PM Kisan Yojna 18th Installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojna) अंतर्गत शेतकऱ्यांना १८व्या हप्त्याच्या (₹2000) वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. या १८ व्या हप्त्याचा वितरण समारंभ हा ५ ऑक्टोबर २०२४ रोजी वाशिम, महाराष्ट्रमध्ये या ठिकाणी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमाद्वारे ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्रित ₹२०,००० कोटींची रक्कम स्थानांतरित केली जाणार आहे.
पीएम किसान योजना – PM Kisan Yojna 18th Installment
प्रधानमंत्री किसान योजनेच्या अंतर्गत वर्षाला मिळणारे ६००० रुपये यासाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केले आहे का नाही, याची तपासणी करणे गरजेचे आहे. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत मिळणारे हप्ते प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे, असे अधिकृतपणे सूचित करण्यात आलेले आहे.
योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी PMKisan- eKYC करणे अनिवार्य असल्याची माहिती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. आधार आणि बायोमेट्रिक eKYC करण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करावे.
LINK – https://pmkisan.gov.in/ पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाशिम, महाराष्ट्रमध्ये या योजनेचा १८वा हप्ता वितरीत करणार आहेत. यावेळी पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधून राष्ट्राला संबोधित करतील.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल – PM Kisan Yojna.
पीएम-किसान योजनेच्या अंतर्गत पात्र अशा लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6000/- दिले जातात, जे तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे प्रति हप्ता ₹2000/- वितरित केले जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव आहे का नाही याची खात्री करायची असल्यास, सरकारने ही सुविधा आता ऑनलाइन देखील उपलब्ध केली आहे.
आपण २०२४ साठीच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत आपले नाव आहे कि नाही हे तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ PMKisan वर जाऊ शकता. नवीन यादीत आपले नाव ऑनलाइन तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
LINK – https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
तुमच्या खात्यात जर ₹2000 जमा झाले नसतील, तर तक्रार कशी करावी, हे घ्या जाणून?
सर्वप्रथम, आपण आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यांना आपल्या समस्येबद्दल माहिती द्यावी. जर ते तुम्हाला मदत करत नसतील, तर तुम्ही संबंधित हेल्पलाइन नंबर वर कॉल करू शकता.
तुम्ही सोमवार ते शुक्रवार दरम्यान पीएम किसान हेल्प डेस्कला ई-मेल/Email) pmkisanict@gov.in वर संपर्क करू शकणार आहात.
जर तुम्हाला यावरून काहीही उत्तर मिळाले नाही, तर तुम्ही 011-23381092 /Direct Helpline) या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुमच्या खात्यात ₹2000 जमा झाले नसल्यास, ऑनलाईन तक्रार करण्यासाठी (Grievance PM Kisan) येथे क्लिक करा.
LINK- https://pmkisan.gov.in/Grievance.aspx
निष्कर्ष | PM Kisan Yojna 18th Installment
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली PM Kisan Yojna 18th Installment\शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता वर्ग करण्यात येत आहे याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना