Rasta magni arj 2025
शेत रस्ता प्रश्न आता सुटणार शिवाय शेतरस्त्याची नोंदणी जमिनीची रजिस्ट्री करतांना इतर अधिकारामध्ये घेतली जाणार आहे, पहा याची सविस्तर माहिती.
वाहनाच्या प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत संबधित तालुक्यातील तहसीलदार यांना निर्णय घेता यावेत याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
Rasta magni arj 2025
सद्य परिस्थितीत जे अस्तित्वातील रस्ते आहेत त्यांना आता क्रमांक मिळणार आहेत. यापुढे जमीन खरेदी किंवा विक्रीच्या रजिस्ट्रीमध्ये जे शेत घेतले किंवा विकले जातील त्यासाठी कोणता रस्ता आहे हे दाखविणे बंधनकारक असेल.
शेतरस्त्याच्या नोंदी सातबाराच्या इतर अधिकारामध्ये दाखविणे या संदर्भात सूचना महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आल्या आहेत.
तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयात आता अर्ज देखील सादर करू शकता आणि कायदेशीर रित्या रस्ता देखील मिळवू शकणार आहात.
शेत रस्ता मागणी अर्ज डाउनलोड करण्यसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शेत जमीन वहिवाट-रस्ता संदर्भात तहसीलदार यांना सूचना करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
शेत जमीन वहिवाटरस्ता संदर्भात तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या असून आता रस्त्याची प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा आपण करू.
रस्ता वादा बाबत तक्रार असेल तर त्या संदर्भात सगळ्यात आधी तक्रार ही तहसीलदार यांच्याकडे केली जाते त्यानंतर तक्रारदार थेट उच्च नायालयात देखील अपील करू शकतात.
परंतु थेट उच्च न्यायालयात अपील जाण्यापूर्वी आता मध्यस्त म्हणून आणखी नवीन एक नवा पर्याय सरकारकडून देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी होय.
थेट उच्च न्यायालयात अपील करण्यापूर्वी अतिरिक्त उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागता येणार आहे अर्थात या संदर्भात महसूल मंत्री यांनी सूचना केल्या असून लवकरच त्याची अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.
शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता आवश्यकच
शेतीमध्ये यांत्रिकीकरणामुळे अनेक कामे सुलभ झाली आहेत. त्यामुळे पारंपरिक बैल मेहनत ऐवजी आता बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीने चालणाऱ्या यंत्रांच्या सहाय्याने आपल्या शेतातील विविध कामे सहज करत आहेत.
परंतु काही ठिकाणी पाउलवाट असल्याने अशा रस्त्याने ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या मदतीने चालणारी यंत्रे जावू शकत नाहीत, त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांवर विपरीत परिणाम होतो.
शेतात खत न्यायचे असेल तरी देखील रस्त्याअभावी ते नेता येत नाही.
शेतातील मालाची मळणी केल्यानंतर रस्ता नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल योग्य वेळी बाजारात पोहोचविता येत नाही. यामुळे माल वेळेत विक्रीस न गेल्याने त्याची गुणवत्ता कमी होतेच आणि योग्य दर देखील मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शिवाय, खराब रस्ते आणि वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा यामुळे शेतकऱ्यांना अधिक खर्च सहन करावा लागतो, तसेच त्यांना आपल्या उत्पादनाच्या योग्य किमतीपासून वंचित रहावे लागते.
यामुळे शेतीला रस्ता असणे शेती असण्यापेक्षा जास्त गरजचे आहे. रस्ता विरहीत शेती म्हणजे पाणी विरहीत विहीर असल्या सारखे आहे.
Rasta magni arj 2025
शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर मिळतो नवीन शेत-रस्ता
तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल किंवा उपलब्ध असलेला रस्ता कोणी अडविला असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही तहसीलदार यांच्याकडे दाद मागू शकता.
तहसील कार्यालयात अर्ज करून आपल्या समस्येची सविस्तर माहिती द्यावी आणि आवश्यक असणारी कागदपत्रे त्याला जोडावीत. तहसीलदार संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी करून योग्य तो निर्णय देतील.
तसेच, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महसूल विभाग यांच्याशी संपर्क साधून देखील तुम्ही रस्त्याच्या समस्येवर योग्य तो उपाय शोधू शकता. जर आवश्यक असेल, तर कायदेशीर मार्गाचाही अवलंब करता येऊ शकतो.
रस्ता मागणी केल्यानंतर किंवा रस्त्याची रीतसर तक्रार केल्यानंतर तहसीलदार या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून निर्णय देवू शकतात.
अर्थात तहसीलदार यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आवाहन देखील देता येते. शेत रस्ता प्रश्न सुटणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे, अशी आशा करूयात.
निष्कर्ष | Rasta magni arj 2025
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Rasta magni arj 2025 | शेत रस्त्याचा प्रश्न आता सुटणार वाहनांच्या वापरानुसार रस्ता करण्याच्या सूचना – महसूल मंत्र्यांची माहिती. याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ | Rasta magni arj 2025
१. Rasta magni arj 2025 का महत्वाचा आहे?
उत्तर – शेतकर्यांचे शेत रस्त्याबाबतचे प्रश्न यामुळे सुटतील त्यामुळे हा महत्वाचा आहे.
२. Rasta magni arj 2025 या लेखाचा फायदा लोकांना कसा होऊ शकतो ?
उत्तर- शेत रस्ता प्रश्न सुटणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे, अशी आशा करूयात.
३.Rasta magni arj 2025 ला अप्लाय करण्यासाठी वेबसाईट सांगावी ?
उत्तर- येथे क्लिक करावे.
हे देखील वाचा
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.