Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) विषयी थोडक्यात :-
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आपले स्वागत आहे.
कमी उत्पन्न असलेल्या अशा गरीब कुटुंबांना मोफत व दर्जेदार अशी वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या हेतूने MJPJAY ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना मोफत वैद्यकीय सेवा पुरवते प्राथमिक उपचारासह चांगल्या डॉक्टरांचे सल्ले तसेच शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी ज्यांना हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे त्यांना त्या गोष्टी या योजनेतून पुरवल्या जातात. ही योजना सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना (RGJAY) या नावाने सुरू करण्यात आली होती. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सोनिया गांधी तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शकुंतला भगत या लाभार्थीला योजनेत समाविष्ट केल्याचे कार्ड देण्यात आले, व त्यांचा सत्कार करण्यात आला.
०२ जुलै २०१२ रोजी राजीव गांधी जीवनदायी योजना या नावे ही योजना सुरू करण्यात आली आणि दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयामुळे तिचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले. MJPJAY महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभार्थीला हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर वैद्यकीय सेवेसाठी येणारा खर्च भागवण्यासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. 1,50,000 चा विमा रक्कम असेल व रु. 1,50,000 चे वार्षिक कव्हरेज एखाद्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला कॅशलेस हॉस्पिटलायझेशनद्वारे मिळू शकते.
Table of Contents
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची ठळक मुद्दे((Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Important Points)
योजनेचे नाव | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना |
योजनेचा उद्देश | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा सुविधा पुरवणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.jeevandayee.gov.in/ |
एका आर्थिक वर्षांमध्ये किती विमा मिळणार आहे ? | एका आर्थिक वर्षांमध्ये रुपये पाच लाखापर्यंत विमा मिळणार आहे आणि यासाठी अधिक पैशाची तरतूद सरकारने केली आहे. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma jyotiba Phule Jan Arogya Yojna अंतर्गत नाव नोंदणी कशी करावी :-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नोंदणी | mahatma jyotiba phule jan arogya yojna nondani
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी व्यक्तीला शासकीय रुग्णालयात जाऊन तज्ञ डॉक्टरांकडून प्रथम रोगासंबंधी तपासणी करून घेणे आवश्यक आहे व रोगाचे निदान झाल्यावर त्या रोगासाठी लागणाऱ्या खर्चाचा तपशील डॉक्टरांकडून घेणे गरजेचे आहे.
- आणि लागणाऱ्या खर्चाचा तपशील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य मित्राच्या मदतीने ऑनलाईन अर्ज भरताना तो तपशील भरून देणे आवश्यक आहे.
- यामध्ये त्या आजारासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरांचा खर्च, प्रवासभाडे, औषधे या सर्व खर्चाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर केली जाते.
- त्यानंतर आजारी व्यक्तीचा इलाज होतो.
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या आजाराचे निदान मोफत केले जाते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उद्दिष्ट :- (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024)
राज्यातील प्रत्येक नागरिकाला गंभीर आजारांवर दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करणे हा मुख्य उद्देश या योजने मागे आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रितपणे राबवल्या जातात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजणे साठी आवश्यक कागदपत्रे :- (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 )
रेशनकार्ड (केशरी/पिवळा/पांढरा) याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खालीलपैकी कोणते केवायसी KYC दस्तऐवज सबमिट करणे आवश्यक आहे ते खाली देत आहोत :
- पॅन कार्ड.
- वाहन चालविण्याचा परवाना.
- आधार कार्ड.
- मतदार ओळखपत्र.
- अपंगांचे प्रमाणपत्र.
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक छायाचित्रासह.
- कॉलेज आयडी.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
- शाळा ओळखपत्र.
- दोन पेक्षा जास्त अपत्य नको.
- आरोग्य कार्ड.
- एक लाखापेक्षा कमी उत्पन्न हवे.
- पासपोर्ट असल्यास पासपोर्ट.
- स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र.
- ज्येष्ठ नागरिक असल्याचा पुरावा.
- नवजात बालकाच्या बाबतीत,
जर पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्डावर नाव आणि फोटो उपलब्ध नसेल तर, पालकांपैकी एकासोबत मुलाचा फोटो आणि त्यासोबत मुलाच्या जन्माचा दाखला सादर करावा.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पात्रता :-
(Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana)
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना दवाखाना यादी | mahatma jyotiba phule jan arogya yojna
योजनेचा लाभ कुणाला ?
