Free Sewing Machine Scheme Maharashtra|फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 :

Free Sewing Machine Scheme

आपले केंद्र सरकार आपल्या देशामध्ये नेहमीच नवीन नवीन योजना राबवत असते ज्याद्वारे आपल्या देशातील आर्थिक व मागास घटक पुढे जाऊन आपल्या देशाच्या प्रगतीला एक नवीन दिशा मिळेल अशीच एक नवीन योजना आपले केंद्र सरकार आपल्या देशात राबवत आहे फ्री शिलाई मशीन योजना.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आपल्याला फ्री शिलाई मशीन मिळणार आहे. तरी या योजनेअंतर्गत आपल्याला शिलाई मशीन साठी 15000 रुपये दिलेले जाणार आहे .तसेच आपल्याला याच योजनेअंतर्गत एक लाख पर्यंत लोन देखील मिळणार आहे.ज्यावर वार्षिक पाच टक्के इतका इंटरेस्ट घेतला जाणार आहे. या योजनेसाठी पाच ते पंधरा दिवसा इतक्या कालावधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्या प्रशिक्षण काळाचे पैसे देखील तुम्हाला तुमच्या अकाउंट वर मिळणार आहेत , प्रशिक्षण झाल्यानंतर पीएम विश्वकर्मा अंतर्गत तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाणार आहे.

सर्टिफिकेट चा उपयोग करून आपण फ्री शिलाई मशीन साठी अर्ज करू शकतो आपण ग्रामीण भागातील असाल किंवा शहरी भागातील असाल तरी देखील या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. यासाठी आपल्याला आपले कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी इतके पाहिजे या योजनेचा फायदा घेणाऱ्या लाभार्थीचे वय 20 ते 40 इतके हवे.

फ्री शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकार राबवत आहे ज्याचे याची सुरुवात आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केली.या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील 50 हजाराहून अधिक महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी फ्री शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे.या शिलाई फ्री शिलाई मशीन चा वापर करून महिलांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. मशीन चा वापर करून महिला कपडे शिवून आपले कुटुंब चालवण्यास आर्थिक दृश्य सक्षम होणार आहेत कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने देखील ही योजना सुरू केली आहे.

शिलाई मशीनीन योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभ मिळालेली राज्य- राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आपले महाराष्ट्र.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे फायदा घेऊ शकतो.

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 ठळक मुद्दे(Free Sewing Machine Scheme important point)-

योजनेचे नावपीएम विश्वकर्मा अंतर्गत फ्री शिलाई मशी
फ्री शिलाई मशीन योजना कोणी चालू केलीकेंद्र सरकार
फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतेआपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील सर्व महिला
योजनेअंतर्गत लाभार्थींना काय मिळणारशिलाई मशीन घेण्यासाठी 15000 नगद आणि प्रशिक्षण
योजना कधी सुरु झाली१७ सप्टेंबर २०२३
योजनेची सुरुवात कोणी केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
योजनेची अर्ज कुठे करायचाफ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : Free Sewing Machine Scheme Maharashtra
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन /ऑफलाइन

फ्री शिलाई मशीन (Free Sewing Machine Scheme)साठी अर्ज करायचा असेल तर खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • महिला विधवा असल्यास तिच्या पतीचे मृत्यू सर्टिफिकेट (death certificate )
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • शिधापत्रिका (Ration Card)
  • पासपोर्ट आकाराचे फोटो २ ( 2 Passport Size Photo)
  • उत्पन्नाचा पुरावा (Income Certificate)
  • मोबाइल नंबर (Mobile Number)
  • बँक खाते पुस्तक (Bank Passbook)
  • अपंग असल्यास तिचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र (handicapped certificate)
  • ईमेल (email)

वरील सर्व कागदपत्रे असतील तर आपण फ्री शिलाई मशीन (Free Sewing Machine Scheme) योजनेचा लाभ घेऊ शकता.

मोफत शिलाई मशीन योजना काय आहे आणि त्याचे उद्देश (Purpose to Start Free Silai Machine Yojana) :-

मित्रांनो जर तुम्हाला फ्री शिलाई मशीन योजनेच्या बाबतीत जाणून घ्यायचे असेल तर ही योजना केंद्र सरकार द्वारा राबवली जात आहे, ही एक योजना नसून एक अभियान आहे आणि या योजनेला पीएम विश्वकर्मा योजना या नावाने सुद्धा ओळखले जाऊ लागले आहे .

ही योजना जास्त करून महिलांमध्ये जास्त लोकप्रिय होत चालली आहे कारण इथे म्हणजे या योजनेमध्ये महिलांना फ्री शिलाई मशीन व त्यासोबतच रुपये 15,000 /- पण देण्यात येत आहेत.

या योजनेच्या अंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारचे जास्तीत जास्त प्रयत्न या योजनेमार्फत होत आहेत या योजनेचा फायदा जास्तीत जास्त महिलांना होत आहे, व यातून आर्थिक सक्षमतेकडे त्यांचे पाऊल पडत आहे.

