Maharastra Farmer Scheme 2024:ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४
आपल्या कृषी प्रधानदेशाला प्रगतीपथावर पोहोचविण्यासाठी आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळवून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. अशाच शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि त्यांचे कष्ट कमी करणारी एक योजना आपले राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी घेऊन आले आहे.पूर्वीच्या काळी नांगरटाने शेती केली जायची त्यामुळे मनुष्य बळ जास्त प्रमाणात लागायचे परंतु आताच्या यंत्राच्या मदतीने शेती केली जाते.ट्रॅक्टर सारखे यंत्र शेतकऱ्यांसाठी मोलाचे यंत्र ठरले आहे जेणेकरून काही मिनिटात शेती नांगरट होऊन जाते तसेच बाकीचे अनेक कामे देखील आरामात होतात,परंतु ट्रॅक्टर खरेदी करणे हे सर्व शेतकऱ्यांना परवडणारे नाही त्यासाठी आपली राज्य सरकार घेऊन आहे ट्रॅक्टर अनुदान योजना.
या योजनेअंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याकडे आपले हक्काचे ट्रॅक्टर असतील जेणेकरून शेतकरी प्रगतीपथावर पोहोचतील
आपल्या सरकारने मिनी ट्रॅक्टर म्हणजे छोट्या ट्रॅक्टर साठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharastra Farmer Scheme 2024:ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ किती आहे अनुदान?
या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 90% अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्याकडे उपलब्ध असावी.सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्याकडून ही योजना चालवली जाते.
Maharastra Farmer Scheme 2024:ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ कुणासाठी आहे ही योजना?
आपल्या राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नव बौद्ध लोकांसाठी योजना राबवली जाणार आहे.
परंतु यांच्यासाठी देखील अट अशी आहे की या प्रवर्गातील लोक स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा असावे.फक्त स्वयंसहायता बचत गटातील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेअंतर्गत बचत गटाचे अध्यक्ष ,सचिव यांना 90% व अनुदान मिळणार आहे.ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 3 लाख 50 हजार एवढी रक्कम लागते. त्यातील दहा टक्के रक्कम बचत गटाला भरावी लागणार आहे उर्वरित रक्कम अनुदानाद्वारे मिळणार आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Tractor Anudan Yojana Maharastra 2024) :-
आपल्या ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यांना ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येईल व या योजनेचा लाभ घेता येईल.
- ऑनलाईन
आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज कसा भरू शकतो.
- अर्जदाराला खाली लिंक वर क्लिक करायचे आहे.
- आपल्यासमोर आता एक नवीन पेज ओपन झालेली असेल तेथे आपल्याला नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे व आपल्याला रजिस्टर करायच आहे या प्रक्रियेद्वारे आपल्याला आपले युजरनेम व पासवर्ड मिळेल.
- आता आपल्याला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन कृषी विभाग या विभागात जायचे आहे.
- आता आपल्याला ट्रॅक्टर अनुदान योजने यावर क्लिक करायचे आहे.
- आता इथे आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे जसे की नाव, पत्ता, ई-मेल आयडी अन खात्याचा नंबर आता आपल्याला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
अशाप्रकारे आपण आपला ऑनलाइन फॉर्म भरू शकतो व या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- ऑफलाईन
आता बघूया ऑफलाइन फॉर्म कसा भरता येईल.
- या योजनेचा ऑफलाईन फायदा घेण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जायचे आहे.
- कृषी विभागातून आपल्याला ट्रॅक्टर अनुदान साठी मिळणारा अर्ज घ्यायचा आहे.
- आता आपल्याला या अर्जाची प्रत व वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- व्यवस्थित भरलेला अर्ज व कागदपत्रे आपल्याला कृषी विभागात जमा करायची आहेत.
- आता आपल्याला इथून संबंधित अधिकाऱ्याकडून एक पोहोच पावती घ्यायची आहे ज्याचा वापर आपल्याला भविष्यात होणार आहे.
अशाप्रकारे आपण आपला ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑफलाइन अर्ज करू शकतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Maharastra Farmer Scheme 2024:ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ योजनेचा ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज करता येईल.
२. ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.
३. ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-आपल्या राज्यासाठी हि योजना लागू झाली आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.