MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024|आवडेल तिथे प्रवास योजना २०२४

MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024 (आवडेल तिथे प्रवास योजना २०२४)

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाचे तसेच नोकरी करणाऱ्या लोकांचे देखील फिरायला जाणे राहून जाते. प्रत्येक माणसाची अशी इच्छा असते की काही विरंगव्याचे क्षण आपल्या कुटुंबा सोबत आनंदाने जगावे. आर्थिक परिस्थितीमुळे लोकांना या आनंद पासून वंचित राहावे लागते. यावर पर्याय म्हणून आपल्या राज्य शासनाने आवडेल तिथे प्रवास योजना सुरू केली आहे .या योजनेअंतर्गत महाराष्ट्रभर आपल्याला कुठेही फिरता येणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा पास योजना या नावाने देखील ही योजना ओळखली जाते. योजनेमार्फत आपण ११००/- रुपयांमध्ये पूर्ण महाराष्ट्र्र फिरू शकतो.

आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत अर्जदारास सात दिवस किंवा चार दिवसाचा पास मिळणार आहे.या योजनेअंतर्गत पहिल्या दिवशीच्या रात्री बारापासून शेवटच्या दिवशीच्या रात्री बारापर्यंत या योजनेचा पास उपलब्ध करून दिला जाईल.
या योजनेअंतर्गत आपण धार्मिक स्थळे ,पर्यटन स्थळे ,निसर्गरम्य स्थळे ,समुद्रकिनारी अत्यंत कमी खर्चामध्ये भेट देऊ शकतो.

आवडेल तिथे प्रवास ही योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मार्फत चालवली जात आहे. आपल्या राज्यातील नागरिकांना कुठे फिरायला जायचे असेल. तर त्यासाठी दहा दिवस अगोदर पास काढणे गरजेचे आहे. अर्जदाराने काढलेला पास हा शिवशाही तसेच लाल परी तसेच नियमित सुटणाऱ्या बसेस व यात्रेसाठी ज्या वाढीव बसेस महामंडळामार्फत दिल्या जातात त्या सर्व ठिकाणी हा पास ग्राह्य धरला जाईल.

योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या पैशाची बचत होणार आहे अत्यंत कमी खर्चामध्ये विविध धार्मिक स्थळे,पर्यटनसतले स्थळे अशा विविध ठिकाणी सर्वसामान्य प्रवासी फिरू शकतात.

MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024 |आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ , या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावMSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024 (आवडेल तिथे प्रवास योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील सर्व नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेअतिशय कमी खर्चात ७ किवा ४ दिवस पास काढून हवे तेथे फिरता येणार आहे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024 (आवडेल तिथे प्रवास योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर022-23024068
1800221250
MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024
MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024

आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024 ):-

  • आजच्या धकाधकीच्या आयुष्यात सर्वसामान्य लोकांच्या फिरायला जायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या राज्य सरकारनेही योजनाा राबवली आहे.
  • आपल्या सर्वसामान्य लोकांना एसटीने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन देणे या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेद्वारे अत्यंत कमी खर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक विविध धार्मिक स्थळे फिरून येऊ शकतात.
  • या योजनेद्वारे पर्यटन क्षेत्राचा देखील विकास होणार आहे.

आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents of MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)

आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024 ) :-

  1. या योजनेअंतर्गत प्रवास करायचा असेल तर किमान दहा दिवस आधी पास काढणे गरजेचे आहे.
  2. पास असल्या कारणाने कोणतीही रिझर्व जागी या प्रवासी बांधवांना राखीव ठेवण्यात येणार नाही त्यामुळे मिळेल त्या जागेत प्रवाशांना प्रवास करावा लागेल.
  3. प्रवासामध्ये प्रवास धारकाचा पास हरवल्यास दुसरा पास मिळणार नाही.
  4. प्रवासी पासचा गैरवापर करत असेल जागेवर हक्क सांगत असेल तर अशाा परिस्थितीमध्ये पास जप्त केला जाईल.
  5. प्रवास करताना प्रवाशांनी स्वतःच्या मौल्यांवस्तीची जबाबदारी स्वतः घ्यावी प्रवासा दरम्यान कोणती मौल्यवान वस्तू हरवली तर त्याला महामंडळ जबाबदार राहणार नाही.
  6. सातव्या किंवा चौथ्या दिवशी पास संपल्यानंतर उरलेल्या प्रवासाचे तिकीट अर्जदारास काढावे लागेल.
  7. अचानक झालेला संप किंवा काम बंद असल्यास प्रवाशांनी काढलेल्या पास ची मुदत वाढ करून दिली जाईल ,मुदत वाढीचा कालखंड पुढील तीन महिन्याचा असेल.
  8. ज्या व्यक्तीने हा पास काढलेला आहे. त्या व्यक्तीलाच या पासचा फायदा घेता येणार आहे. हा पास तो व्यक्ती दुसरा कोणत्याही व्यक्तीला देऊ शकणार नाही.
  9. या योजनेअंतर्गत कुटुंबातील मुले देखील प्रवास करू शकतात त्यासाठी त्यांची वय पाच वर्षा पेक्षा जास्त असावे. परंतु बारा वर्षापेक्षा कमी असावे.
  10. या योजनेअंतर्गत सात किंवा चार दिवसाचाच पास दिला जाईल.
  11. या योजनेअंतर्गत प्रौढ असणारे व्यक्तीला 30 किलो व व लहान मुले पाच ते बारा वर्षाच्या वयोगटातील मुलांना 15 किलोचे सामान सोबत घेऊन जाता येईल.
MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024
MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024

आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ चा लाभ

१.७(सात) दिवसाच्या पास साठी किती पिसे आकारले जातील-

बस चे प्रकारसाधी(लाल परी,यशवंती)शिवशाही
प्रौढ(१२ वर्ष वरील सर्व)२०४०३०३०
मुले(वय वर्ष ५ ते वय वर्ष १२ )१०२५१५२०

२.४(चार) दिवसाच्या पास साठी किती पिसे आकारले जातील-

बस चे प्रकारसाधी(लाल परी,यशवंती)शिवशाही
प्रौढ(१२ वर्ष वरील सर्व)११७०१५२०
मुले(वय वर्ष ५ ते वय वर्ष १२ )५८५७६५

आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024) :-

  • आवडल तिथे प्रवास योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर आपण क्षेत्रात राहतो जवळपास येथे राज्य परिवहन ओव्हन बस स्टॅन्ड आहे तिथे आपल्याला आहे
  • इथून आपल्याला योजनेचा अर्ज घ्यायचा आहे
  • आता आपल्याला वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जाबरोबर जोडायचे आहेत
  • आणि पैसे भरून आपल्याला आपला पास मिळवायचा आहे

MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024
MSRTC Aavadel Tithe Pravas Yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१.आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ चा पास आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

२. या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-https://npublic.msrtcors.com/reservation-home?faces-redirect=true&deviceType=browser

३. आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.

४. आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील सर्व लहान मोठे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ दिले जाणारे लाभ ?

उत्तर- आवडेल तिथे प्रवास योजना २०२४ या योजने अंतर्गत अतिशय कमी खर्चात ७ किवा ४ दिवस पास काढून हवे तेथे फिरता येणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.