E pik pahani yojna 2024 | ई पीक पाहणी योजना | E pik pahani Mobile aap

E pik pahani yojna 2024 | ई पीक पाहणी योजना २०२४,

या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनपासून इच्छा.

E pik pahani yojna 2024, नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये ई पीक पाहणी किंवा यालाच प्रधानमंत्री पिक विमा योजना या नावाने देखील ओळखले जाते या लेखात आम्ही तुम्हाला पीक पाहणी म्हणजे काय ती कुठे बघायची त्याचे फायदे काय या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय ही सर्व माहिती तुम्हाला या लेखात आम्ही देत आहोत कृपया हा लेख तुम्ही पूर्ण वाचावा व तुमच्या नातेवाईक आणि मित्र परिवारामध्ये कोणाला याबद्दल गरज असेल त्यांनाही तो तुम्ही शेअर करावा ही नम्र विनंती चला तर मग सुरु करूयात लेखाबद्दलच्या माहितीला, E pik pahani yojna 2024

शेतातील पिकांची नोंद सातबारावर घेण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्या मोबाईलच्या ॲपद्वारे फोटो काढून हा फोटो अपलोड करू शकतील या मोबाईल ॲप मध्ये अक्षांश व रेखांश नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही त्यात समजणार आहे तलाठ्यांकडून हा फोटो व स्थानाची पडताळणी होऊन त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर येणार आहे या प्रकल्पासाठी शासनाने टाटा ट्रस्ट बरोबर सामंजस्य करार केला आहे राज्यातील सहा तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जात असून आतापर्यंत 7 94 गावांमधील एक लाख 25 हजार शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲप द्वारे पिकांची नोंद केलेली आहे तसेच बारामती तालुक्यात 117 गावांमधील 33 हजार 554 शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईल ॲप द्वारे पिकांची नोंद केली आहे

गाव पातळीवर पीक पेरणी अहवालाचे खरोखर आणि वास्तववादी चित्र संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता यावी या दृष्टीकोनातून पिक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी व कृषी पतपुरवठा सुलभ करण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई त्यांना मिळावी या दृष्टीने आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या हेतूने पीक पेरणी बाबतची माहिती मोबाईल ॲप द्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा सरकार घेऊन आले आहे, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे तसेच यामुळे अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांना कामांमध्ये सुलभता निर्माण होईल अशी आशा कर्मचारी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. E pik pahani yojna 2024

ई पीक पाहणी योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { E pik pahani yojna 2024 Highlight’s }

E pik pahani yojna 2024
E pik pahani yojna 2024

ई पीक पाहणी योजना २०२४ {E pik pahani yojna 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो. E pik pahani yojna 2024

योजनेचे नाव
{Name Of the Scheme}
E pik pahani yojna 2024|ई पीक पाहणी योजना २०२४
कोणा व्दारा सुरु {Started By Whom}maharashtra Government
लाभार्थी {Beneficiary}महाराष्ट्रातील शेतकरी
योजनेचा उद्देश्य
{Purpose of the Scheme}
ई पीक नोंदणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे
विभाग
{Which Department}
Revenue Dept
अधिकृत ॲप {Authorized App}https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
ई पीक पाहणी योजना २०२४ E pik pahani online registration Guide PDF LINK https://cdn.s3waas.gov.in/s32b24d495052a8ce66358eb576b8912c8/uploads/2022/03/2022031516.pdf
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन {Online}

ई पीक पाहणी योजना २०२४|E pik pahani yojna 2024 या योजनेची उद्दिष्टे

  • ई पीक पाहणी योजना 2024 E pik pahani yojna 2024 या योजनेची उद्दिष्टे.
  • शेती क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण आणणे ई पीक नोंदणी ही आधुनिक तंत्रज्ञानाचा एक भाग आहे आणि तो शेतकऱ्यांमध्ये तसेच ग्रामीण भागात रुजवणे एक आधुनिकरणाची दिशा या योजनेमार्फत सरकार शेतकऱ्यांना देत आहे.
  • या ई पीक पाहणी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी व त्या जमिनीवरील पिकांचा एक डिजिटल डेटाबेस या मार्फत तयार केला जाईल.
  • सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत वाढवणे व तो तळागाळापर्यंत पोहोचवणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • ऑनलाइन नोंदणी मुळे पारदर्शकता वाढीस लावणे व सरकारी प्रणाली जास्तीत जास्त पारदर्शक बनवणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.

