tukade bandi kayda 2024। आता करता येणार 1 गुंठ्याची खरेदी विक्री, तुकडे बंदी कायद्यात सुधारणा.

tukade bandi kayda 2024

आता 1 गुंठ्याची खरेदी विक्री करता येणार पहा संपूर्ण माहिती आमच्यासोबत.
नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील tukade bandi kayda 2024 सुधारणा विधेयक सादर केले.


विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता यापुढे १ गुंठा, २ गुंठे, ३ गुंठे, ४ गुंठे अशी जमीन खरेदी करणे किंवा विक्री करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
तुकडेबंदी कायदा १९४७ रोजी अंमलात आणला गेला होता. यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास निर्बंध आणले होते.
आता मात्र सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक, दोन, तीन किंवा चार ते पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास मान्यता दिली जात आहे.

tukade bandi kayda 2024
tukade bandi kayda 2024

तुकडेबंदी विधेयकामध्ये केलेल्या या बदलामुळे एखाद्याला शेतात घर बांधायचे असेल किंवा शेतात जाण्यासाठी रस्ता खरेदी करायचा असेल किंवा विहीर खोदकामासाठी १ गुंठा किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करणे असेल ही सर्व कामे आता सोपी होणार आहेत.
जमीन खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते. ठरवून दिलेल्या क्षेत्रापेक्षा कमी जमीन शेतकऱ्यांना विकता येत नव्हती किंवा खरेदी देखील करता येत नव्हती, आता 1 गुंठ्याची खरेदी विक्री होणार असल्याने समस्या सुटली आहे.


बाजारमूल्याच्या ५ टक्के शुल्क भरून करता येईल खरेदी विक्री.

प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी किंवा विक्रीस बंदी घालण्यात आली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समोरील डोकेदुखी वाढली होती. बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासनास जमा करण्याची अट असल्याने अनेकांनी हे व्यवहार करणे टाळले.
आता मात्र बाजार मूल्याच्या ५ टक्के रक्कम शासनास भरून तुम्ही १ गुंठ्याची खरेदी विक्री करू शकता.


या संदर्भात अगोदर अद्यादेश काढण्यात आला होता या अद्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले आणि ते मंजूर करण्यात आले आहे.
लक्षात असू द्या कि केवळ घर बांधकाम करण्यासाठी, विहिरी खोदकाम करण्यासाठी व शेत रस्त्यासाठी हे १, २, ३ ४ किंवा ५ गुंठ्याची खरेदी करता येणार आहे. यामुळे नक्कीच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


निष्कर्ष | tukade bandi kayda 2024

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली tukade bandi kayda 2024। आता करता येणार 1 गुंठ्याची खरेदी विक्री, तुकडे बंदी कायद्यात सुधारणा. याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ | tukade bandi kayda 2024


१.tukade bandi kayda 2024 म्हणजे काय?

उत्तर – तुकडेबंदी विधेयकामध्ये केलेल्या या बदलामुळे एखाद्याला शेतात घर बांधायचे असेल किंवा शेतात जाण्यासाठी रस्ता खरेदी करायचा असेल किंवा विहीर खोदकामासाठी १ गुंठा किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करणे असेल ही सर्व कामे आता सोपी होणार आहेत.

२.tukade bandi kayda 2024 या लेखाचा फायदा लोकांना कसा होऊ शकतो ?

उत्तर- यामुळे आता यापुढे १ गुंठा, २ गुंठे, ३ गुंठे, ४ गुंठे अशी जमीन खरेदी करणे किंवा विक्री करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

३. tukade bandi kayda 2024 हा निर्णय पाहण्यासाठी वेबसाईट सांगावी ?

उत्तर- येथे क्लिक करावे.


हे देखील वाचा


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.