Ahilyadevi Sinchan Vihir Yojana (अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना संपूर्ण माहिती)
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना संपूर्ण माहिती :- आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.आपल्या देशात बागायती व जिरायती असे दोन शेतीचे प्रवर्ग आहेत.जिरायती म्हणजे पाणी कमी असलेला शेतीचा भाग.तर या आपल्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यानसाठी विविध योजना राबवल्या जातात. तसेच महाराष्ट्र सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना कायम घेऊन येत असते त्यातच आता आपले हक्काचे सरकार नवीन योजना घेऊन आले आहे .योजनेचे नाव आहे अहिल्याबाई सिंचन विहीर योजना.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध योजना आपले महाराष्ट्र सरकार आपल्या शेतकरी बांधवांसाठी राबवत आहे या योजनेअंतर्गतच अहिल्यादेवी सिंचन योजना ही देखील आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार लाखापर्यंत अर्थ सहाय्य केले जाणार आहे. या अर्थसहायाचा वापर करून शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीमध्ये विहीर बांधू शकतात.
शासनाच्या आधीच्या निर्णयानुसार जर दोन विहिरींमध्ये 150 फूट पेक्षा कमी अंतर असेल तर आशा शेतजमिनीत विहीर बांधायला शासनाकडून परवानगी मिळत नव्हती परंतु आत्ता आलेल्या नवीन धोरणानुसार दोन विहिरींमध्ये 150 पेक्षा कमी अंतर असेल तरीही विहीर बांधायला शासन 4 लाख इतकी मदत करत आहे.
आपल्या देशात प्रामुख्याने तीन ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा परंतु असे अनेकदा होते की उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना पाणी मिळत नाही आणि त्या भावी त्यांचे प्रचंड नुकसान होते .कितीतरी वेळ हाता तोंडाशी आलेला घास निघून जातो व हिरवळ असलेली शेती उन्हाळ्यात पूर्णपने सुकून जाते. यासाठी उपाययोजना म्हणून आपण जर विहीर बांधली तर विहिरीमध्ये आपण पाण्याचा साठा करूू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके चांगली येतील याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल.
अहिल्याबाई सिंचन विहीर (Ahilyadevi Sinchan Vihir Yojana ) योजने अंतर्गत अनेक गरीब कुटुंबाला मदत होणार आहे.या योजने मुळे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावणार आहे.शेतीला पाणी साठा करून ठेवल्यामुळे शेतकरी विविध पिकेघेऊ शकतो,मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा झाल्या मुळे शेतीपूरक जोडधंदा वाढणार आहे. अहिल्याबाई सिंचन विहीर योजनेमुळे आपळे राज्य प्रगतीच्या मार्गावर जाणार आहे.
विहीर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्र रेषेखालील कुटुंबे इंदिरा आवास लाभार्थी असलेले कुटुंब अल्पभूधारक शेतकरी किंवा निवासी शेतकरी यांना प्रामुख्याने मदत केली जाईल. तसेच एखाद्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने आत्महत्या केलेली असेल तर त्या कुटुंबाला प्राधान्य दिले जाईल. दारिद्र रेषेखालील जी कुटुंबे आहेत त्यांना देखील या योजनेसाठी प्राधान्य दिले गेले आहे.[अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना २०२४.
अहिल्याबाई सिंचन विहीर योजनेची ठळक मुद्दे ((Ahilyadevi Sinchan Vihir Yojana important points)
योजनेचे नाव | अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना (Ahilyadevi Sinchan Vihir Yojana) |
योजना कोणी सुरु केली | राज्य सरकार |
योजना कधी सुरु झाली | ०४ नोव्हेंबर २०२२ |
योजनेचा उद्देश | राज्यातील शेतकर्यांना विहीर बांधण्यासाठी मदत करणे |
योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना |
योजनेचा अर्ज डाऊनलोड कसा करावा | अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना |
योजनेच अर्ज कसा करावा | ऑफलाईन |
अहिल्याबाई सिंचन विहीर योजनेची उद्दिष्टे (Ahilyadevi Sinchan Vihir Yojana purpose)
- प्रामुख्याने शेतकऱ्यांना चार लाख मदत करून आपल्या शेतामध्ये विहीर बांधण्यासाठी प्रोत्साहन देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्टे आहे.
- विहीर खोदकामामुळे सर्व ऋतूंमध्ये पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी ऋतूनुसार पिके घेऊ शकतात व आपला आर्थिक फायदा करून घेऊ शकतात.
- आपला देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण पाण्याअभावी इच्छा असून पण आपली तरुण पिढी शेती करू शकत नव्हती परंतु या विहीर योजनेअंतर्गत आपली तरुणाई शेती व्यवसायाकडे वळवणे हा देखील उद्देश आपल्या सरकारचा आहे.
- शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी जनावर पाळू शकतात जेणेकरून दुग्ध व्यवसाय सुरू होऊ शकतो यामुळे जोडधंदा सुरू होऊ शकतो.
- प्रामुख्याने या सर्वातून एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे ती म्हणजे विहिरीला पाणी असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतीच्या बांधाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावू शकतात. या झाडांमुळे फळझाडे लावली तर यातून देखील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न चालू होईल. तसेच आपला निसर्ग जोपासायला देखील इथे प्रोत्साहन मिळत आहे.
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेची पात्रता(Ahilyadevi Sinchan Vihir Yojana eligibility)
- अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेसाठी सामूहिक विहीर देखील संकल्पना सरकार राबवत आहे संकल्पने अंतर्गत शेतकऱ्यांना जर 2.7 हेक्टर जमीन असेल तरच अहिल्यादेवी विहीर योजनेचा फायदा घेता येणार आहे परंतु तीन लाभार्थींची जमीन जर एकाच पट्ट्यात असेल तर सामूहिक विहीर योजनेसाठी अंतर्गत योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.
- महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक
- या योजनेसाठी पात्र असणारे शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे परंतु जर शेतकरी वाट्याने जमीन करत असेल तर मालकाचे न हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक गरजेचे आहे.
- योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीने यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार द्वारे कोणत्याही प्रकारच्या शेततळे सामूहिक शेततळे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर असल्यास त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही
- ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतात विहीर खोदायचे आहे त्या विहिरीच्या आसपास 500 फुटापर्यंत विहीर असू नये.
- शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहोचलेली असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याच्या सात बारा वर विहिरीची नोंदणी असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
- लाभार्थी शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे
- जॉब कार्डद्वारे वीर खोदण्याचे काम करून मजुरी घेणे आवश्यक आहे.[Ahilyadevi Sinchan Vihir Yojana]
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनाअहिल्यादेवी सिंचन विहीर योजना साठी अर्ज करावयाचा असल्यास आवश्यक कागदपत्रे(Important Documents For Ahilyadevi Sinchan Vihir Yojana )
- मोबाईल नंबरशी लिंक असलेलेे आधार कार्ड(adhar card)
- महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला
- आर्थिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र(income certificate)
- : शेतकऱ्याच्या नावावर जमीन असल्याचाा सातबारा
- फोन नंबर
- ई-मेल आयडी
अहिल्यादेवी सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा(How to apply for Ahilyadevi Sinchan Vihir Yojana )
- शेतकऱ्यांना अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देणे आवश्यक आहे ते जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे.
- अर्ज खालील लिंक दिलेला आहे कृपया खालील लिंक वर क्लिक करा
अहिल्यादेवी सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा (How to apply for Ahilyadevi Sinchan Vihir Yojana )
- दिलेला अर्ज व वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्य कार्यालयामध्ये जमा करायचीव वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करायची आहेत.
निष्कर्ष–
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ४ लाख इतका लाभ होणार आहे. त्याचा वापर करून शेतकरी आपल्या शेतामध्ये आपले हक्काची विहीर बांधू शकतो. या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता ,अटी, सरकारची उद्दिष्टे हे सर्व आपण या लेखाद्वारे समजून घेतले राज्य सरकार राबवत असणाऱ्या सर्व योजनांपैकी ही एक उत्कृष्ट योजना आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. आशा आहे आपणा सर्वांना हा लेख आवडला असेल हा लेख जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाभार्थीला या योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद…!
FAQ’S
१. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती व कशी मदत मिळणार आहे?
उत्तर- अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ४ लाख मदत मिळणार आहे,हि मदत हप्त्यांमध्ये मिळणार आहे.लाभार्थीला त्याच्या बँक खात्यात योजनेचे पैसे मिळणार आहेत.
२. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना या योजनेचा अर्ज कसा भरावा?
उत्तर- अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना या योजनेचा अर्ज आपल्या जवळील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती मध्ये ऑफलाईन पद्धतीने भारता येणार आहे.
वाचा–
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. महिला समृद्धी कर्ज योजना
आपल्या हक्काचे घर मिळवायचे असेल तर हे वाचा रमाई आवास घरकुल योजना २०२४.