100 % anudan on zp scheme:जिल्हा परिषद १००% अनुदान योजना
आपल्या ग्रामीण भागातील महिला किंवा पुरुष पैशा अभावी आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. परंतु या योजनेद्वारे त्यांना आपला स्वतःचा एक रुपयाही खर्च न करता स्वतःचा छोटासा उद्योग धंदा सुरू करता येईल. आज आपण जाणून घेऊया जिल्हा परिषद मध्ये ज्या गोष्टींवर 100% अनुदान मिळणार आहे व त्यातून आपण आपल्या स्वतःचा उद्योग धंदा सुरू करू शकतो.
या योजनांद्वारे आपण आपला स्वतःचा छोटासा धंदा चालू करू शकतो .जसे की जर आपल्याला अनुदानाद्वारे झेरॉक्स मशीन मिळाली व आपल्या स्वतःची एखादी छोटीशी जागा असेल. तर आपण आपल्या स्वतःचा झेरॉक्स मशीनचा दुकान टाकू शकतो.तसेचच महिलांकडे जर कलाकुसरीचे काम असेल तर त्या पिको फॉल च्या मशीन मध्ये अर्ज करून आपले हक्काची पिको फॉल ची मशीन घेऊन लगेच आपला धंदा चालू करू शकतात. मिरची कांडप यंत्र टाकून देखील उन्हाळ्या कामांमध्ये महिला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात.
जिल्हा परिषद १००% अनुदान योजना या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती
जिल्हा परिषद १००% अनुदान योजना योजने अंतर्गत कोणत्या योजनासाठी किती अनुदान मिळते(Schemes which got 100% anudan)
अनुदान कशावर मिळणार आहे | १००% अनुदानासोबत मार्फत किती रक्कम मिळणार आहे | |
1. | संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे | 42000/-रुपये |
2. | झेरॉक्स मशीन | 43070/- रुपये |
3. | कडबा कुट्टी मशीन | 29000/- रुपये |
4. | पिको फॉल शिलाई मशीन | 9300/- रुपये |
5. | गाय किंवा म्हैस खरेदी | 40000/- रुपये |
6. | मिरची कांडप यंत्र | 20000/- रुपये |
7. | शेळीपालन | 25000/- रुपये |
8. | दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल योजना | 120000/- रुपये |
9. | अतितीव्र दिव्यांगाना विनाअट निर्वाह भत्ता | 10000/- रुपये |
जिल्हा परिषद १००% अनुदान योजना अर्ज कसा भरावा(how to apply for 100 % anudan in zp scheme ):
- वरीलपैकी कुठल्याही योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असल्यास आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथे जे जिल्हा परिषद कार्यालय आहे तेथे जाणे गरजेचे आहे.
- कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना आपल्याला संबंधित अधिकाऱ्याला सांगायची आहे.
- अधिकाऱ्याकडून आपल्याला आपल्याला हव्या त्या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- हा अर्ज आपल्याला व्यवस्थितरित्या वाचून भरायचा आहे.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहेत. आता हा अर्ज व कागदपत्रे आपल्याला अधिकाऱ्याकडे जमा करायची आहेत.
- आता आपल्याला अर्ज केल्याची पोहोच पावती घ्यायची आहे. ही पोहोच पावती आपल्याला भविष्यात उपयोगी ठरेल.
- संबंधित अधिकाऱ्याकडून आपल्या कागदपत्राची पडताळणी केली जाईल व आपण पात्र असल्यास आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली जिल्हा परिषद १००% अनुदान योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
तर आपण बघितले की जिल्हा परिषद कोणत्या गोष्टीवर आपल्याला शंभर टक्के अनुदान देत आहे. तर हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून खरोखर ज्यांना काहीतरी करण्याची जिद्द आहे असे लोक स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात व आपण त्यांना या कामासाठी मदत करू शकतो.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.