Antarjatiya Vivah Yojna 2024 (आंतरजातीय विवाह योजना २०२४)
आपल्या भारत देशात जातीय परंपरा पूर्वी पासून पाया रोऊन होऊन उभी आहे. माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी आपल्या भारत सरकारने आंतरजातीय विवाह योजना राबविण्याची ठरविले. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 50000 रुपये देण्यात येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तर्फे अडीच लाख रुपये देऊन आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अशाप्रकारे या योजनेद्वारे तीन लाख रुपयांची धन राशी नवीन लग्न झालेल्या जोडप्याला देण्यात येते.
आंतरजातीय विवाह योजना २०२४मध्ये केंद्र सरकार 50% व राज्य सरकार 50% रक्कम देते.यामध्ये मुलगा किंवा मुलगी यातून एक जण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, असे असावे दुसरा व्यक्ती हिंदू, जैन, शीख अशा धर्मातील असावा, ही अट आपल्या राज्य सरकारची आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याद्वारे या योजनेची सुरुवात झाली.आपण बघतो आजही धर्माच्या नावाखाली आजही अनेक ठिकाणी दंगली घडतात.आंतरजातीय विवाह या योजनेअंतर्गत या दंगलींवर आळ बसू शकतो.या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल मिळालेल्या रकमेतून आपले नवीन वैवाहिक जीवन जोडपे आनंदाने चालू करू शकते.
Antarjatiya Vivah Yojna 2024 | आंतरजातीय विवाह योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
आंतरजातीय विवाह योजना २०२४,ची ठळक मुद्दे :- { Important points of Antarjatiya Vivah Yojna 2024 }
योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | आंतरजातीय विवाह योजना २०२४(Antarjatiya Vivah Yojna 2024) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | आपले राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आंतरजातीय करू इच्छित तरुण तरुणी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | ३ लाख रुपये आर्थिक सहाय्य देणे |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | आंतरजातीय विवाह योजना २०२४(Antarjatiya Vivah Yojna 2024) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
योजना कोणत्या विभागा मार्फत राबवली जाते | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
आंतरजातीय विवाह योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Antarjatiya Vivah Yojna 2024 ):-
- या योजने अंतर्गत जातीय भेदभाव नष्ट करून सामाजिक सलोखा वाढवणे हे आपल्या सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य करणे आपल्या सरकारचा उद्देश आहे.
- योजने द्वारे धर्मामधील अंतर कमी करणे व अर्जदारस चांगल्या पद्धतीचे आयुष्य जगण्यास मदत करणे.
- योजने द्वारे सर्व धर्मातील व्यक्तींना समान हक्क मिळेल.
- या योजने द्वारे लग्नासाठी होणारा लग्नासाठी होणारा अवाजवी खर्च वाचेल.
आंतरजातीय विवाह योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents of Antarjatiya Vivah Yojna 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड अर्जदार मुलाचे व मुलीचे (aadhar card of both person)
- अर्जदार मुलाचे व मुलीचे रेशन कार्ड (ration card of both person)
- अर्जदार मुलाचे व मुलीचा रहिवासी दाखला (Domicile certificate of both person)
- अर्जदार मुलाचे व मुलीचा मोबाईल नंबर (mobile no)
- अर्जदार मुलाचे व मुलीचा ई-मेल आयडी (email id)
- अर्जदार मुलाचे व मुलीचा पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (passport size photos of both person)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
- अर्जदार मुलाचे व मुलीचा जातीचा दाखला (cast certificate of both person)
- लग्नातील फोटो (marrige photos)
- मॅरेज सर्टिफिकेट (marrige certificate)
- लग्नासाठी दोन व्यक्तीचे शिफारस पत्र
- अर्जदार मुला मुलीचे एकत्रित बँक खाते (joint account passbook information)
आंतरजातीय विवाह योजना २०२४ या योजनेची पात्रता(Eligibility 2024 of Antarjatiya Vivah Yojna 2024 ):-
- अर्ज करनारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराला आपल्या जातीचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
- या योजने चा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
- विवाह झाल्यानंतर तीन वर्षा आधी या योजनेचा लाभ घेता येईल.
- विवाह हिंदू अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत विवाह झालेल्या जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेचे पैसे अर्जदाराच्या बँक खात्यात जमा होतात त्यामुळे अर्जदाराचा बँक खाते असणे गरजेचे आहे.
- भारतीय विवाह पद्धतीमध्ये मुला मुलीचे वय कोर्टाच्या नियमानुसार असावे जसे की मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण व मुलीचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
- अर्ज करणाऱ्या अर्जदारांना प्रथम कोर्ट मॅरेज करावी लागेल मॅरेज सर्टिफिकेट योजनेसाठी आवश्यक आहे.
आंतरजातीय विवाह योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Antarjatiya Vivah Yojna 2024) :-
आंतरजातीय विवाह योजना २०२४ या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण दोन प्रकारे फायदा घेऊ शकतो ऑनलाईन आणि ऑफलाईन.आता बघू ऑफलाईन फायदा कसा घेऊ शकतो.
आंतरजातीय विवाह योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता बघूया ऑफलाइन पद्धतीने आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो-
- योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालय जावे लागेल.
- कार्यालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन आंतरजातीय विवाह चा अर्ज घेणे गरजेचे आहे.
- हा अर्ज व्यवस्थित भरावा व वरील दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडावी.
- आता संपूर्ण व्यवस्थित भरलेला अर्ज व कागदपत्रे आपल्याला सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागात जमा करायची आहेत.
आंतरजातीय विवाह या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता बघूया ऑनलाइन पद्धतीने आपण या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो-
- यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
आंतरजातीय विवाह योजना २०२४(Antarjatiya Vivah Yojna 2024)
- आता आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना यावर क्लिक करायचे आहे.
- आपल्यासमोर एक नवीन अर्ज ओपन होईल त्या दिलेली सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत अपलोड करायची आहे.
- आता आपल्याला सेव बटन वर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे आपण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली आंतरजातीय विवाह योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
माझीवाचकास विनंती आहे ,आपल्याला आंतरजातीय विवाह योजना 2024 ची माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारामध्ये पाठवा जेणेकरून या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या वैवाहिक व विवाह करू इच्छित तरुण-तरुणींना होईल.
FAQ
1.आंतरजातीय विवाह केल्यास काय लाभ मिळेल?
उत्तर-योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला 50000 रुपये देण्यात येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तर्फे अडीच लाख रुपये देऊन आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अशाप्रकारे या योजनेद्वारे तीन लाख रुपयांची धन राशी नवीन लग्न झालेल्या जोडप्याला देण्यात येते.
२.आंतरजातीय विवाह या योजनेचा लाभ दांपत्य कधीपर्यंत घेऊ शकतेक?
उत्तर-आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दांपत्य आपल्या लग्नानंतर तीन वर्षाच्या आत घेऊ शकतात.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.