रामपंचायत कार्यालयात महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागल्या आहेत त्यावर पर्याय म्हणून आपल्या राज्य शासनाने या योजनेबाबत नवीन अपडेट आणले आहेत.
28 जून रोजी चे बजेट पास झाले आहेत आता त्यात सर्वात मोठी घोषणा करण्यात आली.महिलांना मिळणार महिन्याला १५००/- रुपये. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने या घोषणा केली आहे. ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे. त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. 1 जुलै 2024 पासुन या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनेच्या आहे लाडकी बहीण योजना.
या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा हे आपण या लेखामध्ये सविस्तरित्या जाणून घेऊयात तसेच योजनेमध्ये जे नवीन बदल घडविण्यात आलेली आहे त्याबद्दल देखील सविस्तर माहिती जाणून घेऊयात माझी वाचकास विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
आता बघुयात कोणत्या कोणत्या पात्रता शितल करण्यात आले आहेत[how to apply for ladki bahin yojana]
- यापूर्वी जो जीआर राज्य शासनाने प्रस्तुत केला होता त्यामध्ये डोमेसेल सर्टिफिकेट लागणार होते परंतु बऱ्याच लाभार्थी महिलांकडे डोमेसाईल नसल्या कारणामुळे अर्जदार महिलांकडे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र असेल तरीही ते ग्राह्य धरले जाईल.
- अजून एक महत्त्वाची अट शीथील करण्यात आली आहे जसे की महिलांना यापूर्वी पाच एकर जमीन असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता परंतु आत्ताच्या नवीन निर्णयानुसार पाच एकर किंवा त्यापेक्षा जमीन असणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा अर्ज करता येणार आहे.
- यापूर्वीच्या जीआरमध्ये महिलांचे वय 21 ते 60 वर्षे असेल तरच या योजनेचा फायदा घेता येणार होता परंतु आत्ताच आलेल्या नवीन निर्णयानुसार वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
- महिलेला तिच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार होता परंतु सर्वच महिलां.कडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्या कारणामुळे आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील ग्राह्य धरले जाणार आहे
- या योजनेचा ला 25 जुलै पर्यंत घेता येणार होता परंतु आता त्यात वाढ होऊन 31 ऑगस्ट पर्यंत महिला या योजनेचा अर्ज भरू शकतात.
how to apply for ladki bahin yojana(लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कसा करावा?)
step 1:
आपल्याला google play store ला जायचं आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
step २:
आता आपल्याला अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
step 3:
आता आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल,तो टाकायचा आहे.
step 4:
आता आपल्या समोर अर्ज उघडला जाईल,तो आपल्या ला भरायचा आहे.
step 5:
आता आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या वर क्लिक करायचे आहे.
step ६:
आता आपल्याला खालील सर्व कागदपत्रे उपलोड करायची आहेत.
1.आधार कार्ड
२.जन्म दाखला
3.उत्पन्न प्रमाणपत्र
4.अर्जदार हमीपत्र
हमी पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
file:///C:/Users/Dell/Downloads/Hamipatra.pdf
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली how to apply for ladki bahin yojana या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल हा लेख जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ग्रामपंचायत कार्यालय किंवा सेतूमध्ये जाऊन हा फॉर्म भरणे ऐवजी महिला घरबसल्या मोबाईल द्वारे हा या योजनेचा फायदा घेऊ शकतात व दर महिन्याला आपल्या अकाउंटला दीड हजार रुपये मिळूू शकतात.
FAQ :-
१. लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वर जाऊन नारी शक्ती हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे म्हणजेच या योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने करू शकतो.
२. लाडकी बहिण योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.maharashtra.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ आहे.
३.लाडकी बहिण योजने कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-ही योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू झालेली आहे.