PM Yashaswi Scholarship 2024 (पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४) संपूर्ण माहिती :-
पीएम यशस्वी योजना म्हणजेच “पीएमएम अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड“.पीएम यशस्वी योजना ही प्रामुख्याने इयत्ता नववी व इयत्ता अकरावी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवली जात आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सी(National Testing Agency) द्वारे पीएम यशस्वी योजना घेण्यात येणार आहे.YESHAVI म्हणजे Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India.
पीएम यशस्वी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे.आपल्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि समीक्षीकरण मंत्रालयाद्वारे पीएम यशस्वी योजना चालविली जाते. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग, अधिसूचित भटक्या व अर्ध भटक्या जमाती त शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. मदतीचे स्वरूप 75 हजार रुपये ते 1 लाख 25 हजार रुपयेे इतकी आहे. इयत्ता नववी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये व अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार इतके आर्थिक सहाय्य यशस्वी योजनेअंतर्गत केले जाते. सरकारच्या निर्णयानुसार 15000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पी एम यशस्वी योजनेअंतर्गत आपल्या देशातील जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु यांची परिस्थिती दुर्बल आहे व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडे पैसे नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून ही योजना आकारली जात आहे. या योजनेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे एक परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन असणार आहे.इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषेमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे आपल्या देशातील 78 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्याचे मानस आपल्या सरकारचा आहे.
पी एम यशस्वी योजना ही मुलींसाठी नसून आपल्या देशातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित मुलगा किंवा मुलगी असा भेद नाही.अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.पीएम यशस्वी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन वर्ष योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2023 च्या आकडेवारीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी ओबीसी (OBC) डीएनटी साठी 963 जागा व ई डब्ल्यू एस साठी 107 आशा 1070 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या.
अशाप्रकारे प्रत्येक राज्यासाठी पीएम योजनेअंतर्गत जागा राखीव ठेवण्यात आले आहेत.या योजनेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्या परीक्षेचे स्वरूप एक सामान्य ज्ञान आणि एक शैक्षणिक ज्ञान याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एक पारदर्शी एजन्सी आहे ज्याच्याद्वारे या या परीक्षेमध्ये पस्तीस टक्के पासिंग ठेवण्यात आलेली आहे परंतु शिष्यवृत्ती च्या आधारे मेरिटनुसार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४ ठळक मुद्दे(PM Yashaswi Scholarship 2024 important point)-
योजनेचे नाव | पीएम यशस्वी योजना/पीएमएम अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड |
योजना कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
योजनेचा फायदा कोण घेऊ शकते | इयत्ता 9 वी व इयत्ता ११ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी |
योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थीचे आर्थिक उत्पन्न किती असावे | अडीच लाख किंवा त्या पेक्षा कमी |
परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे | ऑनलाईन |
योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी ला काय लाभ मिळणार आहे | ७५०००/- ते १२५०००/- |
परीक्षा कोण घेणार आहे | नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) |
योजनेचा अर्ज कुठे करावा | PM Yashaswi Scholarship 2024 |पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४ |
योजनेचा लाभ किती वर्ष घेता येईल | २ वर्ष |
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४ (PM Yashaswi Scholarship 2024)साठी अर्ज करायचा असेल तर खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (aadhar card)
- आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र(8th pass certificate)
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र(10th pass certificate)
- ई – मेल आयडी(email-id)
- फोन नंबर(phone no)
- उत्पन्न प्रमाणपत्र(income certificate)
- कास्ट सर्टिफिकेट (cast certificate).
वरील सर्व कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करायला आवश्यक आहे.

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४ पात्रता (PM Yashaswi Scholarship 2024 Eligibility)
१.पीएम यशस्वी योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी या भारतीय नागरिक असावा.
२. अर्ज करणारा विद्यार्थी ओबीसी(OBC),ईबीसी(EBC) डीएनटी(DNT) या जातीतील असावा.
3.विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे ती शाळा खालील वेबसाईटवर उपलब्ध असावी.
४.अर्ज करणारा गरजू विद्यार्थी हा आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असावा.
५.अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेच्या परीक्षेचे स्वरूप(PM Yashaswi Scholarship 2024 pattern)-
- परीक्षेसाठी टोटल 100 मार्कचा पेपर होणार आहे.
- कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग येत नसेल.
- प्रत्येक प्रश्न एक मार्काला असेल.
- या परीक्षेसाठी तुम्हाला अडीच घंटे म्हणजे 150 मिनिट इतका वेळ असेल.
