Shet Rastyasathi Arj Kasa Karava 2024 | आजच्या काळात लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्या कारणाने जमिनी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागली जात आहे. जमिनीची विभागणी जसजशी वाढत आहे, तसतशी शेत रस्त्यांची (Shet Rasta) मागणी वाढत आहे, कारण जमीनच्या मालकांसाठी त्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध व्हावा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे कारण त्याच वेळी त्याच्या जमिनीला भाव असेल ज्यावेळी त्या जमिनीला रस्ता असेल. त्यामुले रस्त्यांची मागणी वाढतच राहणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीने तुमचा रोजचा जाण्याचा शेतरस्ता अडवला आणि तो तुम्हाला त्या रस्त्यावरून जाण्यास अडसर निर्माण करत असेल, तर तुम्ही कायदेशीर मार्गाचा वापर करून हि समस्या सोडवू शकता. चला तर मग जाणून घ्या आमच्यासोबत कसा करावा यावर उपाय कायदेशीररीत्या!
शेत रस्त्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि कायदेशीर मागणी. | Shet Rastyasathi Arj Kasa Karava 2024
शेतकरी नवीन शेतरस्त्यासाठी तहसीलदाराकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करताना खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
- शेत रस्त्याचा कच्चा नकाशा- रस्त्याचा प्रस्तावित मार्ग दाखवणारा प्राथमिक नकाशा.
- शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा- अधिकृत मोजणी करून तयार केलेला नकाशा.
- चालू वर्षातील सातबारा उतारा- अर्जदाराच्या जमिनीचा सातबारा उतारा, जो तीन महिन्यांच्या आतला असावा.
- लगतच्या शेतकऱ्यांची माहिती- शेत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते, व त्यांच्या जमिनीचा तपशील.
- न्यायालयीन वादाची माहिती (जर असेल तर)- अर्जदाराच्या जमिनीवर काही न्यायालयीन वाद असेल, तर त्याची कागदपत्रांसहित माहिती सादर करावी.
शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करावा.
- तहसीलदार कार्यालयात अर्ज साध्या पेपरवर सादर करावा.
- अर्जात आपल्या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता आवश्यक असल्याचे स्पष्ट कारण द्यावे.
- अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडावीत.
- अर्जाचा नमुना.
- अर्जाचा नमुना तुम्ही तहसीलदार कार्यालयातून किंवा ऑनलाईन PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. त्यात आपल्या जमिनीबद्दल सविस्तर माहिती देऊन रस्ता मिळवण्यासाठी कारण नमूद करावे.
- अर्ज सादर केल्यानंतर, संबंधित तहसीलदार अधिकारी शेतरस्त्याची मागणी तपासतील आणि योग्य ती कारवाई करतील.
शेत रस्त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने खाली देत आहोत.
१. महसूल विभागाच्या वेबसाइटवर जा.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकवर क्लिक करून महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर जा.
- नोंदणी करा. (Registration).
जर तुम्ही आधीच नोंदणी केलेली नसेल, तर प्रथम तुम्हाला नवीन खाते (New User) तयार करावे लागेल.
“New User Registration” किंवा “Citizen Login” वर क्लिक करून आपले नाव, मोबाइल नंबर, ईमेल, आणि इतर आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन घ्या.
- लॉगिन करा (Login).
नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून पोर्टलमध्ये लॉगिन करा.
- शेत रस्ता अर्ज बटनावर क्लिक करा.
लॉगिन केल्यानंतर, तिथे उपलब्ध असलेल्या सेवांच्या यादीतून “शेत रस्ता” शोधा.
आणि त्यानंतर “Apply” \ “अर्ज करा” वर क्लिक करावे.
- अर्ज संपूर्ण भरा.
अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील जसे कि नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक इत्यादी भरावा.
- लागणारी कागदपत्रे अपलोड करा (Upload the documents)
अर्जासोबत हि पुढे दिलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतात,
- शेत रस्त्याचा नकाशा.
- शेत जमिनीचा मोजणीचा नकाशा.
- चालू वर्षाचा सातबारा उतारा.
- व इतर संबंधित कागदपत्रे.
- भरावयाची फी (Payment)
अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. हे तुम्ही ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे देखील भरू शकता.
७. अर्ज सबमिट करताना submit या बटनावर क्लिक करून अर्ज करावा (Submit Application)
सर्व दिलेली माहिती आणि कागदपत्रे एकदा तपासून घ्या व तपासल्यानंतर अर्ज सबमिट करून टाकावा.
