Vidhwa Pension Yojana 2024|विधवा पेन्शन योजना २०२४-अर्ज सुरु झाले आहेत

Vidhwa Pension Yojana 2024(विधवा पेन्शन योजना २०२४)

आपले राज्य सरकार आपल्या जनतेसाठी नवीन नवीन स्कीम घेऊन येत आहे. जर अचानक एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर अशा निराधार महिलांना मदत करण्यासाठी आपले महाराष्ट्र सरकार विधवा पेन्शन योजना घेऊन आले आहे. या योजनेद्वारे आपल्या राज्यातील विधवा महिलांच्या बँक खात्यात सहाशे रुपये जमा केले जातात आहेत.यामुळे अचानक आलेल्या या आपत्तीला महिला खंबीरपणे तोंड देऊ शकतात, या योजनेअंतर्गत महिलेला जर दोन अपत्य असतील तर अशा महिलेला 900 रुपये मासिक त्यांच्या बँक खात्याचा जमा केले जाणार आहेत परंतु महिलेला जर एकच मुल असेल तर 600 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत महिलेला वयाच्या 65 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेणार आहे महिला जर मुलगा असेल तर मुलगा 25 वर्षाचा होईपर्यंत अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकते, परंतु लाभार्थीला जर एक अपत्य असेल आणि मुलगी असेल तर या विधवा पेन्शन योजनेचा लाभ कायमस्वरूपी घेऊ शकतात.या योजनेसाठी आपल्या सरकारने २३ कोटीचे बजेट जाहीर केले आहे.

आयुष्यातल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी आपल्या सरकारने विधवा पेंशन योजना केली प्रत्येक राज्याच्या राज्य सरकारने या योजनेसाठी वेगवेगळी रक्कम जाहीर केलेली आहे.या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र सरकारने 600 रुपये ते 900 रुपये दर महिन्याला आर्थिक मदत म्हणून जाहीर केले आहेत.


याद्वारे महिला सक्षम होईल व आपल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी कोणावर अवलंबून राहणार नाही तसेच अशा निराधार महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील यासाठी आपल्या राज्य सरकारने त्यांना मदत म्हणून ही योजना जाहीर केली.योजनेअंतर्गत 40 ते 65 वयोगटातील विधवा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचे अंतर्गत लाभार्थीला दोनशे रुपये मिळणार आहेत व संजय गांधी निराधार प्रशिक्षण योजनेअंतर्गत चारशे रुपये मिळणार आहेत

माझी वाचकास विनंती की या लेखाद्वारे आम्ही आपणास शौचालय अनुदान योजनेची वैशिष्ट्ये ,योजनेसाठी का लागणारी कागदपत्रे ,शौचालय अनुदान योजनेची पात्रता काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा हि विनंती.

Table of Contents

विधवा पेन्शन योजना २०२४ ची ठळक मुद्दे(Vidhwa Pension Yojana 2024 Important Points):-

Vidhwa Pension Yojana 2024(विधवा पेन्शन योजना २०२४) याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावविधवा पेन्शन योजना २०२४(Vidhwa Pension Yojana 2024)
योजना कोणी सुरु केलीराज्य सरकार
योजनेचा लाभ कुणाला होणार आहेआपल्या राज्यातील विधवा महिलांना
योजना कोणत्या विभागा मार्फत चालवली जातेमहिला व बालविकास विभाग
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे६००/- रुपये ते ९००/- रुपये प्रती महिना
योजनेचा प्रमुख उद्दिष्टे काय आहेराज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहकार्य करणे
योजनेची अधिकृत वेबसाईटविधवा पेन्शन योजना २०२४(Vidhwa Pension Yojana 2024)
विधवा पेन्शन योजना २०२४

विधवा पेन्शन योजना २०२४ ची उद्दिस्टे(purpose of Vidhwa Pension Yojana 2024):-

  • पतीच्या निधनानंतर महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल होऊन जाते त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे महाराष्ट्र राज्य सरकार चे प्रमुख उद्दिष्ट योजनेचे प्रमुखमुख उद्दिष्टे आहे.
  • र्आजदारास आर्थिक मदत मिळाल्यामुळे ती कुणावरही अवलंबून राहत नाही यातून तिची सक्षमीकरण होते.
  • आर्थिक दृष्ट्या महिलेला स्वावलंबी बनवायची बनवणे हे या योजनेच्या प्रमुख उद्देश आहे.
  • योजनेतून मिळालेल्या पैशातून वृद्ध महिला देखील स्वावलंबी जीवन जगू शकतात व आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या गरजा भागवू शकतात.

