Table of Contents
3rd October- Marathi Classical Language Day मराठी भाषा ही भारतीय उपखंडामधील प्रमुख भाषा म्हणून गणली जाते, तिचा उगम इसवी सन 13व्या शतकात झाला आहे. तिची मुळे संस्कृत भाषेतली असून, ती इंडो-आर्यन भाषासमूहातील एक महत्त्वाची भाषा मानली आहे. महाराष्ट्र प्रदेशात प्राचीन काळी प्राकृत भाषेचा वापर होत असे, ज्यातून मराठी भाषेचा विकास झाला आहे.
मराठी भाषेचा इतिहास हा तीन टप्प्यांत विभागला जातो
- प्राचीन मराठी (8 ते 13वे शतक) – या काळात मराठी भाषा प्राचीन शिलालेखांमध्ये दिसून येते असे. त्यावेळी लेखनाकरिता प्राकृत तसेच अपभ्रंश भाषेचा प्रभाव होता.
- मध्ययुगीन मराठी (13 ते 17वे शतक)- या काळात संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांच्यासारख्या संतांनी मराठी भाषेला नवा आयाम आणि नवी दिशा दिली.
- आधुनिक मराठी (17 वे शतक ते आतापर्यंत): छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी ही राज्यकारभाराची अधिकृत भाषा बनली. ब्रिटिश काळात मराठी भाषेचा शिक्षण, छापखाने, आणि साहित्यिक चळवळींमुळे अधिक विकास झाला. classical language status to marathi
मराठी भाषेचा उगम
इसवी सन ५०० ते ७०० या काळात पूर्ववैदिक आणि वैदिक संस्कृतीमधणं संस्कृत, पाली, प्राकृत यांच्याशी संबंधित उत्क्रांती झाली होती, ज्यामधून मराठी भाषेचा उगम झाला. प्राचीन श्रावणबेळगोळ येथील सापडलेल्या एका शिलालेखात ‘श्री चामुंडाराये करविले’ असे पहिले मराठी वाक्य आढळते. संत वाङमयाच्या माध्यमातून मराठीचा प्रसार व प्रचार होत गेला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांच्यामुळे मराठी भाषेला नवीन दिशा मिळाली.संत ज्ञानेश्वरांनी मराठीच्या सौंदर्याचे वर्णन करताना म्हटले आहे, “परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरेचि रसिके मेळविण”.
अलंकार आणि शब्दसंपदा
मराठी भाषेचे सौंदर्य आणि तिचे अलंकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. मराठीने इतर भाषांमधून शब्द आत्मसात करत आपली शब्दसंपदा वाढवत नेली आहे. अरबी, फारसी, उर्दू, इंग्रजी अशा विविध भाषांमधील शब्द मराठीमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे मराठी अधिक समृद्ध आणि प्रगल्भ होत आली आहे. मराठी भाषेने नव्या शब्दांचा स्वीकार करत आपली समृद्धी टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. classical language status to marathi
मराठी भाषेचा विकास
मराठी भाषेच्या विकासाचा एक टप्पा भाषावार प्रांतरचना करताना महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर झाला. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेला नवी ओळख आणि विस्तार मिळाला. यानंतर मराठी भाषेचा शिक्षण, साहित्य, आणि संशोधनाच्या माध्यमातून विकासच होत राहिला. classical language status to marathi
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
आजच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन अधिक सखोलपणे केले जाईल. विशेषत: प्राचीन मराठी ग्रंथांचे अनुवाद होऊन जगभरात मराठी साहित्याचा प्रचार व प्रसार होईल. मराठीच्या विविध बोलींचा अभ्यास व संशोधन केले जाईल, ज्यामुळे त्या बोलींमधील सांस्कृतिक संपत्ती जपता येईल.
मराठी भाषेचे विद्यापीठ
मराठीच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रिद्धपूर येथे या विद्यापीठाचे मुख्यालय असेल, ज्यायोगे मराठी भाषेतील अभ्यास, संशोधन, आणि साहित्यनिर्मितीला एक वेगळी चालना मिळेल.
ग्रंथालयांचे \ वाचनालयांचे आधुनिकीकरण
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांचे आधुनिकीकरण होणार आहे, ज्यामुळे कमी झालेल्या वाचन संस्कृतीला चालना मिळेल. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थ्यांना भरीव मदत केली जाईल.
संगणक युगातील मराठी
आजच्या संगणक युगात मराठी इंटरनेटच्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. मराठी भाषक आवर्जून आपल्या मराठीचा वापर करत आहेत, आणि त्यामुळेच मराठीचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. हे मराठी भाषेसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
नवीन प्रेरणा
अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे. मराठीच्या इतिहासातील हा टप्पा मराठी भाषिकांसाठी खूपच अभिमानास्पद आहे. 3rd October Marathi Classical Language Day
शासन निर्णय – महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत (maharashtra.gov.in)
निष्कर्ष | 3rd October- Marathi Classical Language Day
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली 3rd October- Marathi Classical Language Day \3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा गौरव दिन, याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna} 3rd October- Marathi Classical Language Day
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना