Annasaheb Patil Loan Scheme 2024|अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४

या योजनेची थोडक्यात माहिती :-

Table of Contents

Annasaheb Patil Loan Scheme 2024

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील युवकांसाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक 27 नोव्हेंबर 1998 रोजी केली.

राज्यामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे गरजेचे आहे, कारण या घटकातील बेरोजगार अशा युवकांना रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकारने 29 ऑगस्ट 1998 महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला व या निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबत माहिती, मार्गदर्शन व आर्थिक मदद करण्यात येते.

महाराष्ट्र सरकार राज्यातील जे युवक युवती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी कर्ज उपलब्धी करून देण्यासाठी एक पाऊल सरकार तर्फे पुढे टाकण्यात येत आहे या दृष्टीने सरकारची ही महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे.

भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्या एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के लोकसंख्या ही वय वर्षे 30 च्या आत आहे म्हणून या मनुष्यबळाला कुशल मनुष्यबळ बनवणे गरजेचे आहे त्याने आपल्या देशाची उत्पादन क्षमता वाढेल व बळकट होण्यास मदत होईल, या वयोगटातील युवकांना रोजगार व स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी सक्षम करून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील युवा पिढीला या योजनेकडून हातभार लागणार आहे. उद्योजक बनवू इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक मदत देऊन त्यांना रोजगार निर्मितीक्षम बनवणे असा या योजनेमागे शासनाचा उद्देश आहे.

हे पाऊल शासनाने राज्यातील बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यासाठी या माध्यमातून बरेचशे असे कार्यक्रम शासनाने आणले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व कर्ज सुलभ पद्धतीने वितरित होण्याकरिता स्वयंरोजगार वेब पोर्टल विकसित केले आहे.

महाराष्ट्र राज्यामधील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील समुदायाच्या विकासासाठी शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत ची मुंबई येथे स्थापना केली आहे.या योजनेमुळे महाराष्ट्रामधील तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ ठळक मुद्दे :-

(Important Points Of Annasaheb Patil Loan Scheme 2024)

योजनेचे नाव Scheme name अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ /Important Points Of Annasaheb Patil Loan Scheme 2024
योजना कोणी आणलीराज्य सरकार
योजनेचा उद्देश Scheme Purpose स्वतः चा हक्काचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देणे
योजनेचा लाभ कुणालाआपल्या राज्यातील तरुण-तरुणी
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळअण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ /Important Points Of Annasaheb Patil Loan Scheme 2024
योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदतची रक्कम१५,००,००००/- रुपये आर्थिक सहाय्य. (१५ लाख )
Annasaheb Patil Loan Scheme 2024
Annasaheb Patil Loan Scheme 2024

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची कागदपत्रे (Documents for Annasaheb Patil Loan Scheme 2024):-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक(bank passbook)
  • सीबील रीपोर्ट(cibil report)
  • व्यवसाय -प्रकल्प चे सदरीकरण
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र(taining certificate)
  • बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Annasaheb Patil Loan Scheme 2024) :-

  1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. अर्जदार व्यक्तींने यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज घेतलेले नसावे.
  3. अर्जदार व्यक्तीवर कुठल्याही बँकेचे कर्ज नसावे.
  4. अर्जदार व्यक्तीला स्वतःची संपूर्ण माहिती खरी द्यायची आहे तपासामध्ये कोणतीही माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल
  5. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेचा अर्ज कसा

करावा (How to apply for Annasaheb Patil Loan Scheme 2024 ) :-

  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास खालील अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ /Important Points Of Annasaheb Patil Loan Scheme 2024

  • आपल्या समोर जे पेज ओपन होईल त्यावर आपल्याला होम पेजवर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्याला सर्व माहिती भरायची आहे व सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आपल्याला युजरनेम पासवर्ड मिळेल.
  • आता आपल्याला दिलेले युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • आता आपल्याला आपल्या जिल्ह्याची निवड करायची आहे.
  • आता समोर आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती दिसेल.
  • आता आपल्याला आपण ज्या कंपनीचे मालक आहोत त्या कंपनीचा सर्व तपशील व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
  • वरती दिलेले सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • अशाप्रकारे आपला अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Annasaheb Patil Loan Scheme 2024 ):-

  • आपल्या राज्यातील तरुणांनाया व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे या योजनेमागचा उद्देश आहे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या तरुणांना सक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.
  • आर्थिक दृष्ट्या गरिबा असणाऱ्या तरुणांना सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली.
  • अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईल द्वारे आपण या योजनेचा घरबसल्या फायदा घेऊ शकतो.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची वैशिष्ट्ये :-

Annasaheb Patil Loan Scheme 2024
Annasaheb Patil Loan Scheme 2024
  1. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत जो व्यवसाय करायचा आहे तो महाराष्ट्र राज्यात करणे गरजेचे आहे.
  2. या योजनेअंतर्गत कृषी किंवा पारंपारिक उद्योग, लघु किंवा मध्यम उद्योग उत्पादनाचे अनेक उद्योग व्यवसाय किंवा विक्री क्षेत्रातील उद्योग किंवा सेवा क्षेत्र यात व्यवसाय करणे अनिवार्य आहे.
  3. या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सहकर्जदार म्हणून या योजनेत भाग घेऊ शकतात.
  4. अर्जदार व्यक्तींनी त्याची परतफेड केली नाही तर अशा परिस्थितीत व्याज परत केले जाणार नाही.
  5. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडला किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत कर्ज दिले जाईल आणि या व्याजाची परतफेड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातर्फे केली जाईल
  6. या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज दिले जाते.
  7. योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींना शेती संदर्भात व्यवसाय सुरू करायचे त्या अर्जदाराची वय 45 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावी तरच या योजनेअंतर्गत त्यांना लाभ घेता येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
  • गट कर्ज व्याज परतावा योजना
  • गट प्रकल्प कर्ज योजना
  • अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म

निष्कर्ष :-

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेविषयी आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ’S-

१. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेचा अर्ज https://udyog.mahaswayam.gov.in/#/home इथे भरू शकतो.

२. ण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-https://udyog.mahaswayam.gov.in/#/home

३. ण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे.

४. ण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी आपल्या राज्यातील तरुण-तरुणी आहेत.

5. ण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-स्वतः चा हक्काचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देणे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }

गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.