RBI Collateral Free Agricultural Loan Limit.
शेतकऱ्यांना 2 लाख विनातारण कर्ज मिळणार असल्याचा निर्णय रिजर्व बँकेने घेतला आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
अनेक शेतकरी बांधवाना शेती निविष्ठा खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते. बँकेच्या आर्थिक धोरणानुसार विनातारण कर्ज फक्त १ लाख ६० एवढेच असल्याने अल्प भूधारक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय उरत नव्हता.
आता मात्र विनातारण कर्ज हे २ लाख रुपयांपर्यंत मिळणार असल्याने अनेक अल्पभू धारक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
2 लाख विनातारण कर्ज आर्थिक पतधोरण समितीच्या बैठकीनंतर निर्णय
शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी रिजर्व बँकेच्या आर्थिक पतधोरण समितीची बैठक झाल्यानंतर रिजर्व बँकेचे गव्हर्नर दास यांनी विना तारण कर्ज मर्यादा २ लाख रुपये वाढविण्यात आले असल्याची घोषणा केली आहे.
दर दोन महिन्यांनी रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होते. यापूर्वी विनातारण कर्जाची मर्यादा 1 लाख 60 हजार एवढी होती यामध्ये २०१९ पासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आता मात्र विनातारण कर्ज २ लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. या निर्णयामुळे लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईलच.
आरबीआयचा अधिकृत निर्णय पाहण्यासाठी खाली लिंक च्या स्वरूपात देत आहोत.
बँकांकडून मिळते आहे शेतीसाठी कर्ज.
शासनाच्या धोरणानुसार बँकेकडून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यात येते. हे पिक कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना खूप खटाटोप करावा लागतो.
बहुतेक वेळा अस होत की बँक कर्ज प्रकरणासाठी लागणारी कागदपत्रेच माहिती नसल्याने त्यांची नेहमीच तारांबळ उडते यामुळे अनेक शेतकरी बँक कर्जाच्या भानगडीतच न पडता सरळ खाजगी सावकाराकडून कर्ज घेतात.
अनेकदा खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज जास्त झाल्याने अनेक शेतकरी नैराश्यग्रस्त होतात आणि चुकीचे पाउल उचलतात.
त्यामुळे आता शासनाने देखील बँकांना शेतकऱ्यांना कमी कागदपत्रामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
निष्कर्ष | RBI Collateral Free Agricultural Loan Limit.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली RBI Collateral Free Agricultural Loan Limit | विनातारण २ लाखांचे कर्ज ! शेतकऱ्यांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय, कर्जाची मर्यादा वाढवली. या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ | RBI Collateral Free Agricultural Loan Limit.
१. RBI Collateral Free Agricultural Loan Limit चा शासन निर्णय तुम्ही कुठे पाहू शकता?
उत्तर –https://rbidocs.rbi.org.in/rdocs/notification/PDFs/NOT96144E24E148514F10B93A2E1CD4D649B1.PDF या लिंक वर जाऊन बघू शकता.
२. RBI Collateral Free Agricultural Loan Limit याचा फायदा शेतकरी कसा घेऊ शकतात?
उत्तर- शेतीसाठी अचानक उद्भवणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी याचा फायदा शेतकरी घेऊ शकतात.
३. RBI Collateral Free Agricultural Loan Limit कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या देशातील सर्व नागरिकांसाठी हि योजना लागू झाली आहे.
४. RBI Collateral Free Agricultural Loan Limit चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर- आपल्या देशातील सर्व नागरीक.
5. RBI Collateral Free Agricultural Loan Limit या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर – २ लाखांपर्यंत लोन.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.