श्रेणी | लाभार्थी तपशील |
पहिली श्रेणी | यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नागरी पुरवठा विभागाने जारी केलेल्या विशिष्ट प्रकारच्या शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांचा समावेश होतो, यामध्ये पिवळे रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना (AAY) कार्ड, अन्नपूर्णा कार्ड / केशरी रेशन कार्ड (वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखांपर्यंत एका कुटुंबासाठी) समाविष्ट आहे. |
दूसरी श्रेणी | यामध्ये महाराष्ट्रातील 14 कमी पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यांतील शेतकरी आणि कृषी कामगारांचा समावेश आहे. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि अमरावती हे विशिष्ट जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधील पांढरी शिधापत्रिका असलेली कुटुंबे या श्रेणीमध्ये पात्र आहेत. |
तिसरी श्रेणी | या श्रेणीत सरकारी अनाथाश्रमातील मुले, सरकारी आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी, सरकारी महिला आश्रमात राहणाऱ्या महिला कैदी, सरकारी नर्सिंग होममध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक, तसेच DGIPR ने मंजुर केलेले पत्रकार आणि त्यांचे कुटुंब यांचा समावेश आहे. बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेले बांधकाम कामगार. |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने साठी नोंदणी कशी करावी. (How to apply for Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) :-
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी करायची असल्यास आपल्याला नोंदनीकृत असणाऱ्या दवाखान्यामधील आरोग्य मित्राला भेटणे आवश्यक आहे. प्रत्येक दवाखान्यासाठी एक आरोग्य मित्र या योजनेअंतर्गत नियुक्त केलेला आहे. आरोग्य मित्र आपल्या इलाजासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व अर्ज भरणे ही सर्व काम करतात.तसेच दावाखान्यांमध्ये उपचारादरम्यान देखील आपल्याला मदत करतात.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट रुग्णालये :-
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक बेड असणारी शासकीय, निमशासकीय, खासगी तसेच धर्मदाय संस्था अशा एकूण 973 रुग्णालयांचा समावेश यामध्ये आहे.
रुग्णालयांची निवड करण्यासाठी काही निकष लावली गेली आहेत त्यांनी निकषांचे तंतोतंत पालन करण्यात आलेले आहे त्यामुळे लाभार्थी व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार राज्यातील कुठल्याही अधिकृत अशा रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतो. (महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी)
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी जोडली गेलीली दवाखाना लिस्ट साठी खाली क्लिक करा.
महात्मा फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojna या योजनेमधील आजारांची यादी पुढे देत आहोत :-
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 आजार यादी
- हृदयरोग.
- न्यूरोलॉजी.
- प्लास्टिक सर्जरी.
- मानसिक आजार.
- इंडोक्रायनोलॉजी.
- नेत्ररोग शस्त्रक्रिया.
- बालरोग शस्त्रक्रिया.
- अस्थिव्यंग शस्त्रक्रिया.
- सर्व साधारण शस्त्रक्रिया.
- संधिवात संबंधी उपचार.
- त्वचारोगांवरील उपचार.
- इंटरवेन्शनल रेडिओलोजी.
- अंत:स्राव संस्थेचे विकार.
- प्रजनन व मुत्ररोग शस्त्रक्रिया.
- स्त्री रोग व प्रसूति शस्त्रक्रिया.
- प्रजनन व मुत्ररोग शस्त्रक्रिया.
- कर्करोगांवरील औषध उपचार.
- हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार.
- आतड्याच्या विकारावरील शस्त्रक्रिया.
- नाक कान घसा यांवरील शस्त्रक्रिया व औषध उपचार.
- जबरा व चेहऱ्याच्या अस्थींवरील वरील शस्त्रक्रियाकर्करोगावरील शस्त्रक्रिया व उपचार. mahatma jyotiba phule ajarachi yadi
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 यामध्ये यापूर्वी दीड लाख रुपये विमा होता परंतु आता सरकारने या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच विमा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आता आपल्याला एका आर्थिक वर्षांमध्ये रुपये पाच लाखापर्यंत विमा मिळणार आहे आणि यासाठी अधिक पैशाची तरतूद सरकारने केली आहे.
निष्कर्ष :-
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024) आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आजार यादी, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबरोबर जोडली गेलीली दवाखान्यांची लिस्ट आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
FAQ’s :-
१. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी कोण पात्र आहेत ?
उत्तर – पांढरे/केशरी/पिवळे या तीन पैकी कोणतेही रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड (AAY) / अन्नपूर्णा कार्ड असावे.
२. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये यापूर्वी दीड लाख रुपये विमा होता परंतु आता सरकारने या योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे
उत्तर – आता आपल्याला एका आर्थिक वर्षांमध्ये रुपये पाच लाखापर्यंत विमा मिळणार आहे आणि यासाठी अधिक पैशाची तरतूद सरकारने केली आहे.
३. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी दवाखाना लिस्ट साठी कुठे बघावी ?
उत्तर –महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी जोडली गेलीली दवाखाना लिस्ट
हे पण वाचा :-
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजने चा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना | Mahila Samrudhhi Karj Yojna | अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
सरकार देत आहे मोफत घरे त्यासाठी वाचा रमाई आवास घरकुल योजना २०२४ | Ramai Awas Gharkul Yojana 2024