Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४

Table of Contents

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४

जर आपल्या देशातील शेतकऱ्याला अपघात झाला तर काय? हा विचार नेहमीच आपल्या मनात येत असतो. तर आज जाणून घेऊया राज्य सरकारने आणलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल.
जर एखाद्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, फवारणीची कीटकनाशके अंगाला लागून किंवा हाताळताना मृत्यू झाला किंवा एखाद्या कीटकनाशकाची विषबाधा झाली विजेचा धक्का बसला किंवा पावसाच्या दिवसांमध्ये अचानक वीज कोसळली किंवा काही दुरुस्त करायला गेला असताना झाडावर पडून अपघात झाला किंवा रात्री पाणी भरायला गेल्यानंतर विंचू चावला अथवा साप चावला किंवा एखाद्या रांडी प्राण्यांनी या शेतकऱ्यावर हल्ला केला या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर या शेतकऱ्याच्या कुटुंबाला दोन लाखाची मदत कर केली जाणार आहे.

जर या सर्व घटनांमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू अथवा अपंगत्व आली तर बघुयात सरकार या शेतकऱ्याच्या कुटुंबाला किती मदत केली जाणार आहे.

प्रसंग/अपघाताचा प्रकारमदत म्हणून मिळणारी रक्कम
1.शेतकऱ्याचा जर अपघाती मृत्यू झाला तर२०००००/-
२.शेतकऱ्याला जर अपंगत्व आले जसे की अपघातामुळे दोन डोळे दोन हात किंवा दोन पाय कामातून गेले तर२०००००/-
3.अपघाता दरम्यान शेतकऱ्याचा एक डोळा एक हात किंवा एक पाय कामातून गेला तर२०००००/-
4.अपघातामुळे शेतकऱ्याचा एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय खराब झाला तर1०००००/-

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे, त्या शेतकऱ्यांच्या पत्नी किंवा महिलेचा अपघात झाला असेल तर तिचा पती कुटुंबातील, अविवाहित मुलगी किंवा अपघात झालेल्या व्यक्तीची आई किंवा अपघातग्रस्ताचे वडील किंवा मुलगा, सून यांची नोंद वारसा साठी लागेल.अपघाता दरम्यान जर शेतकऱ्यांचा उपचार सुरू असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे भरावे लागत नाहीत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 }

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावGopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील अपघात झालेले शेतकरी
योजने मार्फत काय लाभ होणार आहेआत्मनिर्भर महिला देशात तयार होतील .
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024:गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर1800-233-3533

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 ):-

  • आपल्या देशात शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी ही महत्त्वाची योजना आहे अपघात झालेल्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणे हा या योजने मागचा महत्त्वाचा उद्देश आपल्या राज्य सरकारचा आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • एफ. आय. आर.(FIR)
  • शेतकऱ्याचा अपघात झाला असल्याचा गावकऱ्यांचा अहवाल
  • अपघात झालेल्या ठिकाणी केलेल्या पंचनामाचा दाखला
  • शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूचा दाखला
  • शेतकऱ्याला पंगत्व आले असल्यास अपंगत्वाचा दाखला
  • पोलिसांनी केलेला अपघात घटनास्थळाचा पंचनामा
  • मृत्यू झाला असता पोस्टमार्टम रिपोर्ट
  • आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील कृषी अधिकारी चे पत्र
  • अपंगत्व आल्या असल्यास का दवाखान्याचा डिस्चार्ज कार्ड

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 ) :-

  • शेतकरीष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे आपण शेतकरी असल्याचा दाखला उपलब्ध असावा.
  • अर्जदारांनी यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही अपघात ग्रस्तयोजनेचा फायदा घेतलेला नसावा.
  • अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 75 वर्ष असावे.
  • अपघात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज 45 दिवसाच्या आत घ्यावा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 ) :-

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाणे गरजेचे आहे.
  • जिल्हा कार्यालयातून आपल्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी लागणारा अर्ज घ्यायचा आहे.
  • तो व्यवस्थित रित्या भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्याबरोबर जोडायची आहेत.
  • आता हा अर्ज आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे परंतु यासाठी अट अशी आहे की आपल्याला अपघात झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत हा अर्ज भरायचा आहे.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील जवळील जिल्हा कार्यालयात जाऊन आपल्याला अर्ज घेऊन त्याबरोबर कागदपत्रे जोडून द्यायची आहेत.

२. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://krishi.maharashtra.gov.in/1246/Gopinath-Munde-Farmers-Accident-Insurance-Schemes या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आपल्या राज्य सरकारच्या असल्या कारणामुळे ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू झालेली आहे.

४. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यानंतर जर त्यांचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.

5.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजनेअंतर्गत अपघात झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचा विमा दिला जाणार आहे तसेच अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अपंगत्वानुसार पैसे दिले जाणार आहेत.

6. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-शेतकऱ्यांवर अचानक आलेल्या अपघाताच्या परिस्थितीला आर्थिक दृष्टीने सक्षम आधार देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दोन लाख रुपये रक्कम अपघात विमा म्हणून बँक खात्यात मिळणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.