yojnaguarantee Today’s Daily Updates
📰 योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी
yojnaguarantee Today’s Daily Updates
हे नंबर सेव्ह करून ठेवा कारण…
9881193322: WhatsAppच्या माध्यमातून रेल्वे तिकीट बुक करायचे असेल तर हा नंबर फोनमध्ये सेव्ह करा. या नंबरवरून तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. तुम्ही ट्रेनचे पीएनआर स्टेटस तपासू शकता.
-8750001323 : ट्रेनमध्ये बसून भूक लागली तर काळजी करू नका, तुम्ही सीटवर बसून जेवण मागवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल.
26 जानेवारीपासून समान नागरी संहिता : उत्तराखंड
उत्तराखंड सरकार 26 जानेवारीपासून राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. असे करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य असेल. यापूर्वी, नियम आणि अंमलबजावणी समितीच्या सल्ल्यानंतर, सरकारने काही बदल पुनरावलोकनासाठी विधिमंडळ विभागाकडे पाठवले होते. पुनरावलोकन केलेल्या नियमांना विभागाने मान्यता दिली आहे. धामी मंत्रिमंडळ उद्या पुनरावलोकन केलेले नियम मंजूर करण्याची शक्यता आहे.
yojnaguarantee Today’s Daily Updates
‘2100 रुपयाचे आश्वासन कालांतराने पूर्ण होईल’
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.
आर्थिक भार किती आहे, याबाबतचा अभ्यास करुन 2100 रुपयांचा निर्णय घेतला जाईल. हे आश्वासन कालांतराने पूर्ण होईल. यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप तयारी केलेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी तशा सुचनाही दिलेल्या नाहीत, असे आदिती तटकरे यांनी एका माध्यमात बोलताना म्हणाल्या.
yojnaguarantee Today’s Daily Updates
शिक्षणमंडळाकडून सर्व हॉलतिकीटे रद्द !
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या हॉलतिकीटावर जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मंडळाने माघार घेत सर्व हॉलतिकीटे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
जातीचा उल्लेख काढून आता नवे हॉलतिकीट जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हॉलतिकीटावर जातीचा उल्लेख केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा 📢
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठी घोषणा केली आहे.
आता कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचे एक संकेतस्थळ लवकरच उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालयेच स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डीत त्यांनी याची घोषणा केली.
नागरिकांना मिळणार आता प्रॉपर्टी कार्ड
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज स्वामित्व योजनेंतर्गत प्रॉपर्टी कार्ड देण्याचा कार्यक्रम पार पडला.
प्रॉपर्टी कार्ड म्हणजे तुमचा जमिनीवर कायदेशीर हक्क असल्याचा पुरावा. या योजनेच्या माध्यमातून 3,44,000 गावांचे सर्वेक्षण करण्याचे उद्धिष्ट आहे.
गेल्या चार वर्षात 1,36,000 गावातील लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले. अनेक जणांना वडिलांकडून प्रॉपर्टी मिळते, त्यामुळे कायदेशीर कागदपत्रे नसल्याने अडचणी येतात.
SBI च्या ग्राहकांसाठी अलर्ट
एक मेसेज व्हायरल होत असून त्यामध्ये SBI रिवॉर्ड मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्यासाठी एक APK फाइल डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे.
जर तुमच्याजवळ असा कोणता मेसेज आला तर सतर्क व्हा, हा मोठा स्कॅम आहे.
घोटाळेबाज SBI REWARD27…APK नावाची फाईल पाठवत आहेत. पीआयबी फॅक्ट चेकने या फाईलवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
आता शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू होणार !
पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये (CBSE) पसंती वाढत आहे. हे पाहता आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येईल.
शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हा पॅटर्न इयत्ता पहिलीला लागू करण्यात येईल. त्यानंतर अन्य इयत्तेत हा पॅटर्न 2026 पासून राबवला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली.
🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
🪀 असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या WhatApp Group ला join व्हा. 🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा yojnaguarantee.com
https://chat.whatsapp.com/ENnVs39IAi1HXr8Xgb0gPX
निष्कर्ष | yojnaguarantee Today’s Daily Updates
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली yojnaguarantee Today’s Daily Updates बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद| yojnaguarantee Today’s Daily Updates
FAQ | yojnaguarantee Today’s Daily Updates
हे देखील वाचा | yojnaguarantee Today’s Daily Updates
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.
yojnaguarantee Today’s Daily Updates योजना गॅरंटी – आजच्या ठळक घडामोडी