Site icon yojanaguarantee.com

ABHA Health ID Card Online | आभा हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे जाणून घ्या संपूर्ण माहीती !

ABHA Health ID Card Online

ABHA Health ID Card Online

ABHA Health ID Card Online

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (ABHA Health ID Card Online – आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात असावी, म्हणून आभा (ABHA Health ID) कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात.

या सर्व बाबीचा विचार करता सरकारकडून आता नागरिकांना आभा आरोग्य (ABHA Health ID Card Online) कार्ड दिले जात आहे. आभा आरोग्य (ABHA Health ID Card Online) कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय.

आभा कार्ड (ABHA Health ID Card Online) नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी कार्ड मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, केलेल्या चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाईल. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा (ABHA Health ID) कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागचे आजार, त्यांची निदाने, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची सगळ्यांचीच बचत होणार आहे.

आभा हेल्थ (ABHA Health ID Card Online) कार्डच्या मदतीने देशभरामध्ये सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. डिजिटल हेल्थ मिशनच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाईल. या हेल्थ कार्डचा प्रत्येकाने लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे सरळ सरळ आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

आभा कार्डसाठी (ABHA Health ID Card Online) आधार कार्ड आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आभा कार्डमुळे उपचार करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र आता घेऊन जाण्याची गरज उरणार नाही. आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची सर्व माहिती असेल. ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा याद्वारे नागरिकांना मिळतील. आपला मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड अगदी सहजपणे तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल, असे अनेक फायदेच फायदे आभा (ABHA Health ID Card Online) कार्डचे आहे.

आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आभा हेल्थ आयडी – Ayushman Bharat Digital Mission Abha Health ID

जन धन, आधार आणि मोबाईल (जेएएम) आणि सरकारच्या डिजिटल उपक्रमांच्या आधारे, प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन हा एक डिजिटल मंच तयार करेल. या मंचाद्वारे नागरिकांसाठी जलद आणि सोप्या पद्धतीने आरोग्याशी संबंधित सेवा उपलब्ध होतील. यामध्ये वैयक्तिक आरोग्य माहितीची सुरक्षा, गोपनीयता आणि खासगीपणाचे संपूर्णतः पालन केले जाईल.

ही प्रणाली नागरिकांच्या संमतीने त्यांच्या आरोग्याच्या नोंदी ऑनलाइन उपलब्ध करून देईल आणि माहितीची देवाणघेवाण सोपी करेल.

पीएम-डीएचएमच्या मुख्य घटकांमध्ये प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्राचा समावेश आहे जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील आरोग्य नोंदी येथे जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल ऍप्लिकेशनचं मदतीने पाहिल्या देखील जाऊ शकतात. हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवांचे केंद्र म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर, हॉस्पिटल आणि आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.

मिशनचा एक भाग म्हणून तयार केलेले पीएम-डीएचएम सँडबॉक्स हे तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा भाग बनू इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यां आणि संघटनांना मदत करेल. ते आरोग्य माहिती देणारे किंवा आरोग्य माहिती वापरकर्ता बनतील किंवा पीएम-डीएचएमशी कार्यक्षमतेने जोडले जातील.

हे मिशन डिजिटल आरोग्य परिसंस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले, ज्याप्रमाणे पेमेंटमध्ये क्रांतिकारी बदल करण्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेसने भूमिका बजावली होती. आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्यापासून नागरिक केवळ एक क्लिक दूर असतील.

ABHA Health ID Card Online

हेल्थ आयडी म्हणजे काय?

आभा आयडीची रचना-

PHR एड्रेस काय आहे?

आभा हेल्थ आयडी – ABHA Health ID Card Online

हेल्थ आयडी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर डिजिटल आरोग्य नोंदी तयार करण्याचा पहिला टप्पा आहे. तुम्ही डिजिटल हेल्थ आयडी तयार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या परवानगीने डॉक्टर, रुग्णालये आणि इतर आरोग्य सेवांसोबत तुमचा आरोग्य डेटा शेअर करण्याची आणि पाहण्याची सुविधा मिळते. हे सर्व सुरक्षित पद्धतीने केले जाते.

तुमचा हेल्थ आयडी ही तुमच्या आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने ऍक्सेस आणि शेअर करण्याची एक सरळ साधी सोपी पध्दत आहे.
•डिजिटल आरोग्य नोंदी (Digital Health Records) : प्रवेशापासून उपचारांपर्यंत आणि पेपरलेस पद्धतीने डिस्चार्ज करण्यापर्यंत.
•वैयक्तिक आरोग्य नोंदी (Personal Health Records – PHR) : रेखांशाचा Personal Health Records (PHR) आरोग्य इतिहास तयार करण्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड (PHR) ला आरोग्य ID सह प्रवेश करा आणि जोडा.
•डॉक्टरांना प्रवेश (Access to doctors) : देशभरातील सत्यापित डॉक्टरांना प्रवेश सक्षम.
•नामनिर्देशित जोडा (Add a nominee) : तुमचा हेल्थ आयडी ऍक्सेस करण्यासाठी नॉमिनी जोडा आणि तुमचे रेकॉर्ड पहा.
•बाल आरोग्य ओळखपत्र (Child Health ID) : आपल्या मुलांसाठी हेल्थ आयडी तयार करा, जन्मापासूनच डिजिटल आरोग्य रेकॉर्ड तयार करा.

आभा हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी प्रोसेस – ABHA Health ID Online

असे करा आभा हेल्थ आयडी डाउनलोड

आभा हेल्थ आयडी (ABHA Health ID) डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पोर्टलला भेट देऊन मोबाईल नंबर किंवा आभा हेल्थ आयडी नंबर, Captcha कोड व मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करा.

https://abha.abdm.gov.in/abha/v3/login

पुढे आपल्याला त्या मोबाइल क्रमांकाशी जोडलेले सर्व ABHA क्रमांक दिसतील, जर तुम्हाला ABHA प्रोफाइल मध्ये बदल करायचा असेल तर करू शकता किंवा कार्ड डाउनलोड करू शकता.

आभा (ABHA) मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) मोबाईल ॲप (पूर्वी NDHM हेल्थ रेकॉर्ड्स किंवा PHR ॲप म्हणून ओळखले जाणारे) गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

संपर्क : तुम्हाला तुमच्या हेल्थ आयडीमध्ये समस्या येत असल्यास कृपया ndhm@nha.gov.in वर संपर्क साधा किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा- 1800-11-4477 / 14477

या लेखात, आम्ही आभा हेल्थ आयडी कार्ड (ABHA Health ID Card Online) ऑनलाईन कसे काढायचे? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

निष्कर्ष | ABHA Health ID Card Online.

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली ABHA Health ID Card Online | आभा हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे जाणून घ्या संपूर्ण माहीती! या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ | ABHA Health ID Card Online.


१. ABHA Health ID Card Online म्हणजे काय?

उत्तर – तुमचा हेल्थ आयडी ही तुमच्या आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने ऍक्सेस आणि शेअर करण्याची एक सरळ साधी सोपी पध्दत आहे.

२. ABHA Health ID Card Online याचा फायदा लोक कसा घेऊ शकतात?

उत्तर- या योजनेद्वारे पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षण, लग्न आणि अन्य महत्त्वाच्या गरजांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद आधीच करता येते.

३. ABHA Health ID Card Online साठी कुठे अर्ज करता येईल वेबसाईट सांगावी?

उत्तर- वेबसाईट लिंक

हे देखील वाचा


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version