Bandhakam Kamgar Yojna 2024| बांधकाम कामगार योजना २०२४| मिळणार लाखोंचे अर्थ सहाय्य| नोंदणी सुरु.

(Bandhakam Kamgar Yojna 2024 Fayade)

बांधकाम कामगार योजना :- नमस्कार वाचक मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक जडणघडनेत मोलाचा वाटा उचलत आहे त्या दृष्टीने ही योजना एक महत्वपूर्ण असा पाऊल असेल. आपले सरकार राज्यातील कामगारांसाठी आणि गरिबांसाठी विविध योजना राबवीत असते. कामगारांसाठी सरकारने एक मंडळ स्थापन केले आहे ज्याचे नाव आहे, महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, या कल्याणकारी मंडळातर्फे विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ज्या कामगारांचे हित जपणाऱ्या व त्यांना आर्थिक सहाय्यता देणाऱ्या आहेत.

राज्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोजगार आणि त्यांची सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक सहाय्य तसेच त्यांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य व कमराच्या कल्याणासाठी विविध उपयोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजना सुरू केली. या प्रकारे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध स्वरूपाची मदत व लाभ दिला जातो. (Bandhakam Kamgar Yojna Benefits.)

महाराष्ट्र राज्य हे आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. आघाडीचे अर्थात तिथे बांधकाम क्षेत्र ही आघाडीचे असल्याने महाराष्ट्रामध्ये बांधकाम करणारा कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणावर लागतो , त्याप्रमाणे बांधकाम कामगार वर्ग कशाचीही पर्वा न करता अखंड कार्यरत आहेत बांधकाम क्षेत्रामध्ये कामगारांना पगार कमी आहेत त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात त्यांना अडचणी येतात तसेच ते आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाहीत.

बांधकाम क्षेत्रात काम करणं म्हणजे रोज नवीन नवीन अनुभव त्यांच्या वाट्याला येतात कधी अपघात होतो कधी मृत्यूला सामोरे जावे लागते कधी अपंगत्व येते अशावेळी कुटुंबातील कर्ता माणूस जाणे म्हणजे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येण्यासारखा आहे व त्यांनी पुढील आयुष्य कसे जगावे यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. (Bandhakam Kamgar Yojna 2024)

या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने योजना आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांसाठी विविध योजना दिल्या जातात व त्यांच्या कुटुंबाला अनेक प्रकारे मदत देखील केली जाते.कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान सुधारवणे तसेच धोकादायक जी क्षेत्र आहेत त्यामध्ये बालकामगार यांना काम करण्यापासून रोखणे कामगारांची कौशल्य वाढविणे त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देणे, तसेच त्यांची सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी योजना व धोरणे आखणे.

बांधकाम कामगार नोंदणी

पात्रता :- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले हवे व ती व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे वयोगटांमध्ये असावे.

Table of Contents

बांधकाम कामगार योजना थोडक्यात :-

महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, या कल्याणकारी मंडळातर्फे विविध क्षेत्रातील योजना राबवल्या जातात. ज्या नोंदणी केलेल्या सक्रीय  कामगारांसाठी आहेत. बांधकाम कामगार व त्याच्या मुला मुलींसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंद आवश्यक आहे.

  • सामाजिक योजना
  • शैक्षणिक योजना
  • आरोग्य विषयक सहाय्य
  • गृहपयोगी वस्तूचे वाटप
  • घर बांधण्यासाठी सहाय्य
योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना
घोषणा कधी केली गेली २०२४
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरु केली बांधकाम कामगार विभाग, महाराष्ट्र शासन.
लाभार्थी बांधकाम क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील कामगार
मिळणारा लाभ सामाजिक योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक सहाय्य
गृहपयोगी वस्तूचे वाटप
घर बांधण्यासाठी सहाय्य
उद्देश कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक स्थितीमध्ये सुधारणा, त्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक मदत, वैद्यकीय सुविधा, निवासी सुविधा आणि सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी हा या योजनेचा उद्देश आहे. (bandhkam kamgar yojna fayde)
ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियाऑनलाइन http://mahabocw.in/ या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
अधिकृत संकेतस्थळ http://mahabocw.in/
संपर्क करा { महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे } http://mahabocw.in/

Table of Contents

बांधकाम कामगार योजना २०२४|सामाजिक योजना

  • महामंडळाकडे नोंदणीकृत अशा सदस्याला स्वतःच्या प्रथम विवाहासाठी 30 हजाराची आर्थिक मदत दिली जाते.
    महामंडळाकडे नोंदणीकृत सदस्याला मोफत मध्यान्ह भोजन दिले जाते.
    महामंडळाकडे नोंदणीकृत सदस्याला संबंधित कामासाठी लागणारी अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपये अनुदान दिले जाते.
  • महामंडळाकडे नोंदणीकृत सदस्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती, प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचे विविध लाभ या योजनेच्या अंतर्गत दिले जातात
  • महामंडळाकडे नोंद असलेल्या पात्र बांधकाम कामगारास शिक्षण तसेच प्रशिक्षण दिले जाते.
  • महामंडळाकडे नोंद असलेल्या बांधकाम सदस्याला सुरक्षा संच दिला जातो.
  • दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणीकृत व जीवित असलेल्या  बांधकाम कामगारास दैनदिन गरजेच्या वस्तू  खरेदीसाठी 30 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते

