sheli palan yojana 2024|शेळी पालन योजना २०२४-१०० शेळी साठी १० लाख अनुदान

sheli palan yojana(शेळी पालन योजना)

आपल्या भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो.आपल्या देशातील खूप लोक शेतीवर अवलंबून आहेत, देशातील तरुण पिढी शेती बरोबर जोडधंदात देखील करत आहेत त्याचा उपयोग आपल्या राज्याला सक्षम बनवण्यासाठी होत आहे. तर आज आपण अशाच एका योजने ची माहिती घेणार आहोत जो जोडधंदा आपण शेती सोबत करूू शकतो.तर आज आपण जाणून घेणार आहोत शेतीपालन योजना. या योजनेअंतर्गत आपले महाराष्ट्र राज्य सरकार अनुदान देत आहे. या अनुदान दोन वर्गामध्ये विभागले गेले आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यासाठी आपले राज्य सरकार 75 %अनुदान देत आहे, तर सर्वसाधारण वर्गातील तरुणांना 50 % टक्के अनुदान मेथी पालन व्यवसायासाठी आपले राज्य सरकार देत आहे.

शेळीपालन हा असा जोडधंदा आहे की जो कमी खर्चा मध्ये जास्त उत्पन्न देतो.अतिशय कमी जागेत आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो.

शेळीपालन व मेंढी पालन हा अत्यंत उत्तम व्यवसाय आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे तसेच कमी जागेमध्ये लवकरात लवकर उभा राहणारा हा व्यवसाय आहे तसेच या व्यवसायाद्वारे आपण शेळीचे दूध किंवा लोकर या द्वारे देखील उत्पन्न मिळू शकतो याद्वारे आपली आर्थिक उत्पन्नात वाढ होईल .स्वतःचा एक हक्काचा नवीन जोडधंदा आपण करू शकतो व या व्यवसायाचे मालक आपण स्वतः बनवू शकतो.

शेळीपालन या योजनेद्वारे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार वेगवेगळे अनुदान देते जर अनुसूचित जाती- अनुसूचित जमातील प्रवर्गातील असेल तर 75 % अनुदान आणि खुल्या प्रवर्गातील असेल तर ५० ℅ अनुदान दिले जाते
या अनुदानाचे स्वरूप आपण जाणून घेऊयात.

  • १०० शेळ्या व ५ बोकड यांच्याकरिता दहा लाख रुपया अनुदान दिले जाते.
  • २०० शेळ्या आणि 10 बोकड यांच्या करिता २० लाख रुपये अनुदान दिले जाते.
  • तसेच ५०० शेळ्या व 25 बोकड यांच्याकरिता 50 लाखाचे अनुदान आपले राज्य सरकार देते.

    तरी माझी वाचकास विनंती आहे की या लेखामध्ये आम्ही शेळीपालनाचे उद्दिष्टे ,शेळीपालनासाठी लागणारी कागदपत्रे शेळीपालनासाठी आपण अर्ज कसा करू शकतो. या सर्व गोष्टींची माहिती आपणांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती आणि शेळीपालन जोडधंदा म्हणून करू इच्छित असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत हा लेख जास्तीत जास्त पोहोचवा ही देखील विनंती.[शेळी पालन योजना]
sheli palan yojana

शेळी पालन योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {sheli palan yojana 2024 Highlight’s }

योजनेचे नावsheli palan yojana 2024 (शेळी पालन योजना २०२४)
योजनेचा फायदा कुणाला होणार आहेआपल्या राज्यातील शेळी पालन करावयाचा आहे अशा सर्व नागरिकांना
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहेअनुसूचित जाती-,अनुसूचित जमातील प्रवर्गातील असेल तर 75 % अनुदान आणि खुल्या प्रवर्गातील असेल तर ५०℅ अनुदान
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जाते.कृषी विभाग
योजनेची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्जाची पद्धतऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेची सुरुवात कोणी केलीराज्य सरकार
योजनेस सुरुवात कधी झाली२०१९

शेळी पालन योजना २०२४|Stand up India loan या योजनेची कागदपत्रे {Documents for sheli palan yojana 2024}

