birsa munda krishi kranti yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

birsa munda krishi kranti yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये केलेल्या सुधारणा जाणून घेऊ !
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विविध घटकांसाठी अधिक अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.

यामध्ये विहिरी, शेततळे, वीज जोडणी यांसारख्या बाबींसाठी आता अधिक आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. सुधारित निर्णयानुसार, नवीन सिंचन विहिरींसाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळेल, तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी १ लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल. यापूर्वी हे अनुक्रमे २.५ लाख आणि ५०,००० रुपये होते आता यात वाढ केलेली आहे.

इनवेल बोअरिंगसाठी ४०,००० रुपये आणि यंत्रसामुग्रीसाठी ५०,००० रुपये अनुदान दिले जाईल. परसबागेकरिता ५,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

नवीन विहिरींबाबत १२ मीटर खोलीची अट आता रद्द करण्यात आली आहे, तसेच दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अट देखील काढून टाकण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिकसाठी आता प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल, जे कमी असेल ते देण्यात येईल.

तुषार सिंचनासाठी आधी २५,००० रुपये अनुदान होते, आता ते वाढवून ४७,००० रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के अनुदान दिले जाईल. ठिबक सिंचन संचासाठी ९७,००० रुपये किंवा ९० टक्के खर्चावर आधारित अनुदान दिले जाईल.

याशिवाय, या योजनेमधील इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, आणि नवीन घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये सुधारणा या द्वारे करण्यात येईल.

birsa munda krishi kranti yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना-बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील अनुदान आणि निकषांचे सुधारित विवरण –

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत (Birsa Munda Krishi Kranti yojna) अनुदान वाढविण्यात आले असून, निकषांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे, तसेच विविध घटकांसाठी असणाऱ्या अटी आणि शेतीमध्ये बदल केलेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – सुधारित अनुदान आणि निकष –

  1. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण –

अनुदान – प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा ₹2 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून दिले जाईल.

  1. इनवेल बोअरिंग-

अनुदान – ₹40,000.

  1. वीज जोडणी –

अनुदान – प्रत्यक्ष रकमेच्या 90% किंवा ₹20,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन (10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत)-

अनुदान – प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा ₹40,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. सोलार पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)-

अनुदान: प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा ₹50,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. एचडीपीई/पीव्हीसी पाईप-

अनुदान: प्रत्यक्ष खर्चाच्या 100% किंवा ₹50,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. तुषार सिंचन संच-

अनुदान: प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा ₹47,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. ठिबक सिंचन संच-

अनुदान: प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा ₹97,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. तुषार सिंचन पुरक अनुदान-

अल्प/अत्यल्प भूधारकांसाठी- 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 10%.

बहुभूधारकांसाठी- 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15% किंवा ₹47,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. ठिबक सिंचन पुरक अनुदान-

अल्प/अत्यल्प भूधारकांसाठी- 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 10%.

बहुभूधारकांसाठी- 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15% किंवा ₹97,000 यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देण्यात येईल.

  1. यंत्रसामुग्री (बैलांसाठी असणारी/ट्रॅक्टरला लागणारी अवजारे)-

यांकरिता अनुदान म्हणून ₹50,000 देण्यात येतील.

  1. परसबागेसाठी-

यासाठी अनुदान म्हणून ₹5,000 देण्यात येतील.

याशिवाय, वार्षिक उत्पन्नासाठीची ₹1,50,000 मर्यादा रद्द करण्यात आली आहे.

महाडीबीटी पोर्टल :- https://mahadbt.maharashtra.gov.in/

birsa munda krishi kranti yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना-ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन जाणून घेऊयात-


ऑनलाईन अर्ज करावा हे जाणून घेण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
[मार्गदर्शक सूचना PDF डाउनलोड करा]

birsa munda krishi kranti yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना -संपर्क क्रमांक :-


📞 022-49150800

birsa munda krishi kranti yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना-अधिक माहिती :-


आपल्या जवळच्या पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली birsa munda krishi kranti yojana:बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.