Bal Sangopan Yojna 2024 (बाल संगोपन योजना २०२४)
केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या राज्यातील मुलांसाठी विविध योजना घेऊन येत असते त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे बाल संगोपन योजना.या योजनेअंतर्गत ज्या मुलांना आई-वडील नाही आहेत त्या मुलांना सरकार मदत करते. मदतीचे स्वरूप म्हणजे महिन्याला ११००/- रुपये दिले जातात.ही रक्कम प्रति महिना अर्जदाराच्या नावावर जमा होणार आहे म्हणजेच वर्षाला १३२००/- अर्जदाराला मिळणार आहेत.
बाल संगोपन योजना ही एक क्रांतिकारी योजना आहे. कारण या योजनेअंतर्गत कोविडमध्ये अनाथ झालेल्या मुलांना सरकार मदत करत आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपये बँकेत जमा करण्यात आलेले आहेत. योजनेद्वारे मुलांचे भवितव्य प्रकाशमय होणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील निराधार, ज्या मुलांना आई-वडील नाही असे अनाथ मुले ,ज्या मुलांना घर नाही अशी बेघर मुले किंवा शरीरामध्ये कोणते व्यंग असलेले मुले यांना आपले सरकार मासिक ११००/-रुपये मदत करत आहे. आर्थिकदृष्ट्या ही मदत केल्यामुळे मुलांची भवितव्य चांगले घडणार आहे.
Bal Sangopan Yojna 2024 |बाल संगोपन योजना २०२४ , या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
बाल संगोपन योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Bal Sangopan Yojna 2024 }
योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Bal Sangopan Yojna (बाल संगोपन योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | आपले राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | राज्यातील अनाथ,निराधार,शरीरिक काही अडचण असलेली मुले -मुली |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | दर महा ११००/- रुपये बँक खात्यात जमा होणार |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Bal Sangopan Yojna (बाल संगोपन योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | Secretary (O) 22027050 psec.wchd@maharashtra.gov.in |
बाल संगोपन योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Bal Sangopan Yojna 2024 ):-
- अनाथ असलेल्या मुलांना आर्थिक विशिष्ट सक्षम करणे व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना भविष्यासाठी उभे करणे हा प्रमुख उद्देश बालसंगोपन योजनेचा आहे.
- या योजनेअंतर्गत मूल्य आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व आपल्या जीवनात प्रगती करू शकतील.
- ज्या मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे त्या मुलांना कुणावरही अवलंबून राहण्याची गरज या योजनेमुळे पडणार नाही.
- या योजने अंतर्गत मुलांचे भवितव्य सुरक्षित व उज्वल होणार आहे.
- बाल संगोपन योजने अंतर्गत मुलांचा मानसिक दृष्ट्या तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण देखील होणार आहे.
बाल संगोपन योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Bal Sangopan Yojna 2024 Documents) :-
बाल संगोपन योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- अर्जदार बालकाचे आधार कार्ड चे झेरॉक्स (Aadhar Card)
- अर्जदार बालकाच्या पालकाची आधार कार्ड झेरॉक्स (Aadhar Card)
- शिकत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट
- बालकाच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला
- अर्जदार बालकाच्या आई-वडिलांचे मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र
- अर्जदार बालकाच्या आई-वडिलांचा रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदार बालकाचे बँक पासबुक
- अर्जदार बालकाच्या आई-वडिलांचे रेशन कार्ड मध्ये नाव (Ration Card)
- अर्जदार बालकांच्या आई-वडिलांसोबत चा फोटो
बाल संगोपन योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Bal Sangopan Yojna 2024 ) :-
- बाल संगोपन योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी आहे त्यामुळे अर्जदारा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणेआवश्यक आहे.
- केंद्र सरकार व राज्य सरकार मध्ये कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
- जिल्हा परिषद मग ते काम करणारे कर्मचारी देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- विद्यापीठाची मान्यता आहे व अनुसूचित शैक्षणिक संस्था आहेत अशा संस्थेतील कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा फायदा घे का येणार आहे.