मोफत शिलाई मशीन त्याची ट्रेनिंग व सर्टिफिकेट (Free Silai Machine Traning & Certificate) :-

तुम्ही मोफत शिलाई मशीन योजना म्हणजेच पीएम विश्वकर्मा अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये अर्ज करून रुपये 15000 व त्यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन कशी चालवावी याचं ट्रेनिंग ही मोफत दिली जाईल.

ती ट्रेनिंग तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट पण दिले जाईल, ही योजना पूर्णतः महिलांना केंद्रित आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला घरबसल्या पैसे कमवू शकतात व आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात.

मोफत शिलाई मशीन योजनेची अर्ज प्रक्रिया (Free Silai Machine Yojana Registration) :-

  • जर तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू इच्छिता आणि आपणाला रजिस्टर करून मोफत प्रशिक्षण घेऊन त्याचे सर्टिफिकेट व त्यासोबत रुपये 15000 घेण्यास इच्छुक असाल तर इथे तुम्हाला आम्ही सर्व माहिती देत आहोत या योजनेमध्ये आपण स्वतःला कसे रजिस्टर करू शकता.
  • मोफत शिलाई मशीन योजने साठी अर्ज करताना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्यात.
  • अधिकृत अशा विश्वकर्मा पोर्टलवर जा.
  • अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अप्लाय या ऑप्शन वर जाऊन क्लिक करा.
  • अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा, जसे की आधार नंबर, मोबाईल नंबर, रेशन कार्ड, बँक डिटेल्स इत्यादी
  • ऑनलाइन सर्व माहिती भरून आणि ती पुन्हा एकदा चेक करून फॉर्म सबमिट करा.
  • आता तुम्हाला शेवटी फॉर्म सबमिट केल्यानंतर आलेल्या अर्जाची छायांकित प्रत सोबत ठेवायची आहे, जी तुम्हाला जवळच्या सीएसी केंद्रावर जाऊन जमा करायची आहे.
  • तुमच्या अर्जाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पोर्टल वर जाऊन पुन्हा लॉगिन करू शकता आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
  • या योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि तो भरून तिथेच जमा करावा लागेल.

FAQ’S :-

१.फ्री शिलाई मशीन योजना कुणासाठी आहे?

उत्तर-फ्री शिलाई मशीन योजना फक्त महिलांसाठी आहे.त्यात महिला विधवा अथवा अपंग असेल तर तिला जास्त प्राधान्य दिले जाणार आहे.तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना देखील या योजने अंतर्गत लाभ होणार आहे.

२.फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर-फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आपण ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

जर तुम्ही खेडे गावात राहत असाल तर तुमच्या जवळील पंचायत समिती किवा जिल्हा कार्यालयात महिला व बाल विकास विभागात जाऊन अर्ज करू शकता.

जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभागात वरती नमूद केलेली कागदपत्रे जोडून आपला अर्ज जमा करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

३.फ्री शिलाई मशीन योजनेसाठी कोण अपात्र आहे?

उत्तर- 1. सरकारी नोकरी करणाऱ्या महिला

2. पुरुष

३. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त आहे.

४. फ्री शिलाई योजने अंतर्गत शिलाई मशीन कसे मिळेल?

उत्तर-तुम्ही मोफत शिलाई मशीन योजना म्हणजेच पीएम विश्वकर्मा अंतर्गत मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये अर्ज करून रुपये 15000 व त्यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन कशी चालवावी याचं ट्रेनिंग ही मोफत दिली जाईल.

निष्कर्ष-

फ्री शिलाई मशीन या योजनेअंतर्गत आपल्या आपल्या देशातील गरीब महिलांना केंद्र सरकार शिलाई मशीन देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या आपल्या गरजा भागवण्यासाठी सक्षम झाली आहे या योजनेअंतर्गत गरीब महिला शिलाई मशीनचे काम करून आपले रोजचे खर्च भागू शकते. फ्री शिलाई मशीन साठी 15000 रुपये केंद्र सरकारकडून दिले जातील तसेच आपल्यात जे कौशल्य आहे .त्या कौशल्याला वाव म्हणून एक प्रशिक्षण देखील आपल्याला त्यासाठी दिले जाईल जेणेकरून महिलांमध्ये सुधारणा व्हावी व त्यांच्या शिलाईच्या कामाला योग्य वाव मिळावा.
या योजनेअंतर्गत एक लाखापर्यंत कर्जया योजनेअंतर्गत एक लाखापर्यंत कर्ज देखील दिले जाणार आहे ज्याचा व्याजदर 5% एवढा असेल म्हणजे वर्षाला तुम्हाला एक लाखाला पाच हजार रुपये इतकी् व्याज पडेल.

आम्ही आपल्याला या लेखाद्वारे फ्री शिलाई मशीन कशी मिळेल त्यासाठी कोण पात्र आहे या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे तरी आपल्याला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो धन्यवाद !

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.