Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024|दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४

Table of Contents

Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024 (दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४)

आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.आपल्या देशांमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना आपले सरकार नेहमी राबवत असते .आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत जे अपंग आहेत,अशा अपंग शेतकऱ्यांना व दिव्यांग शेतकऱ्यांना आपला रोजच्या गरजा पूर्ण करणे देखील खूप अवघड होऊन जाते. आपले राज्य सरकार या दिव्यांग म्हणजेच अपंग लोकांसाठी विविध योजना नेहमी राबवत असते. या दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनविण्यासाठी आपले राज्य सरकार घेऊन आले आहे दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना या योजनेलाच हॉर्टिकल्चर योजना देखील म्हटले जाते.

या योजने अंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना फळ बागा लावण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज दिले जाते या योजनेच्या नावा प्रमाणेच ही खरोखर दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना ठरणार आहे. या योजने अंतर्गत शेतकरी विविध फळांचे, फुलांचे तसेच भाजीपाल्याचे उत्पादन करू शकतात. काही शेतकरी पूर्वीपासून या व्यवसायात असतील तर आपला व्यवसाय सुधर होण्यासाठी देखील त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. वित्त आणि विकास महामंडळ या विभागातर्फे महाराष्ट्रात ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा फॉर्म आपल्या शेतकरी बांधवांना ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024|दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४- , या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024
How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावDivyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024 (दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील दिव्यांग शेतकरी
योजने मार्फत काय लाभ होणार आहे१० लाख पर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024 (दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर०२२- २६५९१६२० / २६५९१६२२

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024):-

  • दिव्यांग शेतकऱ्यांना अतिशय कमी व्याजादरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे हा आपल्या सरकारचा या योजने मागचा प्रमुख उद्देश आहे.
  • या योजने अंतर्गत दिव्यांग शेतकरी स्वतःच्या गरजा भागू शकतात व आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.
  • दिव्यांग व्यक्तींना शेती करण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रोत्साहन मिळणार आहे.
  • दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दिव्यांग शेतकरी स्वावलंबी होती व आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents For Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • पाहणी अहवाल
  • अर्जदार व्यक्तीची वैयक्तिक माहिती
  • पैसे जमा केल्याची पावती
  • डी पी नोट
  • शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर अर्जदाराचेे प्रतिज्ञापत्र
  • शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर जमिनीचाचा करारनामा
  • शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर तारण करारनामा
  • भूजल सर्वेक्षण केल्याचा अहवाल दाखला
  • कुठले बँकेची थकबाकी नसल्याचा पुरावा
  • दिव्यांग दाखला
  • शाळा सोडल्याचा पुरावा
  • व्यवसाय करण्यासाठी ना हरकत दाखला ( ग्रामपंचायत किंवा आपण ज्या परिसरात राहतो तेथील)
How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024
How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024 ) :-

  1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. अर्जदार दिव्यांग असावा त्याचा पुरावा अर्जदाराकडे उपलब्ध असावा.
  3. दिव्यांग प्रमाणपत्र
  4. अर्जदारांनी जो प्रकल्प केला आहे त्याची मर्यादा दहा लाखापर्यंत असावी त्या पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

दिव्यांग शेतकऱ्यांना कृषी संजीवनी हॉर्टिकल्चर योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

  • दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी योजने अंतर्गत अर्जदारास दहा लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • योजने अंतर्गत लाभार्थीला 5% सहभाग लागणार आहे.
  • राज्य महामंडळ विभागाच्या अंतर्गत 5% पर्यंतचा सहभाग असणार आहे.
  • राष्ट्रीय महामंडळ या विभागाच्या वतीने 10% पर्यंतचा सहभाग योजनेच्या प्रकल्पामध्ये केला जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत पुरुषांसाठी ६% वार्षिक व्याजदर आकारला जाईल.
  • या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतच्या रकमेवर महिलांसाठी 5% चा व्याजदर आकारला जाईल.
  • योजनेची रक्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल तर 6 % पर्यंतचा व्याजदर आकारला जाईल .
  • दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी योजने अंतर्गत कर्ज परतफेड ची मुदत ही पाच वर्ष असेल.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024) :-

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेचा अर्ज ऑफलाईन प्रकारे करता येईल.

दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल.

  • अर्ज भरण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाणे गरजेचे आहे.
  • जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन आपल्याला दिव्यांग शेतकरी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर करण्याचा अर्ज द्यायचा आहे.
  • वाचून आपल्याला त्यावर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे हे वरती दिलेली सर्व कागदपत्रे यासोबत जोडायचे आहे.
  • आता हे जोडलेली कागदपत्रे आपल्याला संबंधित अधिकाराकडे जमा करायची आहेत व त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे. हि पावती आपल्याला भविष्यात उपयोगी पडेल .[How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024]
How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024
How to apply for Divyang Shetkari krushi Sanjivani Yojna 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

२. या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-https://mshfdc.co.in/index.php/2015-09-10-06-17-07

३. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.

४. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील दिव्यांग शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-आपल्या राज्यातील दिव्यांग शेतकर्यांना १० लाखापर्यंत अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.