ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना २०२४|Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna 2024-आता विद्यार्थ्यांना मिळणार ६०,००० रुपये मदत

Table of Contents

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)

आपले सरकार ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे .आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजनेची सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 60000 रुपये वार्षिक मदत केली जात आहे.आपल्या राज्यातील एकूण 21,600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजन योजनेचा फायदा घेता येणार आहे.


या योजनेअंतर्गत जिल्हा निहाय शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी 600 राखीव ठेवल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत भटक्या जमाती क वर्गात मोडणाऱ्या जमाती धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सोडून इतर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत महानगरपालिका ,नगरपालिका, जिल्हा आणि तालुका अशा चार विभागामध्ये विद्यार्थ्यांना रक्कम दिली जाणार आहे.


तर आता जाणून घेऊया या योजनेची उद्दिष्टे काय आहेत ,या योजनेसाठी पात्रता कोणत्या आहेत वाचकांनाच विनंती आहे कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेची परिपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभाभ घेता येईल.या योजनेअंतर्गत ७० % व्यावसायिक शिक्षण घेणारे व 30 % व्यवसाय शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

या योजनेद्वारे जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे तो प्रथम वर्षात मध्ये शिकणाऱ्या १५०विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दुसऱ्या वर्षाला वर्षाला शिकणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .तसेच तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, तसेच चौथ्या वर्षात शिकणाऱ्या शिकणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna

Table of Contents

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna) या योजनेची ठळक मुद्दे :-

योजनेचे नावज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)
योजनेची सुरुवात कोणी केलीआपले राज्य सरकार
योजनेचा अर्ज करावयाची पद्धतऑनलाईन
योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जात आहेइतर मागास बहुजन विकास महामंडळ
योजने अंतर्गत काय लाभ मिळणार आहे६००००/- मात्र वार्षिक
योजनेची अधिकृत वेबसाईटज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)
योजनेचा फायदा कुणाला होणार आहेआपल्या राज्यातील OBC विद्यार्थिना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)योजनेची पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा फायदा घेणाऱ्या अर्जदाराला जात प्रमाणपत्र सादर करणेे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी अनाथ प्रवर्गातून आपला अर्ज भरत असेल तर महिला व बालकल्याण विभागातून अनाथ प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी अपंग या श्रेणीतून आपला अर्ज भरत असेल तर अपंगाचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे या प्रमाणपत्रांमध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • विद्यार्थ्यांचा आधार कार्ड हा बँक खात्याशी लिंक झालेला असणे आवश्यक आहे या योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.
  • प्रामुख्याने ही योजना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे अर्जदार ग्रामीण भागातील ठिकाणी याचा रहिवासी असावा.
  • या योजनेअंतर्गत ७० टक्के व्यावसायिक शिक्षण घेणारे व 30 टक्के व्यवसाय शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
  • ज्याला योजनेच्या लाभार्थीची निवड झाली आहे त्या लाभार्थींना आपले शिक्षण पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थी जर तंत्रनिकेतन शिक्षण घेत असेल तर अखिल भारतीय तंत्रनिकेतन परिषद मेडिकलचे शिक्षण घेत असेल तर ऑल इंडिया मेडिकल कौन्सिल फार्मसी चे शिक्षण घेत असेल तर इंडियन फार्मसी कौन्सिल आर्किटेक्चर चे शिक्षण घेत असेल तर आर्किटेक्चर कौन्सिल या अंतरातया अंतर्गत महाविद्यालयात शिकणे आवश्यक आहे.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)योजनेची कागदपत्रे

  • रहिवासी दाखला
  • मागील वर्षाची उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटोज
  • बँकेचे पासबुक
  • कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला
  • अर्जदार शारीरिकदृष्ट्या विकलांगअसेल तर विकलांग प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
  • भाडे करारनामा
  • हमी पत्र
  • शैक्षणिक व्याप असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • शिक्षण घेत असलेल्या वर्गाचे प्रमाणपत्र
  • अर्जदार ज्या विद्यालयाची कथा आहे त्याचे प्रमाणपत्र
  • महाविद्यालय याची नोंदणी क्रमांक किंवा विद्यार्थ्याचेे ओळखपत्र
  • बँकेचा आयएफएससी कोड
  • विद्यार्थी ज्या वस्तीगृहात राहतात त्या वस्तीगृहातील जिओग्राफिक फोटो
  • शेवटच्या वर्षाचे ट्रान्सफर सर्टिफिकेट
  • भोजनालयाची पावती
  • आधार कार्ड
  • कॉलेजचे आय कार्ड

