how to apply caste certificate online-कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे?
कास्ट प्रमाणपत्र ही एक सर्वात महत्त्वाचे असे कागदपत्र आहे जे सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्था म्हणजे जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत लागणारे कागदपत्र अशी याची ख्याती आहे आणि सरकारच्या अनेक योजनांसाठी आवश्यक असते हे कास्ट सर्टिफिकेट. आजकाल हे प्रमाणपत्र ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सहज मिळवता येते. खाली दिलेल्या स्टेप्सनुसार तुम्ही कास्ट प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काढू शकता.
how to apply caste certificate online-कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे?-आवश्यक कागदपत्रे:
- आवेदन कर्त्याचा फोटो – पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
- रहिवासी पुरावा – रहिवासी पुराव्यामध्ये आधार कार्ड, वीज बिल, किंवा मतदार ओळखपत्र.
- आधारकार्ड – वैध असे ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आवश्यक असणार आहे.
- कास्ट सर्टिफिकेट पुरावा (जर उपलब्ध असेल तरच) – जर कुटुंबातील अन्य सदस्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याची प्रत तिथे अपलोड करावी.
- स्व-साक्षांकित प्रत – सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित (self-attested) प्रत अपलोड करा.
how to apply caste certificate online-कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे?-ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:
- ई-सेवा पोर्टल उघडा – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- नोंदणी करा किंवा लॉगिन करा – वेबसाईट पहिल्यांदा वापरत असल्यास ‘नवीन नोंदणी’ पर्याय निवडा आणि आवश्यक माहिती भरा. नोंदणी पूर्ण झाल्यावर लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर कास्ट प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करा.
- अर्जातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरून आणि त्याला लागणारी कागदपत्र तिथे अपलोड करा.
- आणि तुमचा अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर तुम्हाला जेवढी फीज आहे ती फीज तिथे पेड करा.
- तुम्ही भरलेला सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करून टाका.
how to apply caste certificate online-कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे?-अर्जाची स्थिती तपासा:
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ते,
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
या पोर्टलवर लॉगिन करून तपासू शकता. तुम्हाला तुमच्या अर्जाचा क्रमांक (Application ID) लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
कास्ट प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया किती कालावधीची आहे?
साधारणतः 15-30 दिवसांमध्ये तुमचे कास्ट प्रमाणपत्र तयार होते. ते तुम्हाला ई-मेल द्वारे पाठवले जाते किंवा तुम्ही ते थेट पोर्टलवरून डाउनलोड देखील करू शकता.
संपर्क:
जर तुम्हाला अर्ज करण्यामध्ये काही समस्या येत असतील तर तुम्ही स्थानिक तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा महाराष्ट्र सरकारच्या या मदत क्रमांकावर देखील (1800-120-8040) कॉल करू शकता.
कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे?
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली how to apply caste certificate online-कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे? या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१.कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवावे ?
उत्तर-यासाठी वरील लेख वाचा.
२. कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
३. कास्ट प्रमाणपत्र ऑनलाइन कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपण वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळ्या अधिकृत संकेतस्थळ वरून काढू शकतो.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.