- परीक्षेसाठी गणित विज्ञान सामाजिक विज्ञान आणि सामान्य ज्ञान हे विषय असणार आहेत.
- परीक्षाही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल चार पैकी आपल्याला बरोबर पर्यायावर टिक करायचे आहे.
वरील स्वरुपात परीक्षा होणार आहे आता जाणून घेऊया कोणता विषय किती मार्क्स साठी विचारला जाणार आहे.
विषय | प्रश्नाची संख्या | उत्तराचे गुण | |
१ | गणित | ३० | ३० |
२ | विज्ञान | २५ | २५ |
३ | समाजशास्र | २५ | २५ |
४ | सामान्य ज्ञान | २० | २० |
एकूण | १०० | १०० |
अशा प्रकारे परीक्षा २ विभागात होणार आहे.
१.सामान्य ज्ञान
सामान्य ज्ञान या विषयांमध्ये विज्ञान इतिहास भूगोल चालू घडामोडी या विषयांवर विविध प्रश्न विचारले जातील.
२. शैक्षणिक ज्ञान
पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४ (PM Yashaswi Scholarship 2024) उद्दिष्ट–
- पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यास हा मूळ उद्देश पीएम यशस्वी योजनेचा आहे.
- आपल्या भारत देशामध्ये व खूप सार्या विद्यार्थ्यांना खूप सार्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते व मध्ये शिक्षण सोडावे लागते आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये म्हणून पीएम यशस्वी योजना सुरू झाली.
निष्कर्ष–
पीएम यशस्वी योजना ही आपल्या देशातील विद्यार्थ्यांसाठी आलेली एक चांगली योजना आ.हे याद्वारे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये आपले शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी देण्यात येणार आहे. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार इतकी रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे आपल्या देशातील मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
योजना गरजवंत विद्यार्थ्यांसाठी राबवली गेलेली एक योजना आहे आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कोणत्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही योजनेअंतर्गत नववीच्या विद्यार्थ्यांना 75000 व अकरावीच्या विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार अशी रक्कम देण्यात येणार आहे या रकमेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनासाठी करू शकतात जसे की लॅपटॉप घेणे पाठ्यपुस्तके घेणे अशा स्वरूपात आपले केंद्र सरकार आपल्या देशातील गरजवंत व गरीब विद्यार्थ्यांना मदत करत आहे.
पीएम यशस्वी योजनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया :-
- योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटला जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
- आपल्या मेसेज विशेष शिष्यवृत्ती योजने चा लाभ घेण्यासाठी प्रथम एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरून प्रथम नोंदणी करून घ्या नंतर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तयार करा व त्या युजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून पोर्टलवर जाऊन लॉगिन करा.
- पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर प्रवेश परीक्षा साठी नोंदणी करा.
- खाली दिलेल्या अर्जात आवश्यक ती माहिती पूर्णपणे भरा.
- लागणारी कागदपत्रे तिथे सादर करा व अर्ज देखील सादर करावा अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली.
FAQ’S-
1.पीएम यशस्वी योजनासाठी कोण पात्र आहे?
उत्तर- या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशी विद्यार्थी नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांचे जन्मतारीख 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2008 मधील असावी अकरावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक एप्रिल 2004 ते 31 मार्च 2018 असावी मागासवर्ग भटक्या जमाती विमुक्त जमाती चे विद्यार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
२.पीएम यशस्वी योजनासाठी पत्र लाभार्थींना काय लाभ मिळणार?
उत्तर- पीएम यशस्वी योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना लाभ घ्यायचा असेल नववीच्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये वाकरावीचे विद्यार्थ्याला एक लाख 25 हजार असे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
३. यशस्वी योजनेचा फुल फॉर्म काय ? (What is the full form of Yashasvi ?)
उत्तर- पीएम यशस्वी योजना म्हणजेच “पीएमएम अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड“. ( PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)
४. पीएम यशस्वी योजना ही केंद्र सरकारच्या कोणत्या विभागाने सुरू केली आहे ?
उत्तर – पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. आपल्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि समीक्षीकरण मंत्रालयाद्वारे हि योजना चालविली जाते.
५. पी एम यशस्वी शिष्यवृत्तीशी योजनेसाठीचा टोल फ्री नंबर कोणता ?
उत्तर – टोल फ्री नंबर खाली दिले आहेत –
NTA Help Desk: 011-69227700, 011-40759000
NTA Email address: yet@nta.ac.in
वाचा-
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.