बांधकाम कामगार योजना २०२४ |शैक्षणिक योजना :-

बांधकाम कामगार योजना २०२४|आरोग्य विषयक सहाय्य :-

  • बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला व कामगाराला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • बांधकाम कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 1 लाख रुपये मुदत ठेवीचा लाभ दिला जातो.
  • नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला 75% टक्के अथवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास 2 लाख रुपये आर्थिक मदत व विमा संरक्षण दिले जाते.
  • नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या योजनेचा लाभ घेता येतो.
  • नोंदणी असलेल्या बांधकाम कामगाराची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते.

बांधकाम कामगार योजना २०२४|आर्थिक सहाय्य :-

  • बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु ओढवल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला 5 लाख रुपये अनुदान दिले जाते. bandhkam kamgar yojna fayde
  • बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यु झाला असल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला 2 लाख रुपये अनुदान दिले जाते .
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला अंत्यविधीसाठी 10 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यु झाल्यावर त्याच्या पती / पत्नीला 5 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी 25 हजार रुपये दिले जातात.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा व्यसनमुक्ती केंद्रात उपचार करण्यासाठी 6 हजार रुपये मदत दिली जाते.

बांधकाम कामगार योजना २०२४|गृहपयोगी वस्तूंच्या संचाची वाटप :-

असे एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचा संच महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांना देत आहे. (bandhkam kamgar yojna fayde)

बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून गृहपयोगी वस्तूंचा संच मिळत आहे ज्याला ग्रामीण भाषेमध्ये आपण घरसंसार असे म्हणतो. गृहपयोगी वस्तू संचामध्ये मिळणाऱ्या जे वस्तू आहेत त्या आम्ही खाली देत आहोत. (bandhkam kamgar yojna fayde)

  • ताट चार नग.
  • वाट्या आठ नग.
  • पाण्याचे ग्लास चार नग.
  • पातेले झाकणासह एक नग.
  • मोठा चमचा भात वाटपा करिता एक नग.
  • मोठा चमचा वरण वाटपा करिता एक नग.
  • पाण्याचा जग दोन लिटरचा एक नग.
  • मसाला डब्बा सात भाग एक डब्बा झाकणासह 14 इंचाचा एक नग.
  • डब्बा झाकणासह 16 इंचाचा एक नग.
  • डब्बा झाकणासह 18 इंचाचा एक नग.
  • परात एक नग.
  • प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा एक नग.
  • कढई स्टीलची एक नग.
  • स्टीलची टाकी मोठी झाकणासह वगराळासह एक नग.

बांधकाम कामगार योजना २०२४|घर बांधण्यासाठी सहाय्य :-

  • अटल बांधकाम आवास योजने अंतर्गत शहरी बांधकाम कामगारांना 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
  • अटल बांधकाम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण बांधकाम कामगारांना 1 लाख 50 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
  • घर बांधण्यासाठी बांधकाम कामगाराकडे स्वतःची जागा नसेल तर 50 हजार रुपये एवढी मदत जागा खरेदीसाठी दिली जाते.

बांधकाम कामगार योजना फायदे :- Bandhakam Kamgar Yojna Benefits 2024:-

  • बांधकाम कामगार योजना साठी दिले जाणारे अर्थसहाय्य कामगारांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाईल, त्यासाठी कुठे त्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
  • या योजनेमुळे कामगारांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.
  • कामगारांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहायची गरज नाही, तसेच कोणाला पैसे उधार ही मागण्याची गरज नाही.
  • बांधकाम करांना या योजनेमधून विविध प्रकारचे फायदे होतात ते खाली देत आहोत.
  • आर्थिक मदत :- कामगारांना त्यांच्या लग्नासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आणि वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  • शिक्षण आणि प्रशिक्षण :- कामगारांना आणि त्यांच्या मुलांना विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक जे प्रशिक्षण आहेत ते करण्यासाठी मदत केली जाते.
  • वैद्यकीय सुविधा :- कामगारांना आरोग्य विमा तसेच वैद्यकीय सुविधा देण्यात येते.
  • घरकुल सुविधा:- घरकुल बांधण्यासाठी कामगारांना आर्थिक मदत दिली जाते.
  • सामाजिक सुरक्षा :- कामगारांना अपघात विमा पेन्शन सारख्या योजना आणि अन्य सामाजिक सुरक्षित चा लाभ या योजनेमार्फत दिला जातो. (bandhkam kamgar yojna fayde)

या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम अन्नाचे प्रयत्न केलेले आहेत जेणेकरून ते एक समृद्ध आणि सुरक्षित जीवन जगू शकतील आणि स्वतःच्या कुटुंबाला चांगला जीवन देऊ शकतील.

