Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, तसेच भाजीपाला उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना” आपल्या राज्यात राबवली जात आहे. महाराष्ट्र हा बागायती क्षेत्रामध्ये अग्रणी असून, भाजीपाला उत्पादनासाठी आपल्याकडे मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा उद्देश ठेवला आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत केंद्र सरकार पुरस्कृत योजनेच्या प्रमाणे अनुदान आणि खर्च मर्यादेत या प्रकल्पाचा खर्च ठरविण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीसमोर सादर करण्यात आला असून, समितीचे अध्यक्ष आणि मुख्य सचिव यांनी त्याला मंजुरी दिली आहे. सादर केलेला प्रस्ताव मान्य झाला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna :-
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना (Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojana) राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्याला शासन निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. या योजनेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna-योजनेचे महत्व जाणून घेऊयात :-
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन क्षेत्रामध्ये आघाडीवर असून, राज्यात फळे व भाजीपाला पिकांची व्यवसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तसेच या उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या २-३ वर्षांपासून शेतकरी निर्यातक्षम आणि विषमुक्त पिकांच्या उत्पादनाकडे अधिक लक्ष देत आहेत. याच पार्श्वभूमीवर नियंत्रित वातावरणात तयार केलेली किड, विषमुक्त व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात उच्च गुणवत्तेची रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna-योजनेची व्याप्ती आणि उद्दिष्टे याबाबत थोडे जाणून घेऊयात :-
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजीपाला उत्पादनासाठी आणि रोपवाटिका स्थापन करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका – नर्सरी योजना (Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery yojna) अमलात आणली जाणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण १००० लाभार्थ्यांची निवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna-योजनेमध्ये काय घटक असतील :-
भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यासाठी खालील आवश्यक सुविधा पुरवणे आवश्यक आहे: शेडनेट, पॉलीटनेल, नॅपसॅक पावर स्प्रेअर, आणि प्लास्टिकचे क्रेट्स. यापैकी, स्थानिक परिस्थितीनुसार पॉलीटनेलची उभारणी ऐच्छिक असणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna-लाभार्थी निवडीचे निकष जाणून घेऊ :-
अ) अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर (१ एकर) जमीन असावी.
ब) रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असावी.
लाभार्थी निवडीचा -प्राधान्यक्रम जाणून घेऊ:-
१. महिला कृषि पदवीधर/पदविका धारक
२. शेतकरी महिला गट
३. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट, जे भाजीपाला उत्पादन करतात.
४. इतर सर्वसाधारण शेतकरी
-रोपवाटीकांचा संभाव्य वापर:-
१) भाजीपाला पिके: टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, शिमला मिरची आणि इतर पिके.
२) फळपिके: पपई, शेवगा इत्यादी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna-योजने अंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण:-
या योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या लाभार्थ्यांना तळेगाव दाभाडे येथील हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर, बारामतीचे कृषि विज्ञान केंद्र आणि पुण्यातील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (MCDC) येथे तीन ते पाच दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna-अर्थसहाय्याचे स्वरूप काय असेल घेऊयात जाणून :-
१) हा प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या धर्तीवर अंमलात आणला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका – नर्सरी (Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery yojna) अंतर्गत प्रकल्पाची उभारणी झाल्यानंतर तपासणी करून ५०% अनुदान वितरित करण्यात येईल, ज्याची कमाल मर्यादा रु. २,७७,५०० असेल.
२) या योजनेत खर्च करताना सर्व वित्तीय नियम, शासन निर्णय, अधिसूचना, आदेश आणि केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित अशा सूचना तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येईल. निधी खर्च करताना भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांच्या निरीक्षणांचा देखील विचार करण्यात येणार आहे.
जाणून घेऊ योजनेच्या अंमलबजावणी बद्दल :-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका – नर्सरी (Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojana) योजना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या माध्यमातून कार्यान्वित केली जाणार आहे.
कशी असेल अर्जाची पध्दत व निवड बघुयात :-
प्रकल्पांतर्गत महाडिबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी (Lottery) पध्दतीने करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna-रोपवाटीका योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – (Nursery yojna Apply Online) :-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका – नर्सरी (Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery yojna) योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा. अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर जा आणि आधार क्रमांकाचा वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.
येथे खाली तुम्हाला पोर्टलची लिंक देत आहोत.
https://mahadbt.maharashtra.gov.in
शेतकरी आपल्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट किंवा ग्रामपंचायतीच्या आपले सरकार केंद्र किंवा सामुदायिक सेवा केंद्र (CSC) यांद्वारे महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकता.
महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन झाल्यावर सर्व आवश्यक वैयक्तिक माहिती तुम्हाला येथे भरायची आहे. त्यानंतर “अर्ज करा” या बटणावर क्लिक करायचं आहे.
तिथे उपलब्ध विविध योजनांमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका – नर्सरी (Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojana) योजनेसाठी “फलोत्पादन” या पर्यायावर क्लिक करा आणि “बाबी निवडा” या बटणावर क्लिक करा.
यानंतर अर्जदाराने आपले तपशील तेथे भरून जतन करणे गरजेचे आहे. अर्ज सादर झाल्यावर तुम्हाला अर्ज सादर झालाय असा संदेश तिथे दिसेल. “ओके” या बटणावर क्लिक केल्यावर तुम्ही पेमेंट पेजवर जाल, जिथे अर्जदार शुल्क भरू शकेल. पेमेंट गेटवेमार्फत पेमेंट केल्यानंतर अर्जदार प्रिंट आउट घेऊ शकतो.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि सूचना PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेल्पलाइन क्रमांक खाली देत आहोत :- 022-49150800
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojna या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}