ई पीक पाहणी योजना २०२४|E pik pahani yojna 2024 या योजनेची पात्रता, नियम, अटी व शर्ती :-

ईपीक पाहणी या योजनेमध्ये E pik pahani yojna 2024 सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अटी शर्तींचे पालन करणे गरजेचे आहे.

  • यासाठी प्रथम अट अशी ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे. शेतकऱ्यांकडे त्यांच्या जमिनीचा सातबारा {७/१२} उतारा किंवा ८ अ असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आणि त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणारा स्मार्टफोन असावा.
  • शेतकऱ्यांनी इ पीक नोंदणी ॲप मोबाईलच्या ॲप स्टोअर वर जाऊन डाउनलोड करावे व त्याद्वारे स्वतःची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणी करताना शेतकऱ्यांनी त्यांची जमीन, पीक आणि इतर आवश्यक माहिती ॲप मध्ये भरावी.
  • शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क नोंदणीसाठी भरावे लागणार नाही.
  • त्यांनी स्वतःच्या जमिनीवरील पिकाची पाहणी करून त्याचे फोटो व माहिती ॲप मध्ये अपलोड करावीत.
  • पीक पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी जीपीएस असलेला स्मार्टफोन घेणे गरजेचे राहिल.
  • आणि शेवटचे शासन निर्धारित केलेल्या वेळेनुसार पीक पाहणी शेतकऱ्यांना करावी लागेल त्यानंतर शासनाचा एखादा अधिकारी किंवा तलाठी शेतकऱ्यांच्या जमिनीला भेट देऊन त्याची तपासणी करतील, त्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या तर शेतकऱ्यांना त्याबाबत तशा सूचना दिल्या जातील व आवश्यक स्पष्टीकरण मागवले जाईल.
  • तसेच ई पीक पाहणीची नोंदणी करताना तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे देखील तुम्ही जवळ असुद्या जसे की सातबारा उतारा 8अ आणि जर तुमच्याकडे तुमच्या जमिनीशी संबंधित माहिती तुमच्याकडे नसल्यास तुम्ही संबंधित तलाठ्यांकडून ती माहिती मिळवा.
  • आणि जर तुम्हाला ई पीक पाहणी ॲप वापरण्यास काही अडचण निर्माण झाल्यास त्या ॲप मध्ये हेल्प या पर्यायाचा तुम्ही वापर करू शकता.

ई पीक पाहणी योजना २०२४|E pik pahani yojna 2024 या योजनेच्या नोंदणीचे टप्पे खालील प्रमाणे आहेत :-

E pik pahani yojna 2024
E pik pahani yojna 2024

ई पीक पाहणी योजना २०२४ E pik pahani yojna 2024 ऑनलाईन कशी करावी त्याची टप्पे काय आणि कालावधी कसा असेल चला तर मग पाहूया. पीक नोंदणी केल्यानंतर तलाठी किंवा त्या संबंधित शासन अधिकारी तुमच्या जमिनीची प्रत्यक्ष पाहणी पाहणी करण्यासाठी क्षेत्रभेट देत असतात ते कसे पडताळणी करतील यासंबंधीची माहिती आम्ही तुम्हाला खाली देत आहोत.

