UDID Card In Marathi | प्रत्येक अपंग व्यक्तीकडे हे कार्ड असलेच पाहिजे. UDID Card – अपंग प्रमाणपत्र \ दिव्यांग कार्ड

UDID Card In Marathi

प्रत्येक अपंग व्यक्तीकडे हे कार्ड असलेच पाहिजे, UDID Card – अपंग प्रमाणपत्र \ दिव्यांग कार्ड.

नमस्कार मिंत्रानो, आज आपण UDID Card – अपंग प्रमाणपत्र \दिव्यांग कार्ड या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Unique Disability ID ( UDID Card ) काय आहे जाणून घेऊयात ? What is UDID Card In Marathi ?

भारत सरकार ने दिव्यांग व्यक्तींसाठी संपूर्ण देशामध्ये एक संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे, या प्रणालीच्याद्वारे भारत सरकार दिव्यांग \ अपंग व्यक्तीला online पद्धतीने एक युनिक सर्टिफिकेट देते.

अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र | UDID Card In Marathi

देशातील दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे आणि देशातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना एक अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र देणे या उद्धेशाने अपंग व्यक्तींकरिता अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प दिव्यांगांना केवळ सरकारी योजनेचा लाभाची खात्री देत नाही तर पारदर्शकता, कार्यक्षमता याचीही खात्री देतो.
अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र हा प्रकल्प गाव स्तर, ब्लॉक स्तर, जिल्हा स्तर आणि राज्य स्तर तसेच राष्ट्रीय स्तरावरील अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवर लाभार्थीच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करण्यात देखील हा प्रकल्प मदत करतो.

UDID Card चे फायदे ?

  • अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे वेगवेगळी कागदपत्रे तयार करण्याची आवश्यकता नाही, कारण UDID Card धारकाचा सर्व तपशील कार्ड मध्ये Decode जातील.
  • भविष्यातील शासकीय योजनांचे लाभ या कार्डाद्वारे त्यांना घेता येईल, अपंग सत्यापनासाठी हे एकच कार्ड सर्व ठिकाणी मान्य असेल.
  • UDID Card द्वारे मिळणारा पहिला फायदा विशिष्ट प्रकारची विद्यार्थी स्कॉलरशिप.
  • दुसरा फायदा जे दिव्यांग व्यक्तीला इन्कम टॅक्स मध्ये काही कलमांतर्गत सवलत दिली जाते. पण हि सवलत अपंगत्वाचे टक्केवारी नुसार दिली जाते, समजा एखाद्या दिव्यांगाची अपंगत्व टक्केवारी हि १९ ते ४० टक्के असेल तर त्याला इन्कम टॅक्स मध्ये ७५ हजार रु. प्रर्यंत सवलत मिळते, तसेच ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीला १ लाख रु. पर्यंत सूट मिळते.
  • तिसरा फायदा सरकार तर्फे चार टक्के सरकारी नोकरीमध्ये राखीव आरक्षण मिळते.
  • चौथा फायदा, दिव्यांगांना स्वतचा नवीन उद्योग किवा व्यवसाय सुरु करण्यासाठी NHFDC (National Divyangjan Finance and Development Corporation) या बँक कडून बिझनेस लोन दिले जाणार आहे.
  • पाचवा फायदा, युडीआयडी कार्ड मुळे फ्री प्रवास पास तसेच प्रवासामध्ये डिस्काऊंटचा लाभ मिळतो, तसेच मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत मिळते.
  • सहावा फायदा, बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना बेरोजारी भत्ता देखील मिळतो. याचबरोबर सरकारने ठरवलेली बेरोजगार रक्कम ठराविक कालावधीने आपणास बेरोजगार भत्याच्या स्वरूपात प्राप्त होते.
  • नवीन कार किंवा एखादी टूव्हीलर खरेदी करतांना मॉडिफिकेशनच्या दरम्यान किमान १८ टक्के पर्यंत डिस्काउंट त्यांना प्राप्त होतो.
  • परदेशात जाण्यासाठी एअर इंडियाच्या वतीने प्रवासखर्चामध्ये ५०% पर्यंत विशेष सूट मिळते.
  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दिव्यांगाना राहण्यासाठी मोफत घरकुल योजना.
  • विवाह करण्यासाठी राज्यानुसार शासनामार्फत ठराविक रक्कम.
  • त्याचबरोबर शासन चालवत असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, कौशल्य प्रधानमंत्री जीवन जीवन ज्योती बिमा योजना, मनरेगा, लेबर कार्ड, अटल पेन्शन योजना, ई श्रम कार्ड ई. योजनेचा युडीआयडी मुळे डायरेक्ट लाभ देखील मिळतो.
  • राजीव गांधी फाउंडेशन मार्फत फ्री मध्ये दिव्यांगाना स्कुटी वितरीत केल्या जातात, या साठी आपल्याला प्रथम अर्ज करावा लागतो.
  • सरकार मार्फत आयोजित एखाद्या मोठ्या कार्यक्रमादरम्यान सरकार अपंगाला सायकल वाटप देखील करते, ज्यामध्ये इलेक्ट्रिक सायकलसाठी 75 टक्के पर्यंत सरकार अनुदान देते.

UDID Card साठी अर्ज कोण करू शकतो व अर्ज कुठे करावा ?

UDID Card साठी पूर्ण/आंशिक अपंगत्व असलेला कोणताही नागरिक अर्ज करू शकतो.

अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्र / CSC सेंटर मध्ये जाऊन सुद्धा online अर्ज करू शकतात.

