LIC Policy For Children
LIC Amrit Bal Scheme: एलआयसी निरनिराळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी पॉलिसी आणत असते. अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं एलआयसीत गुंतवणूक करत असतात. एलआयसीनं लहान मुलांसाठी आता जबरदस्त पॉलिसी आणली आहे.
LIC Policy : मुलांसाठी LIC ची विशेष पॉलिसी, इन्शुरन्ससोबत गॅरेंटीड रिटर्नही मिळणार
LIC Amrit Bal Scheme: एलआयसीची अमृत बाल योजना ही मुलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देणारी एक खास मुलांच्यासाठी डिझाईन केलेली पॉलिसी आहे. ही योजना विशेषतः पालकांना फोकस करून तयार करण्यात आली आहे, ज्यांना आपल्या मुलांसाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करायचं आहे. या योजनेद्वारे पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षण, लग्न आणि अन्य महत्त्वाच्या गरजांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद आधीच करता येते.
ही पॉलिसी नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्रकारातील असून, ती विम्यासह खात्रीशीर परतावा देखील देते. अमृत बाल योजनेमध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलांच्या भविष्यसाठी मोठ्या प्रमाणात बचत करू शकतात, जी त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी उपयुक्त असेल. यामध्ये पॉलिसीधारकांना ठराविक कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर आकर्षक परतावा दिला जातो.
ही योजना केवळ आर्थिक सुरक्षाच नाही, तर पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी मनःशांती देखील देते. एलआयसीच्या बाबतीत लोकांमध्ये असलेल्या विश्वासार्हतेमुळे ही योजना पालकांसाठी अधिक विश्वासार्ह आणि लाभदायक ठरते आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी अमृत बाल योजनेचा नक्की विचार करावा अशी ही योजना आहे.
LIC Amrit Bal Scheme ही पॉलिसी कोणासाठी घेता येईल यावर थोडं बोलूयात?
ही पॉलिसी तुम्ही ३० दिवस ते १३ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींसाठी घेऊ शकता. मॅच्युरिटीसाठी किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे असावं. अल्पावधीत या पॉलिसीसाठी ५, ६ किंवा ७ वर्षांचा प्रीमियम भरण्याची मुदत उपलब्ध आहे. तर, प्रीमियम भरण्याची कमाल मुदत १० वर्षे आहे. आपण सिंगल प्रीमियम पेमेंट पर्याय देखील निवडू शकतो. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कमीत कमी २ लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल. जर तुम्हाला मॅच्युरिटी सेटलमेंट मनी बॅक प्लॅन प्रमाणे घ्यायची असेल तर तुम्ही ती ५ व्या, १० व्या किंवा १५ व्या वर्षात घेऊ शकता.
रिटर्न कसा मिळेल याबद्दल जाणून घेऊ.
या योजनेत प्रत्येक १००० रुपयांच्या विमा रकमेला ८० रुपयांच्या प्रमाणात खात्रीशीर परतावा मिळेल. ८० रुपयांचा हा परतावा विमा पॉलिसीच्या विम्याच्या रकमेत जोडला जाईल. उदाहरणार्थ, जर आपण आपल्या मुलांच्या नावावर १ लाख रुपयांचा विमा घेतला असेल तर एलआयसी विम्याच्या रकमेत ८००० रुपये जोडेल. दरवर्षी पॉलिसी वर्षाच्या शेवटी हा हमी परतावा आपल्या खात्यामध्ये जोडला जाईल. आपण ज्या कालावधीसाठी पॉलिसी घेतली आहे त्या कालावधीसाठी हे आपल्या पॉलिसीमध्ये जोडलं जाईल.
LIC Amrit Bal Scheme ही पॉलिसी कशी खरेदी कराल?
जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी ही पॉलिसी खरेदी करायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय तुमच्यासाठी येथे उपलब्ध आहेत. कमीत कमी विमा रक्कम २,००,००० रुपये आहे, तर यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक असा पर्याय मिळेल, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. ही स्कीम आपल्याला सिंगल प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम अंतर्गत दोन पर्यायांनुसार सूट बेनिफिट रायडर निवडण्याची परवानगी देते.
खरेदीचे फायदे काय?
मॅच्युरिटीवर गॅरंटीड बोनस आणि विम्याची रक्कम मिळेल. पॉलिसी खरेदी करणाऱ्यांसाठी ‘सम इन्शुरन्स ऑन डेथ’ हा पर्यायही उपलब्ध असणार आहे. तसंच थोडा अतिरिक्त प्रीमियम भरल्यास खर्चाच्या बदल्यात प्रीमियम रिफंड घेऊ शकता. या योजनेत कर्जाची सुविधा देखील दिली जाते.
निष्कर्ष | LIC Policy For Children : LIC Amrit Bal Scheme.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली LIC Policy For Children : मुलांसाठी LIC ची खास पॉलिसी, इन्शुरन्ससोबत गॅरेंटीड रिटर्नही, जाणून घ्या आमच्या सोबत योजनेविषयी संपूर्ण माहिती? या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ | LIC Policy For Children : LIC Amrit Bal Scheme.
१. LIC Policy For Children म्हणजे काय?
उत्तर – याची pdf ची लिंक तुमच्यासाठी यावर क्लिक करा.
२. LIC Policy For Children याचा फायदा मुलांचे पालक कसा घेऊ शकतात?
उत्तर- या योजनेद्वारे पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षण, लग्न आणि अन्य महत्त्वाच्या गरजांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद आधीच करता येते.
३. LIC Policy For Children साठी कुठे अर्ज करता येईल वेबसाईट सांगावी?
उत्तर- एल.आय.सी. वेबसाईट लिंक
हे देखील वाचा
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.