dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर हे मुख्यतः मागणी व पुरवठा, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या किंमतींवरती अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या किंमती घसरल्यास, देशाच्या बाजारातही दुधाचे दर कमी होतात, त्याचा परिणाम आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या दूध भुकटी आणि बटरच्या विक्रीवरदेखील होतो. याशिवाय, दुधाच्या अति पुरवठ्याच्या (सुपर फ्लश) काळातही दुधाचे दर घसरतात. तरीही, अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करते आणि दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते.
dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना :- दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यामुळे दुधाच्या दरांमध्ये घट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध अनुदान योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून, २८ जून २०२४ रोजी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात माननीय उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी १ जुलै २०२४ पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.
यानंतर, १ जुलै २०२४ रोजी माननीय मंत्री (दुग्धव्यवसाय) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधींशी बैठक घेण्यात आली. त्यानुसार, २ जुलै २०२४ रोजी सभागृहात मंत्री (दुग्धव्यवसाय) यांनी निवेदन करत आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरचे दर घटल्यामुळे शिल्लक असलेल्या दूध पावडर साठ्याच्या निर्यातीस प्रोत्साहन म्हणून प्रति किलो ३० रुपये अनुदान जाहीर केले.
या घोषणेनंतर, ५ जुलै २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय लागू करण्यात आला. त्याचबरोबर, १२ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत दूध भुकटी रूपांतरणासाठी प्रती लिटर १.५० रुपये अनुदान देण्यासही शासनाने मान्यता दिली.
सद्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या किंमती घसरल्या आहेत. तरीही, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांनी प्रति लिटर किमान २८ रुपये खरेदी दर निश्चित केला आहे. तसेच, यापूर्वी दिल्या जाणाऱ्या ५ रुपये प्रति लिटर दूध अनुदानात २ रुपयांची वाढ करून आता ७ रुपये प्रति लिटर अनुदान १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्याचा शासन विचाराधीन आहे.
dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना:योजने विषयी माहिती:-
अ) दूध योजना –
१) राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांद्वारे संकलित केलेल्या गाय दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान दिले जात होते, ज्यात १ ऑक्टोबर २०२४ पासून २ रुपयांची वाढ करून आता ७ रुपये प्रति लिटर अनुदान दिले जाते आहे.
२) सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांनी ३.५ फॅट/८.५ एसएनएफ गुणमानाच्या दुधासाठी १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रति लिटर २८ रुपये दर निश्चित करणे बंधनकारक आहे, जो ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. त्यानंतर, शेतकऱ्यांना शासनामार्फत ७ रुपये प्रति लिटर थेट बँक खात्यात जमा केले जातील (डीबीटी).
३) ३.५/८.५ या प्रमाणात फॅट आणि एसएनएफपेक्षा कमी गुणमान असलेल्या दुधासाठी प्रति पॉईंट ३० पैशांची घट केली जाईल, तसेच जास्त गुणवत्तेसाठी प्रति पॉईंट ३० पैसे वाढ देखील देण्यात येईल.
४) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअरच्या मदतीने अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
५) दूध अनुदान योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून अंमलात आणली जाणार आहे. तथापि, या योजनेचा आढावा घेऊन ती पुढील कालावधीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात येईल.
६) १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, दूध भुकटी निर्यातीसाठी ३० रुपये प्रति किलो प्रोत्साहन अनुदान आणि दूध भुकटी रूपांतरणासाठी १.५० रुपये प्रति लिटर अनुदान ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच लागू राहील. त्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल.
७) जुलै २०२४ मध्ये सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांद्वारे सुमारे १६० लाख लिटर प्रत्येक दिवसाला दूध संकलित झाले आहे. योजनेत प्रति लिटर ७ रुपये अनुदानानुसार सुमारे ८७९.२० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दुधाच्या संकलनातील घट किंवा वाढीच्या आधारावर या रकमेचा फेरविचार होऊ शकतो.
८) कोणताही पात्र दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादकांचा डेटा संगणक प्रणाली मध्ये भरल्यास त्यांना प्रति लिटर ०.०५ पैसे प्रोत्साहन देण्यात येईल, यासाठी सुमारे ६.८४ कोटी रुपयांचा खर्च मान्य करण्यात आलाय.
९) योजनेशी संबंधित वित्तीय भार सोडून इतर बाबींमध्ये बदल करण्याचे अधिकार प्रशासनिक विभागाला देण्यात आलेले आहेत.
ब) दूध भुकटी रूपांतर योजना –
शासन निर्णयानुसार १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत दूध भुकटी रूपांतरणासाठी प्रति लिटर १.५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान प्रतिदिन ६० लाख लिटर मर्यादेऐवजी आता प्रतिदिन ९० लाख लिटर दुधाच्या रूपांतरणासाठी लागू करण्यात येत आहे. या वाढीच्या अनुषंगाने, ७९.२० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात येत आहे.
दूध भुकटी रूपांतरण योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती आहे त्याच राहतील.
dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना-दूध अनुदान योजना अंमलात आणताना लागू असणाऱ्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे –
१. राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.
२. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी तसेच पशुधनाच्या आधार कार्डाशी (Ear Tag) संलग्न असणे आवश्यक आहे. या माहितीची पडताळणी संबंधित जिल्ह्याचे दुग्धविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत केली जाईल.
dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना-सर्वसाधारण अटी व शर्ती:
१. योजनेत सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध खरेदीचे अकाउंट दररोज अद्ययावत ठेवून, संबंधित जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांना सादर करणे अनिवार्य आहे. याची प्रत आयुक्त, दुग्धविकास यांनाही देण्यात येईल.
२. आयुक्त, दुग्धविकास यांनी आवश्यक पडताळणी करून योजनेच्या अनुदानाची अंतिम रक्कम सुनिश्चित करण्यात येईल.
३. योजनेची नियमित तपासणी आयुक्त, दुग्धविकास विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल.
४. अनियमितता आढळल्यास संबंधित सहकारी संघ तसेच खाजगी प्रकल्पांवर कायदेशीर कारवाई होईल आणि अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल. तसेच संबंधित संघ/प्रकल्प अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात येतील.
५. या योजनेचा लाभ परराज्यातून संकलित केलेल्या दुधासाठी लागू असणार नाही.
६. दूध अनुदान योजना फक्त महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीच लागू राहणार आहे.
७. शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी (EAR TAG) महाराष्ट्र राज्यातील INAPH / भारत पशुधन पोर्टलवर असणे गरजेचे असणार आहे.
८. शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खाते आणि पशुधनाची नोंदणी (INAPH) / भारत पशुधन पोर्टलवर करणे शेतकऱ्यांना बंधनकारक असेल.
९. या सर्व अटींची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त, दुग्धविकास विभाग यांची राहील.
dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना-शासन निर्णय – (Dudh anudan Yojna GR)
राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये 7 अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय पाहण्यासाठी येथे लिंक वर क्लिक करा.
dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली dudh anudan yojana maharastra 2024-दूध अनुदान योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}