pm vishwakarma id card download
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत विविध कारागिरांना व्यवसाय बळकटीकरणासाठी शासनाकडून विविध प्रकारचे लाभ दिले जातात. सुतार, कुंभार, लोहार, टेलर यांसारख्या १८ प्रकारच्या कारागिरांना यामध्ये विविध सहाय्य योजना उपलब्ध आहेत. त्यामध्ये व्यवसायासाठी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज, आणि टूल कीट खरेदीसाठी १५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य यांचा यात समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती आपण पूर्वीच दिली आहे, त्याची लिंक खाली लेखात देत आहोत.
आता आपण जाणून घेणार आहोत की पीएम विश्वकर्मा ओळखपत्र (PM Vishwakarma Identity Card) कसे डाउनलोड करावे.
विश्वकर्मा समाज हा एक पारंपरिक समाज आहे, जो मुख्यतः भारतातील कुशल कारागीर, शिल्पकार, आणि हस्तकला करणाऱ्या लोकांचा समूह यांसारख्या १८ प्रकारच्या कारागिरांना यामध्ये समावेश आहे. या समाजात वेगवेगळ्या व्यवसायिक गटांचा समावेश आहे, जसे की
- सुतार (Carpenters) – लाकडी कामात कुशल.
- लोहार (Blacksmiths) – लोखंड आणि धातूच्या वस्तू बनवणारे.
- कासार (Bronzesmiths) – पितळ, कांस्य इत्यादींच्या वस्तू तयार करणारे.
- संविधकार (Goldsmiths) – दागिने बनवणारे.
- स्थपतिविद्या करणारे (Stonemasons) – बांधकामासाठी दगडाची रचना करणारे.
अशा प्रकारचे अनेक कारागीरांचा यात समावेश आहे.
विश्वकर्मा हे नाव हिंदू पुराणांमध्ये देवांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या विश्वकर्मा या देवतेवरून आले आहे. त्यामुळे या समाजाचे नाव विश्वकर्मा समाज असे पडले आहे आणि त्यांचे योगदान मुख्यतः हस्तकला, शिल्पकला, आणि निर्माण कार्यात आहे, यांच्या पारंपरिक कौशल्यामुळे त्यांना सरकारकडून PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते. या योजनेद्वारे त्यांना आधुनिक उपकरणे, प्रशिक्षण, आणि वित्तीय सहाय्य मिळते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात सुधारणा घडवून आणता येऊ शकते.
pm vishwakarma id card download
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र म्हणजे काय?
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र हे लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाची ओळख निर्माण करून देण्यासाठी दिले जाते. हे कार्ड डाउनलोड करून लाभार्थ्यांना कर्ज, कौशल्य प्रशिक्षण, आणि अन्य सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयोग होतो. अर्जदारने आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास त्याला हे ओळखपत्र दिले जाते.
ओळखपत्रावरील माहिती
पीएम विश्वकर्मा ओळखपत्रावर खालील माहिती असते.
- लाभार्थीचा फोटो असतो.
- नोंदणी दिनांक (Registration Date)
- लाभार्थीचे नाव (Name of Beneficiary)
- व्यवसायाचे नाव (Trade Name)
- पत्ता (Address)
पीएम विश्वकर्मा ओळखपत्राचा फायदाजाणून घेऊयात.
हे ओळखपत्र लाभार्थ्याला सरकारी योजनांतील सहाय्य मिळवण्यासाठी अधिकृत ओळख प्रमाणपत्र म्हणून वापरता येते. यामुळे लाभार्थीच्या व्यवसायात सुधारणा घडवून आणता येईल आणि सरकारी आर्थिक सहाय्य मिळवण्यास मदत होईल.
PM विश्वकर्मा योजना ही भारत सरकारने पारंपरिक कामगार आणि हस्तकला व्यवसायिकांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. यामध्ये विश्वकर्मा समाजातील कुशल कामगारांना आर्थिक मदत, कौशल्यविकास प्रशिक्षण, तंत्रज्ञान सहाय्य, आणि अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. योजनेच्या अंतर्गत सरकारचे उद्दिष्ट पारंपारिक व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना अधिक स्वावलंबी बनवणे आहे.
योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना एक ओळखपत्र दिले जाते, जे त्यांना विविध लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. या ओळखपत्राद्वारे लाभार्थ्यांना खालील प्रकारचे लाभ मिळू शकतात जसे कि,
- कर्ज सुविधा: विशेष व्याजदरावर कमी कर्ज उपलब्ध.
- कौशल्यविकास प्रशिक्षण: व्यवसाय कौशल्य वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण.
- आधुनिक उपकरणे: कार्यक्षमता सुधारण्यासाठी आधुनिक उपकरणांची मदत.
- मार्केटिंग सहाय्य: उत्पादने बाजारात विक्रीसाठी मदत.
- सुरक्षितता लाभ: विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ.
हे ओळखपत्र लाभार्थ्याचे अधिकृत प्रमाणपत्र म्हणून वापरले जाते आणि याद्वारे त्यांना योजना अंतर्गत विविध सुविधा मिळतात.
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करण्याची पद्धत
तुम्ही अगदी सहज तुमचा मोबाईल क्रमांक वापरून पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करू शकता. या सोप्या पद्धतीने स्वतः कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- ब्राउजर ओपन करा- तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउजर ओपन करा.
- वेबसाईट शोधा- सर्च बारमध्ये PM Vishwakarma असे टाका आणि सर्च करा.
- वेबसाईट ओपन करा- पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या समोर उघडेल.
- लॉगिन करा- होमपेजवरील Login बटनावर क्लिक करा.
- लाभार्थी लॉगिन- Applicant Beneficiary Login वर क्लिक करा.
- मोबाईल क्रमांक टाका. – आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड तिथे टाका.
- OTP टाकून verify करा: आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो योग्य ठिकाणी टाकून Continue बटनावर क्लिक करावे.
- ओळखपत्र डाउनलोड करा- लॉगिन केल्यानंतर, Download your PM Vishwakarma ID Card या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तुमचे ओळखपत्र PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
निष्कर्ष :- pm vishwakarma id card download
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली pm vishwakarma id card download या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. pm vishwakarma yojana योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा लाभ आपल्याला ऑनलाईन प्रकारे भरता येईल.
२. pm vishwakarma yojana या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://pmvishwakarma.gov.in/
हे देखील वाचा :-
Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.
SIP Mutual Fund Calculator 2024 केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना
Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना.
Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन
Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन