Kadaba Kutti Machine Yojana 2024|कडबा कुट्टी मशीन योजना २०२४

Kadaba Kutti Machine Yojana(कडबा कुट्टी मशीन योजना)

कडबा कुट्टी मशीन योजनेची माहिती(Information of Kadaba Kutti Machine Yojana)

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत, परंतु आता शेतकरी प्रगतशील झालेले आहेत ते आपल्या शेतीबरोबर जोड धंदा करण्याचा प्रयत्न करतात.जोडधंदा मध्ये शेतकरी दुग्ध युक्त पदार्थ तयार करण्यासाठी दुधाचा धंदा करतात.दुधासाठी आता शेतकरी जनावरे पाळू लागली आहेत. या जनावरांना हिरवा चारा देणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून त्यांच्या दुधाची प्रत चांगली राहील.

आता आपले शासन घेऊन आले आहे कडबा कुट्टी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान युक्त कडबा कुट्टी मशीन दिले जाणार आहे. या कडबा कुट्टी मशीन चा वापर करून शेतकरी आपल्या जनावरांना हिरवा चारा तुकडे पद्धतीमध्ये घालू शकतात जेणेकरून त्यांचे दूध वाढेल, आणि चाऱ्याचे नुक्णन होणार नाही.

दोन एचपी चे कडबा कुट्टी मशीन से सरकार आपल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर देत आहे
या अनुदानाद्वारे शेतकरी आपल्या स्वतःची कडबा कुट्टी मशीन घेऊ शकतो व जनावरे पाळू शकतो जेणेकरून दुग्ध धंद्यामध्ये वाढ होऊन जोडधंदा जोपासता येईल.


कडबा कुट्टी योजना ही केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांसाठी राबवली जात आहे.पशुसंगोपनासाठी मिळणारे कडबा कुट्टी मशीन याचे अनुदान थेट बँक खात्यात मिळणार आहे. तर आता आपण बघूया त्या योजनेचा आपण अर्ज कसा करू शकतो ,त्याचे ठळक उद्दिष्ट काय आहेत ,पात्रता काय आहेत, आपण कशाप्रकारे आपल्या कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करू शकतो व आपल्या हक्काची कडबा कुट्टी मशीन आपल्या घरी घेऊन येऊ शकतो.

कडबा कुट्टी योजनेअंतर्गत 30 टक्के महिलांना प्राधान्य दिले गेले आहे तर ३ टक्के अपंग अर्जदारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आले आहेत.

Kadaba Kutti Machine Yojana 2024
Kadaba Kutti Machine Yojana 2024

कडबा कुट्टी मशीन योजनेची ठळक मुद्दे(Important Points for Kadaba Kutti Machine Yojana)

योजनेचे नावकडबा कुट्टी मशीन योजना(Kadaba Kutti Machine Yojana)
योजना कोणी सुरु केलीराज्य सरकार
योजना कोणत्या विभागा अंतर्गत आहेपशुसंवर्धन विभाग
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे१००% अनुदान
योजनेसाठी अर्ज कोण करू शकतोआपल्या राज्यातील शेतकरी बांधव
योजनेचा अर्ज कसा करू शकताऑलाईन / ऑनलाईन
योजनेसाठी अर्ज कुठे करावाकडबा कुट्टी मशीन योजना

कडबा कुट्टी मशीन योजनेची उद्दिष्टे(Purpose of Kadaba Kutti Machine Yojana)

  • आपल्या कृषी प्रधान देशात शेती बरोबर शेतकरी मित्रांना जोडधंदा करता यावा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कडबा कुट्टी मशीन योजनेची सुरुवात झाली आहे.
  • याद्वारे आपल्या देशात पशुपालनासाठी उत्तेजन मिळेल.
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन मोबदला जास्त मिळेल.
  • दुधातून येणाऱ्या पैशाचा उपयोग करून शेतकरी आर्थिक दृश्य सक्षम होऊ शकतो सक्षम शेतकरी सक्षम राज्य ही संकल्पना या योजनेअंतर्गत राबवली जात आहे.

