Maharashtra Government Education Loan Scheme 2024 |(शैक्षणिक कर्ज योजना २०२४ )
आपल्या आसपास अनेकदा असे बघतो की आपल्या आसपासच्या अनेक कुटुंबातील मुले खूप हुशार असतात परंतु पैशा अभावी मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करताता येत नाही. अर्धवट शिक्षण पूर्ण न झालेले मूले पुढे बेरोजगार म्हणून ओळखले जातात. या हुशार मुलांची हुशारी कितीतरी वेळा कुठेतरी कुणाच्यातरी दुकानात काम करण्यामध्ये वाया जाते. अशा हुशार मुलांसाठी आपली केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून नेहमी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. त्यातच एक महत्त्वाची योजना म्हणजे शैक्षणिक कर्ज योजना.
या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी हुशार मुलांना अत्यंत कमी व्याजदरा मध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे या मुलांची शिक्षण पूर्ण होतात व एक आदर्श नागरिक आपल्या समाजाला मिळतो. या योजनेअंतर्गत परदेशात देखील मुलांना शिकायची नामी संधी चालून आली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या देशात शिक्षण घ्यायचे असेल तर दहा लाखापर्यंतचे कर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते व परदेशात शिकायचे असेल तर वीस लाखापर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत दिले जाते. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी लागू झाली आहे अनुसूचित जातीतील विविध समाजातील मुलांन या योजनेचा लाभ होणार आहे.
या योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या कर्जावर ४ % इतके कमी व्याजदर आपले शासन आकारत आहे.आपल्या राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून ही योजना राबवली जाते.योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला 2023-24 यावर्षी विज्ञान विभागाट कमीत कमी 60% गुण किवा त्यापेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे.जर अर्जदार अपंग असेल तर कमीत कमी ५५% गुण किवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे गरजेचे आहे.योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठलाही शिल्क आकारला जाणार नाही.
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Maharashtra Government Education Loan Scheme 2024 }
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Maharashtra Government Education Loan Scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Maharashtra Government Education Loan Scheme 2024 |(शैक्षणिक कर्ज योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील अनुसूचित जातीतील विद्यार्थी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | ४ % व्याजदरात १० लाख ते २० लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Maharashtra Government Education Loan Scheme 2024 |(शैक्षणिक कर्ज योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑफलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 022-22025251 022-22028660 |
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Maharashtra Government Education Loan Scheme 2024 ):-
- अनुसूचित जाती मधील विद्यार्थी वर्गाला आपल्या शिक्षणा पासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये या साठी या योजनेची सुरुवात केली गेली.
- या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना २० लाखा पर्यंत परदेशात जायला देखील कर्ज मिळणार आहे .त्यामुळे विद्यार्थी आपले शिक्षण व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकतात व आपल्या देशासाठी एक आदर्श व्यक्ती म्हणून उभे राहू शकतात.
- उच्च शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व आपल्या कुटुंबाला देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करतील.
- या योजनेद्वारे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे भविष्य प्रकाशित होणार आहे व याचा उपयोग आपल्या देशाला देणार आहे.
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Maharashtra Government Education Loan Scheme 2024) :-
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Maharashtra Government Education Loan Scheme 2024 ) :-
- योजना आपले महाराष्ट्र गव्हर्मेंट राबवत असल्या कारणामुळे फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा अनुसूचित जातीतील चर्मकार या जातीचा असावा या योजनेअंतर्गत यांना कर्ज दिले जाणार असून जातीचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
- ही योजना उच्च शिक्षणासाठी दिली गेली असल्या कारणामुळे अर्जदाराचे वय 18 ते वय वर्ष 50 या दरम्यान असावे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थी जरी या योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 98,000/- असावे.
- शहरी भागातील अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न १,२००००/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार विद्यार्थ्याकडे जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Maharashtra Government Education Loan Scheme 2024) :-
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेचा अर्ज आपण ऑफलाईन प्रकारे भरू शकतो.
शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल तर अर्जदार विद्यार्थ्याला आपण ज्या ठिकाणी राहत होते तेथील जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
- जिल्हा कार्यालयातील समाज कल्याण विषयी शैक्षणिक विभागाला भेट द्यावी लागेल.
- इथून आपल्याला या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- विचारलेली सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित रित्या भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडायचे आहेत.
- आता हा अर्ज जिल्हा कार्यालयात जमा करायचा आहे.
- अशाप्रकारे अत्यंत सोप्या आणि सूटसुटीत पद्धतीने या योजनेचा अर्ज भरू शकतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. शैक्षणिक कर्ज योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेचा अर्ज आपण ऑफलाईन प्रकारे भरू शकतो.
२. शैक्षणिक कर्ज योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/education-training
३. शैक्षणिक कर्ज योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना राज्य सरकारच्या असला कारणामुळे महाराष्ट्र राज्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
४. शैक्षणिक कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-या योजनेअंतर्गत अनुसूचीतील जातीतील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5. या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेअंतर्गत जर आपल्या भारत देशाट शिकायचे असेल तर दहा लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार व परदेशाची शिकायचे असेल तर २० लाखापर्यंत चे कर्ज या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चार टक्के व्याजदर मिळणार आहे.
6. या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या समाजाला आपल्या देशाच्या मुख्य प्रवाहांशी जोडण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली आहे यामुळे योजनेमुळे कोणताही हुशार विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून वंचितणार नाही.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.