बांधकाम कामगार योजना या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Bandhakam Kamgar Yojna 2024 Documents) :-

  1. आधार कार्ड.
  2. बँक पासबुकची छायांकित प्रत
  3. स्वंयघोषणा प्रमाणपत्र.
  4. संमती पत्र.
  5. 90 दिवस काम केल्याचे ग्रामपंचायत/महानगरपालिका/नगरपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद यांचे प्रमाणपत्र.
  6. अर्जदाराचे रेशन कार्ड.
  7. कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड.
  8. पाल्यांचे शिक्षणाचे तपशील.
  9. दोन पासपोर्ट साईजचे फोटो.
  10. अर्जदाराचा मोबाइल नंबर.

बांधकाम कामगार योजना या योजनेच्या अंतर्गत मान्यताप्राप्त अशा कामाच्या प्रकारांची यादी खाली देत आहोत :-

  1. ट्रान्समिशन टॉवर्स आणि इतर कामे.
  2. दगड कापणे, फोडणे आणि दगडाचा बारीक चुरा करणे.
  3. फरशी किंवा टाइल्स कापणे आणि त्याची पॉलिश करणे.
  4. रंगकाम, वॉर्निश लावणे, व तसेच सुतारकाम करणे.
  5. गटार आणि नळजोडणीची कामे करणे.
  6. वायरिंग, वितरण आणि पॅनेल बसवणे यांसारखी विद्युत कामे करणे.
  7. अग्निशमन ची यंत्रणा बसवणे व त्याची दुरुस्ती करणे.
  8. वातानुकूलित यंत्रणा बसवणे आणि त्याची दुरुस्ती करणे.
  9. उद्वाहने व स्वयंचलित जिने बसवणे .
  10. सुरक्षा दरवाजे तसेच उपकरणे इत्यादी बसवणे.
  11. लोखंडाच्या या कोणत्याही धातुच्या खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसवणे.
  12. इमारती.
  13. रस्ते.
  14. रेल्वे.
  15. जलसिंचन योजनेचे बांधकाम करणे.
  16. सुतारकाम, आभाशी असे छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पॅरिस ची कामे.
  17. काच कापणे व काचेच्या वस्तू बनवणे.
  18. कारखाना अधिनियम 1948 च्या खाली समावेश नसलेल्या, विटा आणि छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे. (bandhkam kamgar yojna fayde)
  19. सौर उपकरणे इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बनवणे.
  20. पारेषण आणि वीज वितरण.
  21. पाणी वितरणासाठी पाईपलाईन टाकणे.
  22. तेल आणि गॅसची पाईपलाईन.
  23. इलेक्ट्रिक लाईन्स.
  24. स्वयंपाकखोली च्या ठिकाणी वापरण्यासाठी मॉड्यूलर युनिट बसवणे.
  25. सिमेंट काँक्रिटच्या साच्यामध्ये बनवलेल्या वस्तू तयार करणे व बसवणे.
  26. जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादी व अशा प्रकारचे खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.
  27. माहिती फलके, रोड, प्रवाशी निवारा तसेच बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.
  28. कारंजे बसवणे.
  29. सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम. 
  30. ट्रामवेज
  31. एअरफील्ड
  32. सिंचन
  33. ड्रेनेज
  34. वायरलेस
  35. रेडिओ
  36. दूरदर्शन
  37. दूरध्वनी
  38. टेलिग्राफ अँड ओव्हरसीज कम्युनिकेशन
  39. डॅम
  40. नद्या
  41. पाणीपुरवठा
  42. टनेल
  43. पुल
  44. जलविद्युत
  45. पाईपलाईन
  46. टॉवर्स
  47. कूलिंग टॉवर्स

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा झाल्यास तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिथे अर्ज डाउनलोड करावा लागेल व त्याची प्रिंट घेऊन तो काळजीपूर्वक भरावा लागेल आणि त्यासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित अधिकाऱ्याकडे तो फॉर्म जमा करावा लागेल त्या अधिकाऱ्याने तुमचा फॉर्म तपासल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल, ही ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे. bandhkam kamgar yojna fayde

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahaboc.in वर जा.
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला होम पेज वर “वर्कर्स” मेनू अंतर्गत ‘वर्कर रजिस्ट्रेशन’ या लिंक वर क्लिक करावे लागेल.
  • या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल .
  • त्या नव्याने उघडलेल्या पेजवर तुम्हाला एक पात्रता फॉर्म दिसेल तो ओपन करून त्यामध्ये सर्व आपली माहिती भरा फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर तुमची पात्रता तपासा या लिंक वर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही केलेले रजिस्ट्रेशन त्याचा फॉर्म उघडेल.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतरची प्रोसेस तुम्हाला इथे करावी लागेल म्हणजे फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला इथे भरावी लागेल आणि संबंधित कागदपत्रे तुम्हाला येथे अपलोड करावे लागतील.

वरील सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा अशा रीतीने तुमची ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली. bandhkam kamgar yojna fayde

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर जाऊन कशी करावी हे चित्रफितीच्या रुपात देत आहोत.

Bandhakam Kamgar Yojna 2024

वाचा :-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }

योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.

जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.