- आपल्या राज्यातील व देशातील शासकीय कर्मचारी ज्यांची पत्नी गंभीर आजारी आहे ते सर्व अर्जदार या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
बाल संगोपन योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
- बाल संगोपन योजना ही निराधार व अनाथ मुलांसाठी राबविण्यात आली आहे त्यामुळे ज्या मुलांचे आई-वडील कोविडच्या दरम्यान मृत्यूमुखी पडले आहेत अशा मुलांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
- ज्यांना पालक नाही किंवा त्यांच्या पालकांचा कुठलाही पत्ता उपलब्ध नाही अशा मुलं या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- कुष्ठरोग ग्रस्त बालक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- बाल वयात गुन्हा घडलेली बालके जे बालगृहात आहेत असे बालक योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- एखादे कुटुंब आर्थिक दृष्ट्या मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असेल तर ते अर्ज दार देखील या योजनेचा लाभ देऊ शकतात.
- अविवाहित माता त्यांची मुले देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- मतिमंद ,अपंग मुले या योजनेचे लाभार्थी आहेत.
- ज्या मुलांचे आई-वडील एखाद्या गंभीर आजाराने हॉस्पिटलमध्ये भरती झालेले आहेत व त्यांच्यावर उपचार चालू आहे असे सर्व बालक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- ज्या मुलांचे आई-वडिल मानसिक दृष्ट्या रोगी आहेत.
- घटस्फोटीत आई-वडिलांची मुले देखील या योजनेचा कायदा घेऊ शकतात.
- आई वडील एच आय व्ही पॉझिटिव आहेत ते मुले देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- एच आय व्ही पॉझिटिव असलेली मुले किंवा मतिमंद मुले किंवा कॅन्सर असलेली मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- एखाद्या स्त्रीचे पती एखाद्या अपघातात मृत्यू झाले आहेत व आता कमावणारे घरात कोणीच नाही आहे अशा परिस्थितीत त्या घरातील बालक या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- शाळेत न जाता जी मुले बालकामगार म्हणून काम करतात किंवा त्यांच्यावर कुठलाही बाल कामगाराचा गुन्हा दाखल झाला आहे व नंतर सुटका झाली आहे अशी सर्व मुले या योजनेसाठी पात्र आहेत.
बाल संगोपन योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Bal Sangopan Yojna 2024) :-
या योजनेचा आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो-
बाल संगोपन योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता बघूया ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ कसा घेता येईल-
- बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाऊन महिला व बालविकास विभागात जावे लागेल.
- तिथून आपल्याला बाल संगोपन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- हा अर्ज व्यवस्थित भरून आपल्याला वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जमा करायची आहेत.
- आता हा अर्ज आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.
बाल संगोपन योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करता येईल-
- अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- आता आपल्याला समोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला अप्लाय ऑनलाईन वर क्लिक आहे.
- समोर एक अर्ज ओपन होईल त्यावर आपल्याला विचारलेले सर्व प्रश्नांची माहिती बरोबर भरायची आहे व वरती दिलेले सर्व कागदपत्रे त्यासोबत अपलोड करायचे आहेत.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली बाल संगोपन योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. बाल संगोपन योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-बाल संगोपन योजनेचा अर्ज आपण ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रकारे करू शकतो.
२. बाल संगोपन योजना या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/schemes/manjhi-kanya-bhagyashree-scheme.php
३. बाल संगोपन योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-बाल संगोपन योजना महाराष्ट्र राज्यात लागू झाली आहे.
४. बाल संगोपन योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-राज्यातील अनाथ,निराधार,शरीरिक काही अडचण असलेली मुले -मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5. बाल संगोपन योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर- योजना अंतर्मगत मदतीचे स्वरूप म्हणजे महिन्याला ११००/- रुपये दिले जाता,ही रक्कम प्रति महिना अर्जदाराच्या नावावर जमा होणार आहे म्हणजेच वर्षाला १३२००/- अर्जदाराला मिळणार आहेत.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.