Asmita Yojna 2024 | अस्मिता योजना २०२४ – स्वच्छतेकडून आरोग्याकडे.

Table of Contents

Asmita Yojna 2024

या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनपासून इच्छा.

  • आज आपला भारत देश जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करत आहोत पण तरीही आजही ग्रामीण भागामध्ये महिलांच्या आरोग्य विषयी आपण निष्काळजी आहोत कारण ग्रामीण भागात फक्त 17%च महिला या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन चा वापर करत आहेत बाकी महिलांना सॅनिटरी नॅपकिन च्या वापरा अभावी वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत त्यांना त्यामुळे होणाऱ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.
  • आजही आपल्या समाजात मासिक पाळी विषयी वेगवेगळे अनेक गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी शासन वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत तरी देखील आपण कुठेतरी कमी पडत आहोत त्यामुळे सरकारने ग्रामविकास विभागामार्फत आठ मार्च म्हणजेच महिला दिनी अस्मिता योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून मुली, शाळकरी मुली आणि महिलांना स्वस्तामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतील आणि त्यांचे जीवन सुलभ आणि आरोग्यदायी राहील.

अस्मिता योजना २०२४ चे उद्घाटन

या योजनेच्या अंमलबजावणी करिता मोबाईल ॲप तयार केला गेला असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

आपले मुख्यमंत्री ठरले पहिले अस्मिता प्रायोजक कारण अस्मिता फंडाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते केला गेला.

अस्मिता योजनेची अंमलबजावणी | ( Implementation of Asmita Yojna )

  • या योजनेमध्ये शाळकरी मुलींना फक्त पाच रुपयांमध्ये आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना ग्रामीण विकास विभागाच्या मार्फत उमेद अभियाना अंतर्गत राबवली जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून झेडपीच्या शाळांमधील 11 ते 19 या वयामधील किशोरवयीन मुलींना 240 मिमीच्या 8 पॅडचे एक पॅकेट 5 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये जाऊन नोंदणी करून अस्मिता कार्ड मिळवावे.
  • त्या अस्मिता कार्डाचा उपयोग करून त्यांना बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकिन ची खरेदी करता येईल.
  • या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सात लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्यात येईल या योजनेच्या अनुषंगाने बचत गटांना प्रति पॅकेट 15.20 रुपयांप्रमाणे अनुदान शासन देणार आहे तसेच शासनामार्फत शाळकरी मुलींना वर्षभरात 13 पॅकेट उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सरकारी मुलींसोबतच महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळेल त्यामध्ये महिलांना २४० मीमी च्या आकाराचे ८ पॅकेट २४ रुपयांना तर 280 मिमीच्या आकाराचे ८ पॅडचे एक पॅकेट 29 रुपयांना उपलब्ध होईल.
  • या योजनेच्या अंमलबजावणी करिता मोबाईल ॲप देखील तयार करण्यात आले आहे याचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
  • या ॲपच्या माध्यमातून महिला बचत गट हे सॅनिटरी नॅपकिन ची मागणी ऑनलाईन नोंदवतील आणि नोंदवलेल्या मागणीनुसार वितरक त्यांना ते पुरवठा करतील यानुसार ही साखळी चालेल.
  • या योजनेचा लोगो आणि डिजिटल अस्मिता कार्ड यांचेही अनावरण करण्यात आले तसेच हे ॲप, अस्मिता कार्ड व वेबपोर्टल हे येस बँक, महाऑनलाईन व के पी एम जी यांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे.
  • या योजनेसाठी वापरण्यात आलेले मोबाईल ॲप डिजिटल अस्मिता कार्ड यांच्या माध्यमाने अस्मिता योजनेत पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि याची अंमलबजावणी देखील प्रभावी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे आणि लोकांनी अस्मिता स्पॉन्सर व्हावे असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन लोकांना केले आहे.
  • आपण बघतो आजही ग्रामीण भागातील महिला मुली मासिक पाळी दरम्यान साधा कपडा व त्या प्रकारच्या तत्सम गोष्टी वापरतात त्यांच्या आरोग्यासाठी त्या फार घातक आहेत त्या वापरल्याने त्यांच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊन अनेक प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात त्यामुळे सरकार द्वारे अनेक वेळा अंगणवाडी सेविकांना याचे प्रशिक्षण देण्यात येऊन अंगणवाडी सेविकांद्वारे ग्रामीण भागातील मुली व महिलांपर्यंत सॅनिटरी पॅड कसे वापरायचे याचे प्रशिक्षण देऊन सॅनिटरी पॅड अत्यंत कमी किमतीत त्यांना देण्यात येईल.
Asmita Yojna 2024
Asmita Yojna 2024

अस्मिता योजना २०२४ या योजनेची ठळक मुद्दे :- {Asmita Yojna 2024 Highlight’s}

अस्मिता योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Asmita Yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नाव
{Name Of the Scheme}
अस्मिता योजना २०२४ {Asmita Yojna 2024}
कोणा व्दारा सुरु {Started By Whom}महाराष्ट्र सरकार {Government of maharashtra}
लाभार्थी {Beneficiary}ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनी व तसेच महिला
योजनेचा उद्देश्य
{Purpose of the Scheme}
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींना व तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे.
विभाग
{Which Department}
ग्रामविकास विभागामार्फत.
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}येथे क्लिक करा.
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन {Online}
पात्रतामहाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

अस्मिता योजना २०२४ या योजनेची उद्देश:-

  • योजना महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाणारी योजना आहे यामध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींना व तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे .
  • ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे या योगे महिला स्वच्छतेकडून आरोग्याकडे या उक्तीप्रमाणे या योजनेचा उद्देश आहे.