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)योजनेची अर्ज करण्याची पध्दत

ज्ञानदीप ज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आतापर्यंत अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाही आहे तरी आपण आमच्या चॅनल सोबत संपर्कात रहा लवकरात लवकर या योजनेचा अर्ज कसा करावा याची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोच्विण्याचा प्रयत्न करू.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)योजनेची अनुदानाची वितरण कसे होणार

सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अनुदानाची वितरण खालील प्रकारे होणार आहे

या योजनेत मिळणारा लाभ चार हप्त्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अकाउंटपर्यंत अकाउंट मध्ये जमा करण्याचा निर्णयय शासनाने घेतला आहे.

  • पहिला हप्ता :

पहिला हप्ता जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल याद्वारे ज्या दिवशी विद्यार्थ्यांनी विद्यालयात ऍडमिशन घेतले आहे व ऑनलाईन व ऑफलाइन त्यांच्या फॉर्मला मंजुरी मिळाली आहे त्यानंतर सात दिवसात त्यांच्या अकाउंटलाही पैसे मिळणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.

  • दुसरा हप्ता:

सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

  • तिसरा हप्ता

तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी हा असून तो नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

  • चौथा हप्ता

चौथा हप्ता मार्च ते मे महिन्यापर्यंतचा तो हप्ता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती सरकारच्या जीआर मध्ये दिली गेली आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojna)योजने साठी कोण पात्र नाही

  • या योजनेअंतर्गत जर विद्यार्थी अर्ज करत असेल तर त्यांनी कुठेही नोकरी व्यवसाय करत असेल तर तो विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र धरण्यात येईल.
  • कोणतेहीही विद्यार्थ्यांनी किंवा अर्जदाराने योजनेमध्ये जी कागदपत्रे किंवा चुकीचा अर्ज दाखल केलास अर्जदाराला व्याजा सहित या योजनेची रक्कम परत करावी लागेल.
  • जर अर्जदार इतर सरकारच्या कोणत्याही मोफत वस्तीगृहात मध्ये राहत असेल तर त्या अर्जदाराला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच पंडित दीनदयाळ उपाध्ये स्वयं या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी देखील य या योजनेसाठी अपात्र राहील.
  • तसेच या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी एखाद्याया वर्षी नापास झाल्यास त्याला या योजनेचा लाभ त्या वर्षापुरता घेता येणार नाही उर्वरित योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याला पास होणे आवश्यक आहे.
  • वय वर्ष 30 नंतर या योजनेचा लाभ आपल्या विद्यार्थी बांधवांना घेता येणार आहे.
  • या योजनेत सरकारने असा निर्णय घेतला आहे की बारावी नंतरची उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी यांना पाच वर्ष इतका लाभ या योजनेअंतर्गत होईल परंतु जर विद्यार्थी इंजीनियरिंग किंवा वैद्यकीयय शिक्षण घेत असेल तर अर्जदाराला जास्तीत जास्त सहा वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना योजनेची उद्दिष्टे

  • आपली आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागतात, किंवा ग्रामीण भागातील खूप सारे विद्यार्थी असे आहेत की जे अत्यंत हुशार आहेत. परंतु शहरी भागात राहण्यासाठी लागणारा खर्च त्यांना परवडत नसल्यामुळे ते आपले शिक्षण अर्धवट सोडतात. या सगळ्या निकषांचा विचार करून सरकारने एक नवीन योजना आपल्या विद्यार्थी बांधवांसाठी राबवायचे ठरविले आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 60000 पर्यंत वार्षिक मदत केली जाणार आहे या पैशाचा वापर करून विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतात व आपला महाराष्ट्र सक्षम करण्यास मदत करू शकतात.
  • ग्रामीण भागातील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये यासाठी सरकारने ही योजना आखलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार मदत करणार आहे .या योजनेचा लाभ २१,६००/- मात्र विद्यार्थी दरवर्षी आपल्या महाराष्ट्र राज्य शासना कडून घेऊ शकतात.

निष्कर्ष :-

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Adhar Yojana) आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ’S

१.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना कुणासाठी आहे?

उत्तर-या योजनेअंतर्गत भटक्या जमाती क वर्गात मोडणाऱ्या जमाती धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सोडून इतर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

२.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर-अद्याप अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाही.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJN