Gruhnirman Sanstha Nondani 2024 | गृहनिर्माण संस्थेच्या नियमांनुसार, 51 टक्के सदनिकांची विक्री झाल्यानंतर सोसायटीची नोंदणी अनिवार्य आहे. मात्र, अनेक बिल्डर्स या नियमांचे पालन करत नाहीत. त्याऐवजी, फ्लॅट्स विकत देताना ते सदनिकाधारकांकडून एक ते तीन वर्षांचा मेंटेनन्स अगोदर घेतात. हि व्यवहाराची पद्धत चुकीची असून, इथूनच फसवणुकीला सुरुवात होते. अगोदर मेंटेनन्स घेऊन, बिल्डर्स काही लाखांची रक्कम गोळा करतात आणि त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. परिणामी, ते सोसायटीच्या नोंदणीला दुर्लक्ष करून, आवश्यक सुविधांची सोय करत नाहीत. अनेक वेळा, छोटी-मोठी कामे मुद्दाम अपूर्ण ठेवली जातात, त्यामुळे सदनिकाधारकांची गैरसोय होते.
काही ठिकाणी सभासद स्वतःहून मेंटेनन्स गोळा करण्यास सुरुवात करतात, पण हे बेकायदेशीर आहे कारण सोसायटीची नोंदणी झालेली नसल्याने असे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
दुसरीकडे, काही प्रसंगी बिल्डर सोसायटीची नोंदणी करण्यास तयार असतो, पण काही सभासदांच्या तक्रारी तसेच विरोधामुळे हि प्रक्रिया रखडते. ज्याच्यामुळे 1-2 वर्षे सहजपणे निघून जातात आणि बिल्डरला त्याच्या मर्जीतील कमिटी सदस्य निवडण्याची संधी मिळते.
सोसायटीची नोंदणी झाल्यावरच, अपूर्ण कामांच्या तक्रारींना कायदेशीर आधार मिळतो, व बिल्डरला लेखी सूचनेद्वारे उत्तर मागता येते.
गृहनिर्माण प्रकल्प उभारत्यावेळी बिल्डरवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्यातलीच एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करणे. जेव्हा प्रकल्पातील किमान 51% सदनिका विकल्या जातात, त्यावेळी पुढील चार महिन्यांमध्ये सोसायटीची नोंदणी करणे बिल्डरला बंधनकारक असते. बांधकाम सुरू असतानादेखील किंवा भोगवटा दाखला मिळण्याच्या अगोदरही नोंदणी करता येते, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे सदनिकाधारकांच्या हिताचे असते. मात्र, सोसायटीची नोंदणी झाली म्हणजे बिल्डरची जबाबदारी संपली, असे नाही. मोफा कायदा आणि रेरा कायद्यानुसार त्याला अजूनही अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. Gruhnirman Sanstha Nondani 2024.
गृहनिर्माण संस्था नोंदणीची किमान अट- Gruhnirman Sanstha Nondani 2024.
गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी किमान पाच सदनिकाधारकांचा गट किंवा एकूण सदनिकांच्या 51% मालक एकत्र येऊ शकतात. एकाच प्रकल्पामध्ये अनेक इमारती असतील, तर प्रत्येक इमारतीची स्वतंत्र नोंदणी करता येते, पण एकत्रित नोंदणी असणे हे कधीहीफायदेशीर ठरते. जिथे एकापेक्षा अधिक संस्था असतात, तिथे सामायिक सोयी-सुविधांच्या व्यवस्थापनासाठी गृहनिर्माण संघ स्थापन करणे गरजेचे ठरते.
सोसायटी नोंदणीचे फायदे | Cooperative Housing Society Registration
- सदनिकाधारकांचा एक आवाज- गृहनिर्माण संस्था म्हणजे सर्व सदनिकाधारक एकत्र येऊन बिल्डरवर त्यांच्या हक्कांच्या पूर्ततेसाठी दबाव टाकण्याचा एक रास्त मार्ग आहे. बिल्डर साधारणपणे संस्था नोंदणी टाळून सदनिकाधारकांची फसवणूक करू पाहत असतो.
- जमीन हस्तांतरण- नोंदणी झाल्यानंतर चार महिन्यांत इमारतीची जमीन संस्थेच्या नावावर घेणे शक्य होते, ज्यामुळे बिल्डरला बांधकाम आराखड्यामध्ये बदल करणे कठीण जाते.
- पार्किंगची वाटप- पार्किंगसारख्या सुविधांचा गैरवापर टाळण्यासाठी आणि सदनिकाधारकांची फसवणूक थांबवण्यासाठी, संस्थेला अधिकृत जबाबदारी मिळते.
- सदनिकांची विक्री प्रक्रियेत संरक्षण- संस्था नोंदणीकृत झाल्यावर, सदनिकाधारकांकडून कोणत्याही प्रकारचे अनावश्यक शुल्क उकळण्याची बिल्डरची शक्यता येथेच कमी होते.
- कायद्याचा आधार- जर बिल्डरने त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत, तर सदनिकाधारकांना कायदेशीररित्या एकत्र येऊन त्याच्यावर कारवाई करता येते.
- मेंटेनन्स नियंत्रण- नोंदणी झाल्यावर बिल्डरला मेंटेनन्स घेण्याची गरज राहत नाही, कारण संस्था स्वतः मेंटेनन्सची जबाबदारी घेते, ज्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवता येतो.
- रेरा नोंदणीचे लाभ: जर प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणीकृत असेल आणि बिल्डरने प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी नसेल, तर संस्थेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेता येतो.
- मेंटेनन्सची वसुली- सोसायटीची नोंदणी झाल्यानंतर, सदनिकाधारकांकडून आणि बिल्डरकडून मेंटेनन्स वसुल करणे सहज शक्य आणि सोपे होते.
सोसायटीची नोंदणी लवकर करणे हे सदनिकाधारकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहेच पण, बिल्डरने अपूर्ण कामे ठेवली असली, तरी कायदेशीर नोटीसद्वारे त्याला जबाबदारी पार पाडण्यासाठी भाग पाडता येते.
सोसायटीची नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रक्रिया वापरता येते | Gruhnirman Sanstha Nondani 2024
- सदनिकाधारकांची एकत्रित सभा बोलवणे.
प्रथम सभा- सर्व सदनिकाधारकांची एक बैठक आयोजित करावी. या सभेत सोसायटी स्थापन करण्याची चर्चा घडून आणावी .
मुख्य प्रवर्तकाची निवड- सभेत एक चेअरमन (chairman) निवडला जातो, जो सोसायटीच्या नोंदणीची प्रक्रिया पुढे नेतो.
- सोसायटीचे प्रारूप तयार करणे.
सोसायटीसाठी नाव (name) निश्चित करणे.
सोसायटीचे उपनियम तयार करावेत. सहकारी संस्था निबंधक (Registrar of Co-operative Societies) कडून यासाठीचा नमुना पत्रक मिळते.
सोसायटीच्या उद्दिष्टांचा मसुदा तयार करावा, ज्याच्यामध्ये सोसायटीचा मुख्य हेतू स्पष्ट लिहावा (जसे की सदनिकाधारकांना सोयीसुविधा पुरवणे).
- सोसायटीचे बँक खाते उघडणे.
सोसायटीच्या नावाने बँकेत खाते उघडावे. हे खाते उघडण्यासाठी चेअरमन ची परवानगी लागते.
प्रत्येक सदनिकाधारकाकडून प्रवेश शुल्क (Entry Fee) आणि भाग भांडवलाची रक्कम (Share Capital) गोळा करावेत. प्रवेश शुल्क हे सहकारी संस्थांच्या नियमांनुसार असावे.
- नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे- सोसायटी नोंदणीसाठी खालील कागदपत्रे तयार करावीत जसे कि,
- अर्ज- निबंधकाकडे संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज करावा.
- सर्वसाधारण सभेचा ठराव- सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव, जसे की सोसायटी स्थापन करणे, चेअरमनपदी निवड, इ.
- सदनिकाधारकांची यादी- प्रत्येक सदस्याचे नाव, पत्ता, फ्लॅट क्रमांक, आणि स्वाक्षरी असलेली यादी.
- भाग भांडवलाची यादी- प्रत्येक सदस्याने जमा केलेल्या रकमेचा तपशील द्यावा .
- सोसायटीचे उपनियम- सोसायटीच्या उपनियमांचा तयार मसुदा.
- बँक खात्याचे तपशील- सोसायटीच्या नावाने उघडलेल्या बँक खात्याचा तपशील.
- सोसायटी निबंधकाकडे अर्ज सादर करणे.
सोसायटी नोंदणीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सोसायटी निबंधक (Registrar of Co-operative Societies) यांच्याकडे सादर करावीत.
अर्ज सादर करतेवेळी अर्ज फी भरावी लागते.
- नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे.
- निबंधक अर्ज तपासतात आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेतात.
- जर सर्व काही नियमांनुसार असेल, तरच निबंधक सोसायटीला नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) देतात.
- नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर सोसायटी अधिकृतपणे स्थापन होते.
- सोसायटीची पहिली सभा (First General Body Meeting).
- नोंदणीनंतर पहिली सर्वसाधारण सभा (First General Body Meeting) आयोजित करावी लागते.
- या सभेत सोसायटीचे पदाधिकारी निवडावे लागतात, जसे की अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार).
- सोसायटीचे व्यवस्थापन आणि नियमांचे पालन करण्यासाठी योग्य उपाययोजना ठरवाव्या लागतात.
- सोसायटीचे दैनिक कामकाज सुरू करणे.
नोंदणी झाल्यानंतर सोसायटीचे नियम आणि उपनियमांनुसार मेंटेनन्स गोळा करणे, खर्चाचे व्यवस्थापन करणे, आणि सोसायटीची इतर कामे चालवणे सुरू करावे लागते.
सोसायटीची नोंदणीसाठी लागणारी काही महत्त्वाची कागदपत्रे | Gruhnirman Sanstha Nondani 2024.
- विकासकाकडून आवश्यक कागदपत्रे, जसे की प्रकल्पाचा आराखडा, जमीन खरेदीचा कागद, पाण्याची व विजेची व्यवस्था यासंबंधित दस्तऐवज)
- सोसायटीचे सदस्यत्व स्वीकारण्याचे पत्र.
- 51% सदनिकाधारकांचे सहमति पत्र.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, गृहनिर्माण सोसायटी कायदेशीररित्या अस्तित्वात येते.
सोसायटी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा | Gruhnirman Sanstha Nondani 2024.
- वेबसाइटवर जा.
महाराष्ट्र सहकारी संस्था नोंदणी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://sahakarayukta.maharashtra.gov.in/
- नोंदणीसाठी लॉगिन करावे.
वेबसाइटवर लॉगिन करा किंवा नवीन वापरकर्ता असल्यास “New User Registration” वर क्लिक करून खाते तयार करुण घ्यावे.
- अर्ज सिलेक्ट करावा.
एकदा लॉगिन केल्यावर, सोसायटी नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म निवडा. “Co-operative Housing Society Registration” हा फॉर्म सिलेक्ट करुण घ्या.
- आवश्यक ती माहिती भरा.
अर्जामध्ये सोसायटी संबंधित सर्व आवश्यक माहिती भराव्यात. ज्यामध्ये खालील गोष्टी असू शकतात,
- सोसायटीचे नाव.
- प्रकल्पाचा पत्ता.
- सदस्यांची माहिती (किमान 5 सदस्यांची माहिती द्यावी.)
- अध्यक्ष, सचिव, आणि खजिनदारांची माहिती.
- सोसायटीचा उद्देश काय आहे तो द्यावा.
- प्रस्तावित सोसायटीची रचना आणि व्यवस्थापन.
- डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, ज्यामध्ये खालील गोष्टी लागतील.
- सोसायटीचे प्रस्ताव पत्र.
- सदनिकाधारकांची नावे, पत्ते, आणि स्वाक्षर्या.
- जमीन संबंधी कागदपत्रे लागतील, जसे की 7/12 उतारा किंवा संपत्तीचे कागदपत्र.
- प्रकल्पाचा नकाशा.
- बिल्डरचे No Objection Certificate (NOC).
- बँक स्टेटमेंट.
- अर्ज फी
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी नोंदणी फी ऑनलाइन पद्धतीने भरावी, ही फी सहकारी संस्था नोंदणीसाठी लागते.
- फॉर्म सबमिट करा.
सर्व माहिती आणि डॉक्युमेंट्स भरल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट करुन टाकावा .
- नोंदणी क्रमांक प्राप्त करा
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक दिला जाईल. हा क्रमांक वापरून तुम्ही नोंदणीची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकता.
- काही या व्यतिरिक्त माहिती मागविली तर,
सम्बन्धित विभागाकडून जर कोणतीही या व्यतिरिक्त माहिती मागवली, तर ती त्यांनी दिलेल्या वेळेत अपलोड करावी.
- प्रमाणपत्र प्राप्त करा
सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला ऑनलाइन मिळेल.
याप्रमाणे, ऑनलाइन पद्धतीने सोसायटी नोंदणी करणे सहज शक्य आहे.
निष्कर्ष | Gruhnirman Sanstha Nondani 2024.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Gruhnirman Sanstha Nondani 2024 | गृहनिर्माण संस्थेची नोंदणी कधी व का करावी आणि नोंदणीचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात? याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. | {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. सरकार देत आहे 10 लाख पर्यंत कर्ज,60% सबसिडी सोबत,असा अर्ज करा आणि आपला व्यवसाय सुरु करा | {Nabard Dairy Loan 2024}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
Maharashtra Farmer Scheme 2024 : या शेतकर्यांना मिळणार ट्रॅक्टर घेण्यासाठी 90% अनुदान लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Maharashtra Farmer Scheme 2024 हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. | {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.