Godown Subsidy Scheme 2024 :गोदाम बांधकाम अनुदान २०२४ योजनेसाठी अर्ज सुरु

Godown Subsidy Scheme 2024:गोदाम बांधकाम अनुदान 2024 योजनेसाठी अर्ज सुरु

आपल्या देशात अनेक वेळा अवकाळी पाऊस पडतो.य त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीसाठी ठेवलेल्या अन्नधान्याचे प्रचंड नुकसान होते. यावर पर्याय म्हणून आपले सरकार घेऊन आले गोदाम बांधकाम अनुदान 2024 .या योजनेअंतर्गत 250 टन क्षमतेचे गोडाऊन बांधण्यासाठी आपले सरकार मदत करणार आहे. या योजनेमार्फत 50 टक्के अनुदान किंवा 12,50000/- जी कमी किंमत असेल ती सबसिडी म्हणून शेतकऱ्यांना दिली जाईल.

या योजनेला गाव तेथे गोदाम या नावाने देखील ओळखले जाते.शेतकऱ्यांचे नाश होणारे अन्नधान्य व कडधान्य साठवणूक करून त्यांना बाजार भाव वाढू पर्यंत त्याचे जतन करणे.हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे या योजनेअंतर्गत शेतकरीचे मुख्य पिके घेतात त्यामध्ये गहू, सोयाबीन, हरभरे यांची साठवणूक करणे सरकारला गरजेचे वाटले म्हणून या योजनेची सुरुवात केली गेली.
आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच योजनेची माहिती सविस्तरित्या पोहोचत नाही. तर आपण जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर जेणेकरून शेतकऱ्यांच्या कुठल्याही कडधान्यांचे नुकसान होणार नाही व त्यांना योग्य तो मोबदला आणि त्यांची आर्थिक उन्नती होईल.

गोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Godown Subsidy Scheme 2024
Godown Subsidy Scheme 2024

गोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Godown Subsidy Scheme 2024 }

गोदाम बांधकाम अनुदान 2024 ची ठळक मुद्दे :- { Godown Subsidy Scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावगोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु २०२४:Godown Subsidy Scheme 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकर
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेया योजनेमार्फत 50 टक्के अनुदान किंवा 12,50000/- जी कमी किंमत असेल ती सबसिडी म्हणून शेतकऱ्यांना दिली जाईल.
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}गोदाम बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु २०२४:Godown Subsidy Scheme 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Godown Subsidy Scheme 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • शेतकरी उत्पादन संघटना किंवा उत्पादन कंपनी यांच्या नावे असलेल्या जमिनीचे कागदपत्रे

Godown Subsidy Scheme 2024
Godown Subsidy Scheme 2024

गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजनेअंतर्गत अनुदानाची प्रक्रिया कशी असेल (Eligibility for Godown Subsidy Scheme 2024 ) :-

  • या योजनेअंतर्गत आपल्याला 31 जुलै पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहे. त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये आणि अनुदानाचे जे लाभार्थी आहे त्यांची निवड करण्यात येईल.
  • जर ठरवल्यापेक्षा अर्ज जास्त आले तर लॉटरी पद्धतीने या अनुदानाची निवड केली जाईल.
  • त्याचबरोबर ज्या ठिकाणी अन्नधान्य पिके किंवा कडधान्य पिके आहेत परंतु गोदाम उपलब्ध नाही आहे अशा ठिकाणांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.

गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Godown Subsidy Scheme 2024 ) :-

या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल जाणून घेऊयात या योजनेचा अर्ज कसा करता येईल-

गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण जिल्ह्यातील जे इच्छुक शेतकरी आहेत किंवा त्यांचे शेतकरी उत्पादन संघ आहेत किंवा कंपनी आहेत त्यांना आपण (FPO/FPC)  या नावाने ओळखतो.त्यांना आपले अर्ज 31 जुलै 2024 पर्यंत जमा करायचे आहेत.
  • यासाठी आपल्या तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे त्यांचे शिफारस पत्र आपल्याला असणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जायचे आहे तेथे हा अर्ज जमा करायचा आहे.
  • आणि त्यांनी विचारलेली इतर जी तांत्रिक माहिती आहे. जी गोडाऊन संबंधित आहे ती आपल्याला सादर करायची आहे.
  • वरील सर्व कागदपत्रे आपल्याला आपले अर्ज सोबत जोडून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे.

गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

Godown Subsidy Scheme 2024
Godown Subsidy Scheme 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१.गोदाम बांधकाम अनुदान 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 31 जुलै आहे त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करा.

२. गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.nabard.org/

३. गोदाम बांधकाम अनुदान 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-केंद्र सरकारचे असल्याकारणामुळे ती सर्व राज्यांमध्ये लागू झाली आहे.

४. गोदाम बांधकाम अनुदान 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-या योजनेचा लाभ आपल्या देशातील नागरिक घेऊ शकतात.

5.गोदाम बांधकाम अनुदान 2024 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजनेअंतर्गत गोडाऊन बांधण्यासाठी 50% अनुदान किंवा साडेबारा लाख रुपये या दोन्हींमध्ये जी रक्कम कमी आहेत ते अनुदान म्हणून दिले जाईल.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.