कडबा कुट्टी मशीन योजनेची पात्रता(Eligibility of Kadaba Kutti Machine Yojana)

  1. कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आपल्या देशातील रहिवासी व आपल्या राज्यातील रहिवासी पाहिजे.
  2. ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे त्यामुळे या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी घेऊ शकतात.
  3. ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकर पेक्षा कमी शेती आहे तो शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  4. कडबा कुट्टी मशीन चा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी बांधवाकडे कमीत कमी दोन पाळीव प्राणी असणे आवश्यक आहे.
  5. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्याची वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  6. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे जे बँक खाते आपले आधार कार्डशी जोडले गेलेले हवे.

कडबा कुट्टी मशीन योजनेची कागदपत्रे(Requried Documents for Kadaba Kutti Machine Yojana)

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आपल्या शेतकरी बांधवांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला
  • कोणत्याही राष्ट्रकूट बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला
  • कडबा कुट्टी मशीन खरेदी केली असल्यास त्याची पावती
  • शेतकऱ्यांकडे जनावरे असतील तर त्यांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र
  • जमिनीचा ७/१२

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज कुठे करावा(How to apply for Kadaba Kutti Machine Yojana)

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण तो दोन पद्धतीने करू शकतो

१.ऑनलाइन

तर आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येईल.

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करावे.

कडबा कुट्टी मशीन योजना(Kadaba Kutti Machine Yojana)

  • शेती योजना वर क्लिक करायची आहे.
  • शेती योजना यामध्ये आपल्याला कडबा कुट्टी मशीन योजना शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट होईल.
  • युजरनेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉगीन करायचे आहे.
  • नोंदणी करण्यासाठी लॉगिन बटन वर क्लिक करावे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पान ओपन होईल.
  • त्यामध्ये आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे जसे की नाव पत्ता बँकेची माहिती इत्यादी
  • आपली सर्व माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत.
  • त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करणे गरजेचे आहे.


२. ऑफलाइन

आता बघुयात आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करता येईल.

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथे आसपास जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जाऊन पशुसंवर्धन विभागातून आपल्याला अर्जाची मागणी करावयाची आहे.
  • पशुसंवर्धन विभागातून आपल्याला अर्ज मिळेल त्या अर्जासोबत आपल्याला आपली कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज पूर्ण भरून कागदपत्रे व्यवस्थित जोडून आपल्याला पशुसंवर्धन विभागांमध्येअर्ज पूर्ण भरून कागदपत्रे व्यवस्थित जोडून आपल्याला पशुसंवर्धन विभागामध्ये जमा करायचा आहे.




निष्कर्ष

तर आपण बघितले की आपल्या शेतकरी मित्रांना 100% अनुदान असलेले कडबा कुट्टी मशीन दिले जात आहे. या कडबा कुट्टी मशीन चा उपयोग करून शेतकरी आपल्या पाळीव प्राण्यांना हिरवा चारा खाऊ घालू शकतात .या मुळे शेतकऱ्यांचे श्रम वाचणार आहेत व वाया जाणार हिरवा चारा शेतकऱ्या शेतकरी तोडून घातल्यामुळे हिरव्या चाऱ्याचे नुकसान टाळता येणार आहे .यामुळे पाळीव प्राण्यांच्या दुधामध्ये वाढ होणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्थिक फायदा होणार आहे.

आशा आहे की आपल्यालाही हा लेख आवडला असेल. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणास सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कडबा कुट्टी मशीन चे कागदपत्रे कोणती आहेत ,त्यासाठी अर्ज कसा करावा.शेतकरी मित्रांना ही विनंती आहे की हा लेख जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना कडबा कुट्टी मशीन ची खरोखर गरज आहे त्या शेतकऱ्यांना कडवा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.धन्यवाद…!

FAQ :-

१.कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाणार आहे?

उत्तर -कडबा कुट्टी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे की जे 20 हजारापर्यंत असेल.

२.कडबा कुट्टी मशीन योजने अंतर्गत कडबा कुट्टी मशीन कधी मिळणार?

उत्तर- या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला पाच वर्षात पर्यंत अनुदान मिळेल व त्यातून आपण कडबा कुट्टी मशीन घेऊ शकतो त्यासाठी त्वरित अर्ज करा.

३.कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे?

उत्तर-कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत 30 टक्के महिला व ३% टक्के अपंग अशा जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्याद्वारे या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

हे देखील वाचा :-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.