 WEBSITE LINK

यु.डी.आय.डी कार्डसाठी UDID Card In Marathi लागणारे आवश्यक कागदपत्रे व पात्रतेच्या अटी कोणत्या आहे ?

  • अर्जदार हा भारताचा दीर्घकालीन नागरिक असावा.
  • अर्जदार अपंग (दिव्यांग) असावा.
  • आधार कार्ड
  • उत्पन दाखला
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट फोटो
  • मो. नंबर व ई-मेल आयडी असणे गरजेचे आहे.

UDID Card किती अंकी असतो ?

दिव्यांग व्यक्तीस ओळख म्हणून एक युनिक क्रमांक दिला जातो, ज्यात पहिले २ अक्षर राज्य कोड, त्यानंतरचे २ अक्षर जिल्हा कोड, त्यानंतर १ अक्षर सीएमओ कोड, त्यानंतर २ अक्षर दिव्यांग कोड, त्यांतरचे ४ अंक दिव्यांग व्यक्तीचे जन्म वर्ष, त्यानंतरचे ६ अक्षरअंक हे रनिंग नंबर साठी व शेवटचा १ चेक राशी करता आहे, जो सुरक्षा कारणामुळे समाविष्ठ केला आहे, असे मिळून युडीआईडी युनिक क्रमांक ( कार्ड नंबर ) हा १८ अंकी असतो.

UDID Card ची वैधता किती कालावधीसाठी आहे ?

UDID Card ची वैधता हि दोन प्रकारची असते.

कायमस्वरूपी UDID Card
तात्पुता UDID Card

कायम स्वरूपी UDID Card :-

ज्या अपंग व्यक्तीची अपंगत्वात कोणतीही प्रगती किवा प्रतीगमन होत नाही हे लक्षात घेऊन सक्षम वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी UDID Card जारी करते.

तात्पुरता UDID Card :-

ज्या अपंग व्यक्तीची अपंगत्वात कोणतीही प्रगती किवा प्रतीगमन लक्षात घेऊन सक्षम वैद्यकीय अधिकरी तात्पुरते UDID Card जारी करते.

UDID Card बनवण्याची प्रकिया (Flowchart) कशी आहे ?

दिव्यांगासाठी युडीआयडी कार्ड नूतनीकरण/नवीन कार्ड तयार करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे (Flowchart).

UDID Card In Marathi
UDID Card In Marathi
  1. ऑनलाईन अर्ज सबमिट करणे.
  • दिव्यांग व्यक्ती युडीआयडी पोर्टलद्वारे नवीन कार्ड किंवा नवीन बनवण्यासाठी अर्ज सबमिट करतो.
  1. अर्ज CMO/DMO कडे पाठवून देणे.
  • संबंधित जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी (DMO) यांच्याकडे अर्ज पाठवून दिला जातो.
  1. अर्जाची पडताळणी
  • CMO/DMO अर्जामध्ये भरलेल्या माहितीची तपासणी करतात.
  1. तज्ञ डॉक्टरांची नेमणूक
  • दिव्यांग व्यक्तीची तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक व विशिष्ट तारखेचे नियोजन केले जाते.
  1. तपासणी व अहवाल तयार करणे
  • तज्ञ डॉक्टर दिव्यांग व्यक्तीची तपासणी करून अहवाल तयार करतात.
  1. वैद्यकीय मंडळाला अहवाल सादर करणे
  • तयार केलेला तपासणी अहवाल वैद्यकीय मंडळाला सादर केला जातो.
  1. वैद्यकीय मंडळाचा निर्णय
  • अपंगत्वाची टक्केवारी
  • अपंगत्वाचा प्रकार
  • अपंगत्व प्रमाणपत्राची वैधता
  1. निर्णय CMO/DMO कडे पाठवणे
  • वैद्यकीय मंडळाचा निर्णय CMO/DMO यांना कळवला जातो.
  1. युडीआयडी कार्डसाठी मंजुरी
  • CMO/DMO वैद्यकीय मंडळाच्या मुल्यांकनावर आधारित अर्जास मंजुरी देतात.
  1. युडीआयडी कार्ड पाठवणे
  • मंजूर केलेले युडीआयडी कार्ड स्पीड पोस्टद्वारे अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवले जाते.
  1. अर्जदाराला कार्ड प्राप्त होणे
  • दिव्यांग व्यक्तीला त्याच्या पत्त्यावर युडीआयडी कार्ड मिळते.

संपर्क माहिती थोडक्यात.

Room No. 517, B-2 Block, Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003 (India)
91-93549-39703
91-11-2436 5019

disability-udid@gov.in

निष्कर्ष | UDID Card In Marathi

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली UDID Card In Marathi | प्रत्येक अपंग व्यक्तीकडे हे कार्ड असलेच पाहिजे. UDID Card – अपंग प्रमाणपत्र \ दिव्यांग कार्ड, याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ | UDID Card In Marathi


१. UDID Card In Marathi कसे मिळेल?

उत्तर – UDID Card ला मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्ही दिलेल्या पत्यावर UDID कार्ड तुम्हाला स्पीड पोस्ट ने प्राप्त होईल.

२. UDID Card In Marathi कार्डला मजुरी मिळाल्यानंतर, स्पीड पोस्ट Tracking नंबर SMS द्वारे मोबाईल नंबरवर प्राप्त होतो का ?

उत्तर- नाही, तुम्हाला युडीआयडी पोर्टलवर लॉगीन करून स्पीड पोस्ट ट्रेकिंग नंबर प्राप्त होईल.

३. UDID Card In Marathi पाहण्यासाठी वेबसाईट सांगावी ?

उत्तर- येथे क्लिक करावे.


हे देखील वाचा


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.