ek desh ek nivadnuk yojana 2024-“एक देश, एक निवडणूक” च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !

ek desh ek nivadnuk yojana 2024:एक देश एक निवडणूक योजना २०२४

“एक देश, एक निवडणूक”(ek desh ek nivadnuk yojana 2024:एक देश एक निवडणूक योजना २०२४) च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने तयार केलेला एक महत्त्वाचा असा अहवाल “एक देश, एक निवडणूक” (One Nation One Election) या विषयावर मार्च २०२४ मध्ये केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने या अहवालावर तपशीलवार चर्चा करून आज या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याच्या संकल्पनेला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे.

१९५१ ते १९६७ पर्यंत भारतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात येत असत, ज्यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होता आणि विकासकामे ही सुरळीत पार पडत होती. मात्र, त्यानंतर विविध कारणांमुळे निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेतल्या जाऊ लागल्या. पण १९९९ साली विधी आयोगाने देशात पुन्हा एकदा एकाचवेळी निवडणुका घेण्याची शिफारस केली होती, ज्यामुळे निवडणुकांवर होणारा खर्च, प्रशासनावरचा ताण, आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कमी होईल. याशिवाय, निवडणुका सतत चालू राहिल्याने विकासकामांमध्ये येणारे नेहमीचे अडथळे दूर होतील, असे आयोगाचे मत होते.

देशातील तरुणाईही एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या विचाराला समर्थन देत आहे कारण सततच्या निवडणुका झाल्यामुळे सरकारी धोरणे आणि प्रकल्पांची अंमलबजावणी अनेकदा लांबणीवर जातात. रेल्वे, रस्ते, जलप्रकल्प, शिक्षण, आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रांत विकासकामे अडकू नयेत म्हणून सततच्या निवडणुकांमधून सुटका होण्याची गरज ही आज काळाची गरज आहे, अशी आजच्या पिढीची भावना आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे काय हे जाणून घेऊयात? ‘एक देश, एक निवडणूक’ ही योजना देशातील सर्व निवडणुका – म्हणजे लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका – एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेवर आधारलेले आहे. या संकल्पनेमुळे निवडणुकांच्या मुळे होणाऱ्या गैरसोयी टाळता येतील आणि निवडणूक प्रक्रिया योग्यरीतेने पार पाडता येतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींना मान्यता दिली आहे. या समितीने विविध राजकीय पक्ष, निवडणूक आयोग, तज्ज्ञ आणि नागरिक यांच्याशी व्यापक रित्या चर्चा करून आपले निष्कर्ष मांडले आहेत.

ek desh ek nivadnuk yojana 2024:एक देश एक निवडणूक योजना २०२४-एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या शिफारशी:

१. १९५१ ते १९६७ या काळामध्ये एकाचवेळी निवडणुका घेण्याची पद्धत प्रचलित होती.
२. विधी आयोग, १९९९ – १७० व्या अहवालात विधी आयोगाने लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याची शिफारस त्यावेळी केली होती.
३. संसदीय समिती, २०१५ – या समितीने दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचा प्रस्ताव मांडला होता.

रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अनेक तज्ञ, राजकीय नेते आणि इतर आम नागरिकांशी संवाद साधून आपले निष्कर्ष मांडले आहेत. अहवालानुसार, देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यास लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
हा अहवाल https://onee.gov.in वर उपलब्ध असून नागरिकांना त्यावर चर्चा आणि प्रतिक्रिया मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंमलबजावणीची योजना काय केली आहे जाणून घेऊ –
१. पहिला टप्पा – लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे.
२. दुसरा टप्पा – सार्वत्रिक निवडणुकांच्या १०० दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे.

या संकल्पनेमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होणार असून, विकास कामांवर सततचा होणारा निवडणुकीचा परिणाम टाळता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी वापरली जाणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि सुटसुटीत होईल. या पुढच्या टप्प्यांमध्ये सर्व राज्ये आणि घटक पक्ष यांच्याशी सखोल अशी चर्चा करून देशव्यापी अंमलबजावणीचे नियोजन केले जाणार आहे.

‘वन नेशन वन इलेक्शन’ हा देशाच्या निवडणूक व्यवस्थेत मोठा बदल घडवू शकणार आहे आणि यामुळे निवडणुकीवर भंडारा प्रशासकीय खर्च कमी होणार आहे. या संकल्पनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यासाठी कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि देशभरातील नागरिकांचा सहभाग यामध्ये कसा करून घेता येईल यावर काम केले जाणार आहे.

ek desh ek nivadnuk yojana 2024
ek desh ek nivadnuk yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली ek desh ek nivadnuk yojana 2024:एक देश एक निवडणूक योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.