शेळी पालन योजनेसाठी आपल्याला खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • जातीचे प्रमाणपत्र
  • अर्जदार दारिद्र रेषेखालील असेलल तर दाखला
  • बँक पासबुक {Bank Passbook}
  • आधार कार्ड {Aadhar Card}
  • पॅन कार्ड {Pan Card}
  • रहिवासी दाखला
  • अर्जदाराचा जमिनीचा सातबारा (७/१२)
  • अर्जदाराचा जमिनीचा आठ अ (8A)
  • शेळी प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटोज {Passport Size Photograph’s}
  • शिधापत्र {Ration Card}

शेळी पालन योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे(Purpose of sheli palan yojana 2024 ):-

  • शेळी पालन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जो धंदा करण्यास प्रोत्साहन देणे हा आपल्या सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
  • याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • पशुपालन या व्यवसायाला चालना देणे.
  • याद्वारे राज्यातील दूध लोकर व मानस या उत्पन्नामध्ये वाढ होणे होईल आपल्या राज्यातील बेरोजगारी कमी होऊन आपला राज्य आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.
  • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल व जीवन जगण्यास एक नवीन दिशा मिळेल[शेळी पालन योजना]

शेळी पालन योजना २०२४ या योजनेची पात्रता(Eligibility sheli palan yojana 2024) :-

  1. शेळी पालन करू इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणेे आवश्यक आहे.
  2. अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  3. अर्जदाराकडे स्वतःची शेत जमीन असणे गरजेचे आहे जेणेकरून तो शेळ्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करू शकतो.
  4. शेळीपालन व्यवसायासाठी शेळीपालन व्यवसायाची प्रशिक्षणण घेतलेल्या आवश्यक आहे.
  5. अर्जदारा कडे २ हेक्टर शेती जमीन असावी.
sheli palan yojana

शेळी पालन योजना या योजनेची अर्ज करण्याची पध्दत (How to apply for sheli palan yojana 2024):-

शेळी पालनासाठी अर्ज करण्याचा असल्यास आपण दोन पद्धतीने करू शकतो ऑनलाइन आणि ऑफलाइन
आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येईल

  • ऑनलाइन
sheli palan yojana 2024 (शेळी पालन योजना २०२४)


1.वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्याद्वारे आपण अधिकृत वेबसाईटपर्यंतत पोहोचू शकाल.


2.समोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला शेळी व मेंढी पालन योजना यावर क्लिक करायचे आहे.


3.आता आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्यात आपल्याला सर्व माहिती भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.


4.एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

5.अशाप्रकारे आपण ऑनलाइन फॉर्म भरू शकतो.[How to apply for sheli palan yojana 2024]

  • ऑफलाइन

आता बघूया ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत-
1.ऑफलाइन अर्ज करायच्या पद्धतीमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण जिथे राहतो त्या क्षेत्रामध्ये जे जिल्हा कार्यालय आहे तेथे जायचे आहे.


2.तेथील पशुसंवर्धन विभाग किंवा कृषी विभागात जाऊन आपल्याला शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
अर्ज व्यवस्थित भरून वरती दिलेली सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत.


3. तो अर्ज व कागदपत्रे आपल्याला कृषी विभागात जमा करायचे आहे [How to apply for sheli palan yojana 2024]

निष्कर्ष :-

शेळी पालन योजना आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा.शेळी पालन योजने अंतर्गत आपल्या समाजामध्ये अनेक बदल घडवून येणार आहेत सुशिक्षित बेरोजगार शेळी पालन योजनेद्वारे आर्थिक स्थैर्य येणार आहे.आपल्या राज्यातील तरुणान च्या भवितव्यासाठी एक उत्कृष्ट योजना आहे.

असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ-

१.शेळी पालन योजने अंतर्गत कोणाला प्राधान्य दिले जाते?

उत्तर-शेळी पालन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबे महिला बचत गटामध्ये असणाऱ्या महिला अल्पवतील व भूधारक शेतकरी आपल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार शेळीपालन योजनेचे प्रमाणपत्र असणारे नागरिक यांना प्राधान्य दिले जाते.

२.शेळी पालन योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो?

उत्तर-शेळी पालन योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास आपण दोन पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन व ऑफलाईन ऑनलाइन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करून डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत व ऑफलाइन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय मध्ये जाऊन अर्ज व कागदपत्रे जमा करायची आहेत.

३.शेळी पालन योजने अंतर्गत किती अनुदान मिळते?

उत्तर-शेळी पालन योजने अंतर्गत दहा लाख ते पन्नास लाख इतके अनुदान मिळते.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. Stand up India loan


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना. Stand up India loan


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. Stand up India loan