“पहिल्या मुलीनंतरच पाळणा थांबवा| 50 हजार रुपये मिळवा” Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024|माझी कन्या भाग्यश्री योजना

Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024 (माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४)

आपल्या भारत देशात लैंगिक भेदभाव पूर्वीपासून चालत आलेला आहे. आपला देश पुरुषप्रधान देश म्हणून ओळखला जातो .आपल्या देशात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आपले भारत सरकार अनेक योजना राबवते त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना.

माझी कन्या भाग्यश्री योजना प्रामुख्याने दोन प्रकारे काम करते पहिला प्रकार म्हणजे ज्या घरात एका मुलीचा जन्म झाला आहे व त्यानंतर माताने आपली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे.अशा कुटुंबाला आपले सरकार २५०००/- बँक खात्यात देत आहे.दुसरा प्रकार म्हणजे ज्या घरात दोन मुलीचा जन्म झाला आहे आणि त्या नंतर मातेने आपली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे किंवा वडिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे.अशा कुटुंबाला आपले सरकार ५००००/- बँक खात्यात देत आहे. 2014 पूर्वी जन्मलेल्या सर्व मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचे नंतर रूपांतर सुकन्या योजनेमध्ये झाले.

माझी कन्या भाग्यश्री योजना ही आपल्या भारत देशात राबवली जाते. त्यानंतर ती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविली जात आहे.या योजनेअंतर्गत एक मुलगा एक मुलगी असेल तर ते कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरते.

2011 च्या जनगणनेनुसार आपल्या राज्याचा मुलींचे प्रमाण 1000 मुलांना माघे 894 इतके होते.हे प्रमाण अतिशय कमी आहे .त्यामुळे आपल्या राज्यातील दहा जिल्ह्यांची निवड या योजनेसाठी करण्यात आली प्रामुख्याने या योजनेअंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव चा नारा लावला जातो. या योजनेअंतर्गत मुलींचे शिक्षण मुलींचा जन्मदर वाढविणे, बालविवाह रोखणे,मुलींचे बाल हत्या प्रमाण कमी करणे, मुलींना एक उत्कृष्ट भवितव्य देणे या सर्व बाबींचा विचार करून आपले भारत सरकार ही योजना राबवत आहे. या योजनेचा लाभार्थी आपल्या महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील असे सर्व कुटुंबा आहेत.

Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024(माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४) , या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावMazi Kanya Bhaghyashri Yojna 2024 (माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील मुली
योजने मार्फत काय लाभ होणार आहे५०,०००/- रुपये
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024 (माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबरSecretary
(O) 22027050
psec.wchd@maharashtra.gov.in

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose ofMazi Kanya Bhaghyashri Yojna 2024):-

  • माझी कन्या भाग्यश्री योजनेचे प्रमुख उद्दिष्टे हे आहे की आपल्या देशातील मुलींचे जन्मदर वाढविणे.
  • स्त्री भ्रूण हत्या वर आळा घालणे देखील या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेद्वारे मुलींचे शिक्षण पद्धतीमध्ये वाढ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • योजनेअंतर्गत मुलींचे आरोग्य सुधारण्यावर देखील भर दिला जाणार आहे.
  • या योजनेद्वारे बातमी रोखण्यावर भर दिला जाणार आहे.
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents of Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदार मुलीचे व तिच्या आईचे बँक खाते पासबुक
  • एका मुली नंतर किंवा दोन मुली नंतर कुटुंब नियोजनाचा ऑपरेशन केल्याचा दाखला किंवा नसबंदी केल्यासाठी त्याचा दाखला.
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024) :-

  1. अर्जदार कुटुंब हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे.
  2. या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अशा दोन्ही कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे आपल्याकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
  3. अर्जदार मुलीचा जन्माचा दाखला कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे.
  4. अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  5. एखाद्या कुटुंबाने अनाथ आश्रमातून एखादी मुलगी दत्तक घेतलेली असेल तर त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.त्या कुटुंबाची प्रथम मुलगी असा मान दिला देऊन तिला योजनेचे मानधन दिले जाणार आहे.
  6. या योजनेअंतर्गत एक मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन किंवा पित्याचे नसबंदीचे ऑपरेशन अथवा दोन मुली झाल्यानंतर महिलेचे कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन झाल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  7. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुलगी 18 वर्षाची असेपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.
  8. या योजनेअंतर्गत 2017 नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  9. या योजनेअंतर्गत मुलीला अठरा वर्षाची झाल्यानंतर एक लाख इतकी विम्याची रक्कम मिळणार आहे त्यातील दहा हजार रुपये मुलीने स्वतःच्या कौशल्यावर भर देण्यासाठी खर्च केलेले असावे असा दाखला सादर करणे गरजेचे आहे जेणेकरून मुलगी स्वतःच्या पायावर स्वावलंबी होईल.
  10. या योजनेचा लाभ घेत असताना मुलीचा नैसर्गिक रित्या मृत्यू झाला तर तिचे जे आई-वडील आहेत त्यांना या योजनेची रक्कम स्कीम संपल्यानंतर दिली जाईल.
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024) :-

  • माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज कुठे उपलब्ध आहे-
    • बाल विकास प्रकल्प अधिकारी
    • उपमुख्य कार्यकारी अधिकारी
    • जिल्हा परिषद
    • जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
    • विभागीय उपायुक्त
  • वरील सर्व ठिकाणी मोफत दरात माझी कन्या भाग्यश्री योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत.
  • किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील आपण या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकतो.
  • मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या पालकांनी आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत राहत असल्यास नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या जन्माची नोंदणी करावी व अंगणवाडी सेविकांकडे कडे अर्ज वरील सर्व कागदपत्रे द्यावीत.
  • अर्ज भरल्यानंतर काही कागदपत्रे अपूर्ण असल्यास दोन महिन्यापर्यंतचा काळ कागदपत्रे पूर्ततेसाठी की देण्यात येतो.
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024
Mazi Kanya Bhaghyashri Yojna 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

FAQ-

१.माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ या योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर –  https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/schemes/manjhi-kanya-bhagyashree-scheme.php  या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रथम SIGN UP करून घ्या व पुढची प्रोसेस पूर्ण करा किंवा ऑफलाईन प्रकारे पण आपण या योजनेचा अर्ज करू शकता.

२. माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/schemes/manjhi-kanya-bhagyashree-scheme.php

३. माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे ?

उत्तर- ही योजना कोणा एका राज्यामध्ये नसून संपूर्ण देशामध्ये लागू आहे.

४. माझी कन्या भाग्यश्री योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- देशातील शहरी भाग आणि ग्रामीण भागातील कुटुंबे.


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.