Nirdhur Chul Vatap Yojana 2024 (निर्धूर चूल वाटप योजना २०२४)
आपला भारत देश दिवसें दिवस प्रगतीपथावर चाललेला आहे परंतु आजही आपल्या देशात असे काही कुटुंब आहे जे रोजच्या जेवणासाठी रोजंदारीचे कामे करतात.अशा दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी आपल्या केंद्र सरकारने उज्वला उज्वला योजना सुरू केली होती. ज्या योजनेअंतर्गत गॅसचे कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे परंतु आज गॅस कनेक्शन घेतल्यानंतर गॅसचे भाव इतके वाढलेले आहेत. सर्वसामान्य लोकांना हे भाव परवडणारे नाहीत.
अशा स्थितीमध्ये हे ग्रामीण भागातील लोक स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करत आहेत. चुलीच्या वापरामुळे ग्रामीण भागात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढ झाली आहे आणि चुलीचा वापर केल्यामुळे चुलीमधून निघणारा जो धूर आहे तो आरोग्यासाठी चांगला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्यावर देखील या सगळ्या गोष्टींचाचा परिणाम होत आ.हे अनेक महिलांना दम्याचा आजाराला सामोरे जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून आपल्या राज्य सरकारने या ग्रामीण भागातील लोकांसाठी निर्धूर चूल वाटप योजना सुरू केली आहे.
या योजनेमध्ये ज्या चुलीचे वाटप केले जाणार आहे ते महात्मा फुले नवनीकरण ऊर्जा व पायाभूत औद्योगिक मर्यादित यांच्याकडून सुरू केली गेली आहे. आपल्या राज्यामधील 36 जिल्ह्यामध्ये ही योजनाा सुरू झाली आहे. समाज कल्याण विभागाकडून ही योजना सुरू झाली आहे. राज्यातील वायु प्रदूषण कमी करणे हा या योजनेमागचा प्रमुख हेतू आहे. या योजनेचा फायदा आपल्या ग्रामीण भागातील महिला घरबसल्या घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत आपले पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे व स्त्रियांचे व घरातील लहान मुलांचे आरोग्य निरोगी होणार आहे.
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Nirdhur Chul Vatap Yojana 2024 }
एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Nirdhur Chul Vatap Yojana 2024 (निर्धूर चूल वाटप योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | आपले राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | राज्यातील अनुसूचीत कुटुंबेआणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंब |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | या योजने मार्फत निर्धूर चूल वाटप होणार आहे |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Nirdhur Chul Vatap Yojana 2024 (निर्धूर चूल वाटप योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 022-22621934 022-26200351 022-26202852 |
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Nirdhur Chul Vatap Yojana 20244 ):-
- आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब, अनुसूचित जाती, जमाती मधील कुटुंबांना निर्धूर चूल वाटप होणार आहे .या योजनेअंतर्गत प्रदूषण कमी करण्यावर आपल्या सरकारचा भर असणार आहे.
- या योजनेद्वारे वृक्षतोड थांबविणे हे देखील आपल्या सरकारचे प्रमुख उद्देश आहे.
- योजनेअंतर्गत आपल्या घरातील लहान मुले व महिला यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यावरआपले सरकार भर देत आहे.
- या योजने मार्फत जंगलतोड होते त्यावर निर्बंध घातले जाणार आहेत.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या चुलीमुळे गॅस कनेक्शन साठी लागणारा पैसा गरीब कुटुंबाचा वाचणार आहे त्यामुळे आर्थिक चणचण कमी होणार आहे.
- आपल्या राज्यातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूक राहण्यासाठी सरकारी योजना राबवत आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधरेल तसेच महिला आधुनिक तंत्रज्ञानासोबत पुढे जातील महिला आपल्या कुटुंबाला देखील कुठे घेऊन जाण्यास मदत करतील.त्यामुळे राज्याचा देखील विकास होणार आहे.[nirdhur chul online registration]
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Nirdhur Chul Vatap Yojana 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Nirdhur Chul Vatap Yojana 2024 ) :-
- निर्धूर चूल योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी राबवली जात आहे त्यामुळे या योजनेचा अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अनुसूचित जातीतील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे अनुसूचित जातीचा जात प्रमाणपत्र या कुटुंबाकडे असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील कुटुंब घेऊ शकतात त्यामुळे आपण ग्रामीण भागात राहत असल्याचा पुरावा या कुटुंबाकडे उपलब्ध असावा.
- तसेच ही कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असावी त्यामुळे दारिद्रखालील रेशन कार्ड त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराने यापूर्वी कधीही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजनेद्वारे निर्धूर चुलीचा लाभ घेतलेला नसावा.
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Nirdhur Chul Vatap Yojana 2024) :-
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेचा अर्ज ऑनलाईन प्रकारे करता येईल.
निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता बघूया ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल-
- निर्धूर चूल योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करायचे आहे.
Nirdhur Chul Vatap Yojana 2024 (निर्धूर चूल वाटप योजना २०२४)
- आता आपल्यासमोर होम पेज ओपन होईल त्या होम पेजवर आपल्याला महाप्रीत या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेजवर ओपन होईल त्यामध्ये आपल्याला लेटेस्ट नोटिफिकेशन वर क्लिक करायचे आहे.
- Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर सर्व अटी दिलेले आहे .आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून घ्यायचे आहे.
- आता आपल्याला येथे क्लिक करायचे असा ऑप्शन मिळेल तेथे क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विचारलेले सर्व प्रश्नांची आपल्याला व्यवस्थित माहिती भरायची आहे.
- आता आपल्याला वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जासोबत अपलोड करायची आहेत.
- आणि सेव बटन वर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या निर्धर चूल योजनेचा फॉर्म भरला जाईल.nirdhur chul online registration]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. निर्धूर चूल वाटप योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेचा अर्ज ऑनलाईन प्रकारे करता येईल.
२. निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mpbcdc.maharashtra.gov.in/
३. निर्धूर चूल वाटप योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर- आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू झाली आहे.
४. निर्धूर चूल वाटप योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या राज्यातील अनुसूचीत जातीतील कुटुंब आणि दारिद्य्र रेषेखालील कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर- निर्धूर चुलीचे वाटप या योजने अंतर्गत केले जाणार आहे.
6. निर्धूर चूल वाटप योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-या योजने मार्फत निर्धूर चुलीचे वाटप करू प्रदूषण कमी करणे हा प्रमुख उद्देश आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.