Site icon yojanaguarantee.com

मुख्यमंत्री वयोश्री योजना.|Mukhyamantri Vayoshri Yojna: हि योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे.

कोणी आणली मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojna):

Mukhyamantri Vayoshri Yojna: महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्वरूपाच्या उपयोगी अशा योजना सुरू करण्यात येत असतात अशीच एक योजना ज्येष्ठ नागरिकांना गृहीत धरून सुरू करण्यात आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojna) आहे.ज्येष्ठांमध्ये वयोमानानुसार येणारे अपंगत्व,अशक्तपणा कमी करण्यासाठी आवश्यक अशी उपकरणे खरेदी करणे व ३००० रोख रक्कम यात ज्येष्ठांना दिली जाते. या योजनेचे लक्ष आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 06 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना जाहीर झाली आहे.

तुमच्या घरात कोणी 65 वर्षांपेक्षा जास्त किंवा 65 वर्षांची व्यक्ती आहे का ? असेल तर मुख्यमंत्री घेऊन आले हवेत मुख्यमंत्री वयोश्री योजना .मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य व आत्मसन्मान मिळणार आहे.65 वर्षे व त्यावरील नागरिकांना त्यांचे रोजचे आयुष्य सुरळीत व सुरक्षित जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासन घेऊन आले आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.

या योजने अंतर्गत वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्व किंवा अशक्तपणा आला असेल, तसेच
काही ज्येष्ठ नागरिकांना चालण्यास असहायता निर्माण होते, या सगळ्याचा विचार करून शासनाने ज्येष्ठांना उपयोगात येणारे साधने ,उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र यांची मदत घेऊन मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचे धोरण आखले आहे.

yojnaguarantee.com

५ फेब्रुवारी २०२४ रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विवध शासन निर्णय घेतले गेले आणि त्यातला महत्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना होय.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 06 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना जाहीर झाली आहे.

हि योजना ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी मार्फत व तसेच शहरी भागात आयुक्तांमार्फत राबविली जाईल, यासाठी आरोग्य विभागाकडून ज्येष्ठांचे सर्वेक्षण आणि चाळणी करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. पात्र अशा लाभार्थींना तीन हजार रुपये थेट असा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

वयोमानानुसार वयस्कर लोकांसाठी शासनाने आणलेल्या या योजनेचा फायदा घेणे म्हणजे आपल्या घरातील जेष्ठ लोकांसाठी त्यांचा आत्मसन्मान मिळवण्या सारखे आहे.या जे योजनेसाठी जेष्ठ नागरिक अर्ज करत आहेत त्या वृत्त व्यक्तींकडे बीपीएल कार्ड असावे,राष्ट्रीय वयोश्री योजना ही सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने 01 एप्रिल 2017 रोजी दारिद्र रेषेखाली लोकांसाठी आर्थिक मदत म्हणून हि योजना सुरुवात सुरू केली आहे.

शुभहस्ते

एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री

प्रमुख उपस्थिती

देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री.

अजित पवार, उपमुख्यमंत्री.

या योजनेसाठी ठळक मुद्दा नमूद करण्यात आला आहे की प्रत्येक जिल्ह्यातील 30 टक्के लाभार्थी या स्त्रीया असाव्यात.उपायुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात येणार आहे ,ज्या समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थींची ओळख राज्य सरकार किंवा केंद्र सरकार प्रशासनाद्वारे केली जाईल त्यानंतर या उपयोगी वस्तू लोकांना प्रदान करण्यात येतील

मुख्यमंत्री वयोश्री योजना(Mukhyamantri Vayoshri Yojna)योजने विषयी थोडक्यात :

काय मिळणार ज्येष्ठांना यमुख्यमंत्री वयोश्री योजना(Mukhyamantri Vayoshri Yojna) योजने अंतर्गत फायदे :

अनुक्रमणिका क्रमांक .उपकरणे
१. श्रवण यंत्र
२.ट्रायपॉड
३.स्टिक
४.व्हील चेअर
५.फोल्डिंग वॉकर
६.कमोड खुर्ची
७.कमोड खुर्ची
८.सर्वायकल कॉलर
.

अशी मिळतील उपकरणे ज्येष्ठ नागरिकांना खालील प्रमाणे देत आहे :

ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सरकारकडून या योजनेमार्फत ज्येष्ठांना विविध प्रकारची उपकरणे जी त्यांना त्यांचे वयोमानानुसार आलेली अशक्तता आणि अपंगत्व यांच्यावर उपचार म्हणून वापरता येतील व तसेच मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावं यासाठी मनस्वास्थ्य केंद्र आणि योगोपचार केंद्रांद्वारे उपचार व प्रबोधन केले जाईल आणि रोख रक्कम तीन हजार रुपये दिले जातील.