  • {Sample Selection} सॅम्पल सिलेक्शन म्हणजे नमुना निवडणे सर्व नोंदणी धारकांची पडताळणी शक्य नसल्यामुळे स्थानिक पातळीवर अंदाजित पद्धती ने काही नोंदणीची निवड केली जाते.
  • {Intimation} इंटीमेशन म्हणजे सूचना देणे निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची पडताळणी होणार असल्याची पुरुष सूचना फोन मार्फत एसएमएस मार्फत किंवा संबंधित गावात जाहीरनामा करून दिली जाते.
  • तिसरी फील्ड व्हीजिट म्हणजे क्षेत्रभेट तलाठी किंवा सक्षम अधिकारी निवडलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रभेटीसाठी प्रत्यक्ष पिक पाहणी करण्यासाठी भेट देतात आणि शेतकऱ्यांनी ॲपद्वारे केलेल्या नोंदणी ची पडताळणी करतात.
  • आता नोंद अहवाल म्हणजे इन्स्पेक्शन रिपोर्ट क्षेत्रभेटीनंतर अधिकारी त्यांचे निरीक्षणे आणि निष्कर्ष नोंदवून अहवाल तयार करतात आणि असमानता जर आढळली तर केलेली माहिती आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये तफावत असेल तर शेतकऱ्यांना त्याबाबत तशी माहिती दिली जाते व सूचना दिल्या जातात व आवश्यक स्पष्टीकरण शेतकऱ्यांकडून मागवली जाते.
  • रजिस्ट्रेशन अपडेट म्हणजेच नोंदणी अद्यावत केली जाते पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना आवश्यक वाटल्यास शेतकऱ्यांची पिक पाहणी ते अद्यावत करतात.

कालावधी

ई पीक पाहणी योजना २०२४ E pik pahani yojna 2024 नोंदणीची पडताळणी प्रक्रिया वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे जसे की निवडलेल्या नोंदणीची संख्या, क्षेत्र किती आहे, शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याची काही सोय आहे का सामान्यतः ही प्रक्रिया नोंदणी केल्यापासून आठवडा ते महिना या कालावधी दरम्यान पूर्ण होऊ शकते.

E pik pahani yojna 2024
E pik pahani yojna 2024

ई पीक पाहणी योजना २०२४ फायदे|E pik pahani yojna 2024 Benefit’s :-

E Pik Pahani / ई-पीक पाहणी- 2024 या योजनेमुळे होणारे फायदे तर चला मग आता बघुयात.

  • शेतकरी निहाय पिकांच्या नोंदी घेतल्यामुळे पिक निश्चित लक्षात येईल.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळेल.
  • हमीभावानुसार सबसिडी मिळण्यास मदत होईल
  • ई पीक नोंदणीमुळे शेतकऱ्यांना आता तलाठ्यांच्या कार्यालयात त्यांची वाट बघत बसण्याची आवश्यकता नाही ते आता आपल्या घरात बसून आपल्या सोयीनुसार पिक नोंदणी करू शकतील.
  • पारंपरिक पद्धतीने नोंदणी करत असल्यामुळे वेळ खूप वाया जायचा आता इफेक्ट नोंदणीमुळे ही प्रक्रिया फार कमी वेळात होईल आणि शेतकऱ्यांचा वेळच वेळ वाचेल.
  • माहितीचे व्यवस्थापन ई पीक नोंदणी योजनेमुळे शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीवरील पिकांची माहिती एका डिजिटल फॉर्ममध्ये सेव राहील यामुळे शासनाला योजना चे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यास सोपे होईल.
  • सरकारला योजना राबवण्यासाठी व योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई पीक नोंदणी आवश्यक आहे.
  • नोंदणी प्रणाली ही ऑनलाईन असल्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता राखली जाईल नंदनी केलेले माहिती शेतकरी हे ऑनलाइन आपल्या घरी बसून पाहू शकतील त्यामुळे त्यांना कळू शकेल आपल्या पिकाची नोंद झाली आहे की नाही तसा ते त्यामुळे पाठपुरावा करू शकतील.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली ई पीक पाहणी योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. ई पीक पाहणी योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- Online अर्ज करावा

२. ई पीक पाहणी योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या द्वारे ऑनलाइन अर्ज करता येतो

३. ई पीक पाहणी योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर- महाराष्ट्र

४. ई पीक पाहणी योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- शेतकरी समाज

5. ई पीक पाहणी योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत, हमीभावानुसार सबसिडी, तलाठ्यांच्या कार्यालयात त्यांची वाट बघत बसण्याची आवश्यकता नाही .

6. ई पीक पाहणी योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?

उत्तर- ई पीक नोंदणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना. {Pm pik vima yojna 2024}


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. {Pm pik vima yojna 2024}