अस्मिता योजना २०२४ वैशिष्ट्ये:-

  • ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व महिलांमध्ये वैयक्तिक स्वच्छते बद्दल जाणीव निर्माण होण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाचा रोल निभावणार आहे त्यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वाचे असे ग्राम अभियान आहे.
  • अस्मिता योजना २०२४ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे उमेद अभियानांतर्गत अस्मिता योजना सुरू केलेली आहे.
  • त्यायोगे राज्यातील महिलांचा सामाजिक, आर्थिक विकास करणे व त्यांचे जीवनमान सुधरवणे.
  • अस्मिता या मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती स्वयंसहायता समूहांना सॅनिटरी नॅपकीनची आपली मागणी नोंदविण्याकरिता करण्यात आली आहे.
  • अस्मिता योजना २०२४ या योजनेचे ब्रीदवाक्य आहे माझा गौरव माझा हक्क.

अस्मिता योजना २०२४ फायदे| Asmita Yojna Benefits :-

  • या योजनेचा अजून एक फायदा असा की आजही आपण बघतो की किशोरवयीन मुलींकडे सॅनिटरी पॅड नसल्यामुळे कॉलेजमध्ये, शाळेमध्ये जाण्याची त्यांना भीती वाटते तसेच त्यांना असे देखील वाटते की मासिक पाळी येणे ही एक अपमानाची बाब आहे पण आज डॉक्टर सांगतात शासनाचे अधिकारी देखील सांगतात की ही अपमानाची बाब नसून ही नैसर्गिक बाब आहे या योजनेचा हा महत्वपूर्ण फायदा समाजातील महिला व मुलींवरती होणार आहे.
  • झेडपीच्या शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींकरिता अस्मिता योजना ही अनुदान तत्वावर राबवली जाते, त्यासाठी शाळांमधील मुलींना अस्मिता कार्ड वाटण्यात येत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिला बचत गटांना मानधन देण्यात येऊन त्यांच्यामार्फत सॅनिटरी पॅड ची निर्मिती करून अस्मिता एप्लीकेशन द्वारे ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी पॅड पोहोचवण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आले आहे, यातून बचत गटांना आर्थिक बळ देण्याचे काम शासन या योजनेंतर्गत करत आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींची शाळेतील हजेरी कमी व्हावी तसेच त्यांच्यात शिक्षणाविषयी व स्वतःच्या आरोग्य विषयी जागृती निर्माण करण्यासाठी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत व्हावी यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे

अस्मिता योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

https://mahaasmita.mahaonline.gov.in/ या पोर्टल द्वारे ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी लोक अस्मिता स्पॉन्सर म्हणजेच अस्मिता प्रायोजक देखील होऊ शकतील त्यामुळे या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी लोक सहभागातून मोठी मदत मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी अस्मिता फंडाचा शुभारंभ करताना मुलींना बारा महिने जेवढे सॅनिटरी नॅपकिन लागतील त्याची उपलब्धता करून देण्यासाठी ऑनलाईन रक्कम या अस्मिता स्पॉन्सर फंडामध्ये जमा केली आहे त्यामुळे ते पहिले अस्मिता प्रायोजक ठरले आहेत.

Asmita Yojna 2024
Asmita Yojna 2024

अस्मिता कार्ड कसे मिळवाल – अस्मिता योजना अंतर्गत अस्मिता कार्ड.

अस्मिता योजना २०२४ या योजनेच्या माध्यमातून झेडपीच्या शाळांमधील 11 ते 19 या वयामधील किशोरवयीन मुलींना 240 मिमीच्या आठ पॅडचे एक पॅकेट पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये जाऊन नोंदणी करून अस्मिता कार्ड मिळवावे.


FAQ:-


१. योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- Online / Offline दोन्हीही प्रकारे

२.अस्मिता योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते ?

उत्तर- https://mahaasmita.mahaonline.gov.in/

३. अस्मिता योजना २०२४  कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना आपल्या राज्यासाठी लागू झाली आहे.

४. अस्मिता योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील शाळकरी मुली या योजने चा लाभ घेऊ शकतात.

5. अस्मिता योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-योजना महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाणारी योजना आहे यामध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींना व तसेच महिलांना सॅनिटरी नॅपकिन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे .


निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली अस्मिता योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना. {Pm pik vima yojna 2024}


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. {Pm pik vima yojna 2024}