पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार (Ambia Bahar Fal Pik Vima Yojna 2024) 2024-25 ही डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई, आणि स्ट्रॉबेरी या 9 प्रमुख फळपिकांसाठी महाराष्ट्रामधील 30 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली जात आहे. शेतकऱ्यांना या योजने बद्दल जास्तीत जास्त माहिती कशी होईल यासाठी या योजनेची माहिती देणारा हा लेख आम्ही तयार केला आहे.
आंबिया बहार फळ पीक विमा योजना – Ambia Bahar Fal Pik Vima Yojna 2024
आंबिया बहार फळ पीक विमा योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभाग ऐच्छिक असणार आहे .या योजनेत सहभागी व्हायचे की नाही, हे शेतकऱ्यांनी त्यांचे त्यांननेच ठरवायचे आहे. त्यासाठी, शेतकऱ्यांचे ज्या बँकेत पिककर्ज आहे, तिथे जाऊन एक घोषणापत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
जर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ इच्छित नसेल, तर त्यांना अंतिम तारखेच्या सात दिवस आधी त्यांच्या बँकेत कळवावे लागेल, ज्यामुळे बँक त्यांच्या कर्ज खात्यामधून विमा हप्ता कपात करणार नाही. जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांना बँकेत लागणारी कागदपत्रे भरून द्यावी लागतील. ज्यांनी ठरलेल्या तारखेपर्यंत बँकेला सहभागी न होण्याचे कळवले नाही तर, त्यांना आपोआप योजनेत सहभागी समजले जाईल आणि बँक त्यांचा विमा हप्ता त्यांच्या कर्ज खात्यातून कपात करेल. फक्त उत्पादनक्षम फळबागांसाठीच हा विमा कवच उपलब्ध असेल शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी.
या योजनेसाठी फळपिकांचे उत्पादनक्षम वय खालील प्रमाणे असेल – आंबा, चिकू, काजू यांचे 5 वर्षे, लिंबू 4 वर्षे, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ यांचे 3 वर्षे, डाळिंब, द्राक्ष यांचे 2 वर्षे, तर केळी, पपई, स्ट्रॉबेरी यांसाठी कोणतेही उत्पादनक्षम वय मर्यादा नाही. जर बागांचे वय या निकषांपेक्षा कमी असेल असे आढळले, तर विमा संरक्षण रद्द होईल.
ही योजना काही निश्चित कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल. ते इथे देत आहोत ,
जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, आणि रत्नागिरीसाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.,
जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबारसाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, आणि वाशिम जिल्ह्यांसाठी बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
या कंपन्यांच्या माध्यमातून योजना राबविली जाईल.
आंबिया बहार फळ पीक विमा योजना (Ambia Bahar Fal Pik Vima Yojna 2024) 2024-25 साठी द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, संत्रा, काजू, आंबा, स्ट्रॉबेरी, आणि डाळिंब या 9 पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम तसेच गारपीट सारख्या हवामान धोक्यांसाठी निश्चित रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ठरावीक अंतिम तारखा देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, द्राक्ष पिकासाठी अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 आहे, तर डाळिंबासाठी ही तारीख 14 जानेवारी 2025 आहे. गारपीटीसाठी विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता देणे आवश्यक आहे, आणि हा सहभाग ऐच्छिक असणार आहे.
शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेण्यासाठी विमा हप्ता साधारणतः विमा संरक्षित रकमेच्या 5% असतो, परंतु काही जिल्ह्यांत हा हप्ता जास्त असू शकतो. कारण या योजनेच्या अंतर्गत हवामानाचे धोके, जसे की अवेळी पाऊस, तापमानातील अस्थिरता, वाऱ्याचा वेग, आणि गारपीट यांना कव्हर करण्याकरिता विमा संरक्षण दिले जाईल. हवामान घटकांचे उल्लंघन झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनीमार्फत मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेण्यासाठी राष्ट्रीय पिक विमा पोर्टल | PMFBY च्या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. गारपीटीसाठी विशेष विमा संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित विमा हप्त्यासह अतिरिक्त हप्ता देखील बँकांमार्फत भरावा.
आवश्यक कागदपत्रे
बँक खाते क्रमांक.
आधार कार्ड.
सातबारा उतारा
हमीपत्र.
ऑनलाईन अर्ज कसा करावा घ्या जाणून (Apply Online Ambia Bahar Fal Pik Vima Yojna 2024)
- पोर्टलवर जा PMFBY वेबसाईट उघडा आणि आपली भाषा मराठी निवडा.
https://pmfby.gov.in - Farmer Corner वर क्लिक करा- मुख्य पृष्ठावरील Farmer Corner या पर्यायावर क्लिक करा.
- लॉग इन किंवा अतिथी शेतकरी पर्याय निवडा – जर तुम्ही पोर्टलवर नवीन असाल तर Guest Farmer | अतिथी शेतकरी पर्यायावर क्लिक करा. यापूर्वी खाते तयार केलेले असल्यास लॉग इन करा हा पर्याय निवडावा.
- तपशील भरावा- नवीन खाते तयार करताना तुमची संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, बँक माहिती इत्यादी माहिती भरून सबमिट वर क्लिक करा.
- मोबाईल नंबर पडताळणी- तुमचा मोबाईल नंबर टाकून verify या बटनावर क्लिक करा. नंतर स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल, तो टाकून Get OTP बटणावर क्लिक करावे.
- OTP verify- तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून पुढे जा.
- विमा योजनेचा फॉर्म भरा- फॉर्म भरताना लागणारी आवश्यक माहिती जसे की पिकाची माहिती, बँक खात्याचे तपशील, आणि विमा हप्त्याची रक्कम भरावी.
- ही लागणारी कागदपत्रे अपलोड करा.
- बँक पासबुकचा फोटो
- डिजिटल सही असलेला सातबारा उतारा
- हमी पत्र (Declaration)
- आधार नंबर
- सबमिट करा- सर्व भरलेली माहिती पूर्ण आणि योग्य असल्याचे तपासून फॉर्म सबमिट करावा.
- ई-सेवा केंद्र \ बँक संपर्क- जर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना काही अडचण आल्यास नजीकच्या ई-सेवा केंद्र \ बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधून अर्जाची नोंदणी करा.
- संपर्क साधा- योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.
हे सर्व टप्पे पार पडल्यानंतर तुम्ही आंबिया बहार फळ पीक विमा योजनेत (Ambia Bahar Fal Pik Vima Yojna 2024) सहभागी होण्यासाठी यशस्वीरित्या नोंदणी करू शकणार आहात.
निष्कर्ष | Ambia Bahar Fal Pik Vima Yojna 2024.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Ambia Bahar Fal Pik Vima Yojna 2024 | आंबिया बहार फळ पीक विमा योजना याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. सरकार देत आहे 10 लाख पर्यंत कर्ज,60% सबसिडी सोबत,असा अर्ज करा आणि आपला व्यवसाय सुरु करा.
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना.
Maharashtra Farmer Scheme 2024 : या शेतकर्यांना मिळणार ट्रॅक्टर घेण्यासाठी 90% अनुदान लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Maharashtra Farmer Scheme 2024 हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. |
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना.
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.