Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna (महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना)
आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगामध्ये हाताला काम रोजगार तसेच नोकरी मिळविण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात आणि स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तर त्यापेक्षाही जास्त उठा ठेवी कराव्या लागतात.
आज आपल्या राज्यामध्ये सुशिक्षितांचे प्रमाण भरपूर आहे त्यांचे शिक्षणही चांगले आहे जसे की इंजिनिअर, डॉक्टर सारख्या पदव्या मुलांकडे आहेत पण तरीही रोजगार त्या मुलांना हवा तसा मिळत नाहीये त्यांचे शिक्षण एक आणि त्यांना काम मिळते दुसरं अशी परिस्थिती सध्या आपल्याला सगळीकडे दिसते आहे आणि आजकाल असं पण दिसते की चांगली नोकरी मिळावी किंवा आपल्या घर चालव म्हणून आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात मुलांना जावे लागते.
मुली देखील आज नोकरीच्या शोधांमध्ये दुसरा राज्यात दुसऱ्या देशात स्थलांतर करतायेत पण तरीही आजचा तरुण एक पाऊल पुढे टाकण्याचा नेहमी विचार करतोय तो म्हणजे व्यवसायात उतरण्याचा पण त्यासाठी त्याला अनेक अडचणी येत आहेत पहिलं तर भांडवल दुसरं त्याच्याजवळ त्यासाठी लागणारी कौशल्य नाहीयेत मग काय करावं ते त्याला कळत नाही आणि उद्योगधंद्याशी संबंधित कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्याची शुल्क पण खूप जास्त आहेत.
आधी शिक्षण करायचं मग उद्योगधंद्यांसाठी कौशल्य मिळवण्यासाठी शुल्क द्यायचं यामुळे पालकांना हे सर्व डोईजड होते आहे त्यामुळे आता वेळ अशी आहे की मुलांनीच काहीतरी करावं पण आज आपले सरकार आपल्या युवा पिढीसाठी एक योजना घेऊन आले आहे ज्याचे नाव आहे महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना यामध्ये ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एसबीसी, ई डब्ल्यू एस, या वर्गातील युवा पिढीला घडवण्यासाठी आपले शासन घेऊन येत आहे महा ज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना तर चला मग बघूयात योजनेची उद्दिष्टे, फायदे, योजनेला अर्ज कसा करावा, त्याचे अधिकृत संकेतस्थळ.
Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna (महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना ) , या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना ची ठळक मुद्दे :- {Important Points of Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna }
योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna 2024 (महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना ) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | रोजगार विभाग,महाराष्ट्र शासन. |
महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणींना स्वतःच उद्योग सुरु करण्यासाठी मदद करणे. | |
लाभार्थी {Beneficiary} | महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवक आणि युवती. |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवक आणि युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | http://www.mahajyoti.org.in/ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 07122870120 07122870121 8956775376 8956775377 8956775378 8956775379 8956775380 |
महाज्योती पोस्टल ऍड्रेस | डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक – न्याय भवन, एमए / 15/1, एस अंबाझरी आरडी, वसंत नगर, नागपूर, महाराष्ट्र 440020 |
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna ):-
- आपल्या राज्यातील सुशिक्षित रोजगार तरुण-तरुणींना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा आर्थिक विकास आणि सामाजिक विकास करण्यास प्रोत्साहन देणे.
- या योजनेच्या द्वारे राज्यातील बेरोजगारी कमी करण्यावर भर देणे.
- युवा पिढीला उद्योग व्यवसायात उतरवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यातील तरुण-तरुणींना स्वावलंबन शिकवणे.
- आपल्या राज्यातील मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इडब्ल्यूएस, एस बी सी या वर्गातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन सक्षम व आत्मनिर्भर बनवणे.
- आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारे तरुणांची स्थलांतर रोखणे.
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents of Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna ) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना या योजनेची पात्रता (Eligibility for Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna ) :-
सुशिक्षित मात्र आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले तसेच ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एसबीसी, ई डब्ल्यू एस,या प्रवर्गातील असावेत.
महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष 18 ते 45 मधील युवके व युवती.
प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे किमान पात्रता असणे आवश्यक.
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna ) :-
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- अर्ज भरणाऱ्याने प्रथम अधिकृत संकेतस्थळा वर जाणे.
- तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यावरती कौशल्य सुधारणा किंवा कौशल्य विकास या बटनावर क्लिक करून तुमच्यासमोर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम असे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला नोंदणी अर्ज या बटनावर क्लिक करायचं आहे.
- यानंतर तुम्हाला तो अर्ज पूर्णपणे भरायचा आहे आणि त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तिथे अपलोड करायचे आहेत.
- एकदा तुम्ही तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे का नाही ते चेक करून सबमिट बटनावर क्लिक करावे.
- या प्रकारे तुमची महाज्योती कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेमार्फत Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna राबविण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम खाली देत आहोत :-
अ. क्र. | अभ्यासक्रमांची नावे | शैक्षणिक पात्रता | वय | तासात वेळ |
1 | ईएमएस तंत्रज्ञ / EMS Technician | 12th | 18 to 45 | 400 |
2 | तांत्रिक सहाय्य अभियंता / Technical Support Engineer | 12th | 18 to 45 | 400 |
3 | रिटेल सेल्स असोसिएट / Retail Sales Associate | 10th | 18 to 45 | 250 |
4 | इन्व्हेंटरी क्लर्क / Inventory Clerk | 12th | 18 to 45 | 280 |
5 | मशीन ऑपरेटर-प्लास्टिक प्रोसेसिंग / Machine Operator-Plastic Processing (MO-PP) | 8th | 18 to 28 | 960 |
6 | मशीन ऑपरेटर-इंजेक्शन मोल्डिंग / Machine Operator-Injection Moulding (MO-IM) | 8th | 18 to 28 | 960 |
7 | मशीन ऑपरेटर-टूल रूम / Machine Operator-Tool Room (MO-TR) | 10th/ITI/Diploma | 18 to 28 | 960 |
8 | मशीन ऑपरेटर आणि प्रोग्रामर / Machine Operator & Programmer- (CNC Lathe) | 10th/ITI/Diploma | 18 to 28 | 960 |
9 | मशीन ऑपरेटर आणि प्रोग्रामर / Machine Operator & Programmer- (CNC Miling) | 10th/ITI/Diploma | 18 to 28 | 960 |
10 | यंत्रसामग्रीची देखभाल – तंत्रज्ञ / Maintenance Of Machinery – Technician | 10th/ITI/Diploma | 18 to 28 | 960 |
11 | जनरल ड्युटी असिस्टंट / General Duty Assistant | 10th | 18 to 45 | 420 |
12 | आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ / Emergency Medical Technician | 12th | 18 to 45 | 360 |
13 | होम हेल्थ एड / Home Health Aid | 10th | 18 to 45 | 360 |
15 | गोदाम पर्यवेक्षक / Warehouse Supervisor | Any Diploma | 18 to 45 | 240 |
16 | CRM डोमेस्टिक व्हॉइस / CRM Domestic Voice | 10th | 18 to 45 | 400 |
17 | वेब डेव्हलपर / Web Developer | 12th | 18 to 45 | 400 |
निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात दिला जाणारा नाश्ता तसेच जेवण
- सकाळचा नाश्ता व चहा,
- दुपारचे स्नेहभोजन,
- दुपारचा चहा,
- रात्रीचे स्नेहभोजन.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना Mahajyoti Kaushalya Vikas Prashikshan Yojna या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.