  • चष्मा
  • श्रवण यंत्र,
  • ट्रायपॉड,
  • स्टिक व्हील चेअर,
  • फोल्डिंग वॉकर,
  • कमोड खुर्ची,
  • नि- ब्रेस,
  • सर्वायकल कॉलर,
  • लंबर बेल्ट्स
  • तसेच मनशांती केंद्र / प्रशिक्षण केंद्र इत्य्यादी मध्ये सहभागी होता येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना(Mukhyamantri Vayoshri Yojna)पात्रता :

१. योजनेचे लाभार्थी होण्यासाठी पहिले देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे .

२. ज्येष्ठ व्यक्तीला वयोश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत लाभार्थीचे वय 65 वर्षे पूर्ण झालेले पाहिजे.

३. यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा व आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक असणार आहे.

४. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे उत्पन्न वार्षिक दोन लाखांच्या मर्यादेत असावे व वयाचे ६५ वर्षे पूर्ण असावीत.

मुख्यमंत्री वयोश्री योजणे GR इथे वाचा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना(Mukhyamantri Vayoshri Yojna)लागणारी आवश्यक कागदपत्रे – {Necessary Documentation’s Required.}

थोडक्यात पण महत्वाचे –

योजनेचे नाव मुख्यमंत्री वायोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojna)
योजनेची सुरुवात कोणी केली मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे.
राज्य महाराष्ट्र राज्य सरकार
लाभार्थी ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक
उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहायत्ता देणे.
सह्ययता निधी रुपये ३००० मात्र.
योजनेचे बजेट ४८० करोड रुपये
अर्जाची प्रक्रिया क्लिक करा मुख्यमंत्री वयोश्री योजना.|Mukhyamantri Vayoshri Yojna.
वेबसाईट अजून उपलब्ध नाही.
हेल्प् लाईन नंबर १८००-१८०-५१२९
निधी वितरण /अर्थ सहाय्य

थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे रुपये ३००० /- चा मर्यादित निधी वितरण.

२. राज्य शासंद्वारे १००% अर्थसहाय्य .

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ आपण कसे घेऊ शकतो :

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे कारण आत्ताच कॅबिनेट मध्ये या योजनेची विस्तारित स्वरूपात मांडणी झाली आहे तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकता आहेत आमच्या या वेबसाईट द्वारे अर्ज उपलब्ध झाल्यावर सुचित केले जाईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना.|Mukhyamantri Vayoshri Yojna

या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चासह या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यात सध्या जेष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या दरम्यान आहे त्यामध्ये अपंगत्व व मानसिक अस्वस्थाने पीडित सुमारे 15 लाख जेष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल. केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक राज्यात जिल्ह्यात राबविण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येईल.

निष्कर्ष-

प्रामुख्याने राष्ट्रीय वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आणण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत वृद्ध व्यक्तींना त्यांना दैनंदिन जीवनामध्ये लागणारी उपकरणे तसेच लागणारे सहाय्यक वस्तू यासाठी या योजनेची सुरुवात केंद्र सरकार द्वारे करण्यात आलेली आहे. या योजनेचा सर्व खर्च ज्येष्ठ नागरिक कल्याण तिथून केला जाणार आहे. या जे योजनेसाठी जेष्ठ नागरिक अर्ज करत आहेत त्या वृत्त व्यक्तींकडे बीपीएल कार्ड असावे,राष्ट्रीय वयोश्री योजना ही सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने 01 एप्रिल 2017 रोजी दारिद्र रेषेखाली लोकांसाठी आर्थिक मदत म्हणून हि योजना सुरुवात सुरू केली आहे. अतिशय उत्कृष्ट अशी योजना आपल्या सरकारने जेष्ठ लोकांसाठी आणली आहे,जर तुमच्या घरात कोणी जेष्ठa नागरिक असेल तर आजच या योजनेचा फायदा घ्या.

FAQ :

१. मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ?

महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्वरूपाच्या उपयोगी अशा योजना सुरू करण्यात येत असतात अशीच एक योजना ज्येष्ठ नागरिकांना गृहीत सुरू करण्यात आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना.यात प्रामुख्याने 65 वर्षापेक्षा जास्त नागरिकांना आर्थिक सहाय्य व मानसिक साहाय्य दिले जाते

२. या योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?

अर्ज कोठे करावा अजून पर्यंत सरकारने सविस्तर सांगितलेले नाही किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर दिलेले नाही ते उपलब्ध होताच आम्ही ते तुमच्या पर्यंत घेऊन येऊ.

३. मुख्यमंत्री योजनेचे स्वरूप काय आहे ?

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत ६५ वर्ष व त्यावरील पत्र वृध्द लाभार्थ्यांना सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करता येतील

४. काय मिळणार आहे ज्येष्ठ लोकांना मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत?

मुख्यमंत्री वयोश्री योजणे अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा ,श्रवण यंत्र,ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर,फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची,नि- ब्रेस,सर्वायकल कॉलर,लंबर बेल्ट्स तसेच मनशांती केंद्र / प्रशिक्षण केंद्र इत्य्यादी मध्ये सहभागी होता येणार आहे.

वाचा

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }

योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.

जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.

all information given by YOJNA GUARANTEE.COM
Thank you for Watching.

Exit mobile version