८. शेवटी अर्जाची पावती घ्यायला विसरू नका.
अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती (Acknowledgment) मिळेल. ही पावती पुढील कामकाजाकरिता केलेल्या अर्जाचा पुरावा म्हणून सांभाळून ठेवा.
९. पाठपुरावा करा (Track the Application)
तुम्ही केलेल्या अर्जाच्या स्थितीचा पाठपुरावा करण्यासाठी पोर्टलवरचा अर्ज क्रमांक वापरून त्याची प्रगती पाहू शकता.
शेत रस्त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक
या स्टेप्स फॉलो करून तुम्ही शेत रस्त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. (Shet Rasta Magni Arj in marathi)
शेत रस्त्याची कायदेशीर मागणी दाखल केल्यानंतर तहसीलदारांकडे यापुढील प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. | Shet Rastyasathi Arj Kasa Karava 2024.
- तहसीलदाराकडे अर्ज दाखल करणे.
तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल झाल्यानंतर, अर्जाच्या तपासणीकरिता ते नोटीस बजावतात. अर्जदाराच्या शेताला लागून असलेल्या शेतकऱ्यांना ह्या नोटीसचा फायदा होतो आणि त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. - शेत रस्त्याची गरज आहे कि नाही याची पडताळणी.
तहसीलदार शेत रस्त्याच्या नकाशावरून किमान किती फूटाचा रस्ता आवश्यक आहे, याची पडताळणी करतात. - शेत रस्त्याची पाहणी दौरा.
तहसीलदार स्वतः शेत रस्त्याची पाहणी करतात, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेता येईल. - काही ठराविक प्रश्नांची उत्तरे ते मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. जसे कि,
- शेतरस्त्याची खरोखर आवश्यकता आहे का?
- अर्जदाराच्या शेताचे आधीचे मालक कोणत्या मार्गाचा वापर करत होते?
- कोणता मार्ग सर्वात जवळचा आहे?
- मागणी केलेला रस्ता सरळ बांधावरून जातो का?
- दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे का?
- लगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी.
तहसीलदार हे तपासतात की अर्जदाराला नवीन रस्ता दिल्यास लगतच्या शेतकऱ्यांना होणारे नुकसान किती असेल. - रस्ता देण्याचा आदेश
सर्व आवश्यक तपासण्या करून, जर तहसीलदारांना शेत रस्त्याची देण्याची गरज पटली तर ते नव्या शेत रस्त्याचा आदेश देतात. हा रस्ता शेताच्या बांधावरून चार-चार फुट रुंदीचा असू शकतो. गाडी रस्त्यासाठी ही रुंदी आठ ते बारा फूट असू शकते. - रस्ता नोंदविणे
शेत रस्ता दिल्यानंतर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेतली जाते. शेतीच्या हद्दीत रस्ता घेतल्यास, त्याची नोंद वाजवी पुल अर्ज या सेक्शन मध्ये केली जाते. - अपील व दिवाणी न्यायालयातील दावा
तहसीलदारांच्या निर्णयाविरुद्ध जर एखाद्याला आक्षेप असेल, तर 60 दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अपील दाखल करता येते. अन्यथा, एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा देखील दाखल केला जाऊ शकतो.
या प्रक्रियेमुळे, योग्य आणि गरजेनुसार शेतकऱ्यांना रस्ता दिला जातो, आणि कोणताही वाद उद्भवल्यास त्यावर न्यायालयात किंवा अधिकाऱ्यांमार्फत उपाय केले जाऊ शकतात.
निष्कर्ष | Shet Rastyasathi Arj Kasa Karava 2024.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Shet Rastyasathi Arj Kasa Karava 2024 | शेत रस्त्यासाठी कायदेशीर रित्या मागणी अर्ज कसा करावा? जाणून घ्या आमच्यासोबत! याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. | {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. सरकार देत आहे 10 लाख पर्यंत कर्ज,60% सबसिडी सोबत,असा अर्ज करा आणि आपला व्यवसाय सुरु करा | {Nabard Dairy Loan 2024}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
Maharashtra Farmer Scheme 2024 : या शेतकर्यांना मिळणार ट्रॅक्टर घेण्यासाठी 90% अनुदान लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Maharashtra Farmer Scheme 2024 हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. | {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.