विधवा पेन्शन योजना २०२४ ची कागद्पत्रे(documents for Vidhwa Pension Yojana 2024 ) :-

  1. आधार कार्ड.
  2. रेशन कार्ड.
  3. उत्पन्नाचे दाखला.
  4. देशातील कुठल्याही राष्ट्रकूट बँकेचे पासबुक.
  5. पासपोर्ट आकाराची दोन फोटो.
  6. मोबाईल नंबर.
  7. जन्म दाखला किंवा पॅन कार्ड.
  8. अर्जदार महिला जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीची असेल तर जातीचे प्रमाणपत्र.
  9. पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र.

विधवा पेन्शन योजना २०२४ ची पात्रता(eligibility of Vidhwa Pension Yojana 2024 ):-

  • अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची कायमस्वरूपीची रहिवासी असावी.
  • वयाच्या 65 वर्षापर्यंत विधवा पेन्शन योजनेच्या लाभ अर्जदारास घेता येणार आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 21000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असावे जे आधार कार्डशी लिंक असावे.
  • अर्जदार महिला दारिद्र्यरेषे खालील असावी.
विधवा पेन्शन योजना २०२४

विधवा पेन्शन योजना २०२४ चा अर्ज कसा करावा(How to apply for Vidhwa Pension Yojana 2024 ):-

  • सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • विधवा पेन्शन योजना २०२४(Vidhwa Pension Yojana 2024)
  • आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर फॉर्म हा पर्याय असेल.
  • तेथे आपल्याला महाराष्ट्र विधवा निवृत्त वेतन या योजनेवर क्लिक करायचे आहे.
  • आपल्याला एक पीडीएफ फाईल मिळेल.
  • त्याची प्रत काढावी.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • भरलेला अर्ज व वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला एकत्र जोडायचे आहेत.
  • हा अर्ज व कागदपत्रे आपल्याला आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन जमा करायचा आहे.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजने अंतर्गत लाभार्थीला काय लाभ होणार आहे (Benefits of Vidhwa Pension Yojana 2024 ):-

  1. या योजनेअंतर्गत महिलेला महिन्याला सहाशे रुपये पेन्शनच्या स्वरूपात आपले राज्य सरकार देणार आहे.
  2. अर्जदार महिलेला जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर या योजनेद्वारे दरमहा 900 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.
  3. लाभार्थी महिलेला जर एक मुलगी असेल तर ही योजना तिच्यासाठी कायम स्वरूपी फायद्याची ठरणार आहे.

निष्कर्ष :-

विधवा पेन्शन योजना २०२४ आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा ,विधवा पेन्शन योजना आपल्या राज्यातील विधवा महिलांसाठी चालवली जाणारी फायदेशीर योजना आहे.या योजने मार्फत या महिलाआर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभ्या राहू शकता व आपली आणि आपल्या कुटुंबाची कलगी घेऊ शकतात.कृपया हा लेख जास्तीत जास्त पुढे पाठवा त्यामुळे खरोखर गरज असणाऱ्या महिले पर्यंत हि माहिती पोहचेल.

मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेल्या मनोधैर्य योजना २०२४ योजनेबद्दल ची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com)या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद

FAQ’S-

१.विधवा पेन्शन योजनेची यादी कुठे मिळेल?

उत्तर-पेन्शन योजनेची यादी आपल्याला तहसील कार्यालय किंवा तलाठी ऑफिस किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये मिळेल याची कोणतीही माहिती आपल्याला ऑनलाईन स्वरूपात मिळणार नाही.

२.विधवा पेन्शन योजनेची सुरुवात कोणत्या राज्यात झाली?

उत्तर-विधवा पेन्शन योजनेची सुरुवात आपल्या महाराष्ट्र राज्यात झाली.

३.विधवा पेन्शन योजनेसाठी कोण पात्र नाही?

उत्तर-पेन्शन योजनेसाठी अपात्र व्यक्ती म्हणजे ज्या महिलेने दुसरे लग्न केले आहे ती महिला ज्या योजनेसाठी अपात्र आहे. तसेच एखादी प्रौढ महिला जिची मुले तिची काळजी घेतात अशी महिला अर्जदार देखील या योजनेसाठी अपात्र आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना