Mahila Udyagini Yojana 2024|महिला उद्योगिनी योजना २०२४- आता प्रत्येक घरातील महिला सक्षम होणार.

Mahila Udyagini Yojana(महिला उद्योगिनी योजना)


असे म्हणतात की ज्या देशात महिला सक्षम आहे तो देश सक्षम होऊ शकतो त्यासाठीआपल्या देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आपले सरकार घेऊन आलेले आहे महिला उद्योगिनी योजना(Mahila Udyagini Yojana).
आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांदाला खांदा देऊन चालतात व आपलं घर सांभाळतात परंतु अशा खूप महिला आहेत ज्यांना आर्थिक दृष्ट्या खूप संघर्ष करावा लागतो त्यासाठी सरकार नेहमी त्यांच्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. जेणेकरून महिला आर्थिक दृष्ट सक्षम होऊ शकते.प्रामुख्याने लघुउद्योग म्हणजे छोटे छोटे व्यवसाय ज्यातून आपण अर्ध आर्थिक उत्पन्न मिळू शकतो.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला उद्योगिनी ही योजना एक प्रभावी योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी शासन बिनव्याजी कर्ज देणार आहे.या पैशाचा वापर करून महिला आपले स्वतःचे छोटे छोटे उद्योगधंदे चालू करू शकतात व व्यवसाय क्षेत्रामध्ये पदाक्रम करू शकतात.हे योजनेअंतर्गत महिलांना जास्तीत जास्त तीन लाखापर्यंतचे कर्ज शासन उपलब्ध करून देणार आहे.

या योजनेद्वारे आपल्या अर्थव्यवस्था सुधायला देखील मदत होणार आहे तसेच महिला स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार आहे जेणेकरून त्या त्यांच्या कुटुंबाचे व्यवस्थितरित्या पालन पोषण करू शकतात.

या योजनेद्वारे ज्या महिला अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या आहेत त्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच शारीरिक दृष्ट्या ज्या विकलांग असतील किंवा ज्या महिलेचे पती हयात नाही आहेत अशा विधवा महिला या महिलांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. इतर महिलांना थोडाफार प्रमाणात व्याजदर देऊन कर्ज मिळणार आहे.
प्रामुख्याने ही योजना केंद्र सरकारची आहे परंतु आपले महाराष्ट्र सरकार देखील योजना राबवत आहे.ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांसाठी राबविण्यात येत आहे.योजनेअंतर्गत 30 टक्के कर्जावर सबसिडी देखील दिली जाते जेणेकरून महिला उद्योजकांना आर्थिक मदत होईल व त्या कामात अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकतात.

आज सर्व स्त्रियांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरी करणे शक्य नाही त्यासाठी या छोट्या छोट्या उद्योग धंद्यातून देखील त्या स्वतःच्या गरजा भागवू शकतात.या योजनेमार्फत बँक महिलांना कर्ज देत आहे.या योजनेअंतर्गेचे तीन लाखाचे कर्ज मिळणार आहे त्या कर्जामध्ये 3 टक्के कर्जाचे व्याज केंद्द शासन तर चार टक्के व्याज हे राज्य शासन भरणार आहे. आता बघूया या योजने अंतर्गत कोणते व्यवसाय करण्यासाठी शासन कर्ज देत आहे.

योजनेद्वारे आतापर्यंत 48,000 महिलांनी आपले कुटुंब सावरले आहे.कर्नाटक सरकारने ही योजना सर्वात प्रथम राबवली त्यानंतर केंद्र सरकारने महिला उद्योगिनी योजना संपूर्ण देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला .महिला व बालविकास विभागाकडून ही योजना राबवली जाते [Mahila Udyagini Yojana].

 Mahila Udyagini Yojana

Table of Contents

हिला उद्योजिका योजनेची ठळक मुद्दे (Important Points of Mahila Udyagini Yojana)

योजनेचे नावमहिला उद्योगिनी योजना (Mahila Udyagini Yojana)
योजना कुणासाठी आहेलघु उद्योग करू इच्छीत असणाऱ्या महिलांसाठी
योजने अंतर्गत किती फायदा होणार३ लाख /- मात्र
योजने अंतर्गत किती लघु उद्योगांना मान्यता मिळाली आहे८८
योजना कोणी सुरु केलीभारत सरकार
योजनेसाठी कोण पात्र आहेदेशातील सर्व महिला
योजनेसाठी अर्ज कसा करू शकतोऑफलाईन/ ऑनलाईन
योजनेची अधिकृत वेबसाईटमहिला उद्योगिनी योजना २०२४

महिला उद्योगिनी योजणे अंतर्गत कोणते व्यवसाय करू शकतो?

या योजनेअंतर्गत खालील एकूण ८८ व्यवसायासाठी आपल्याला बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

  • खाद्य तेलाचे दुकान
  • विविध प्रकारच्या खाण्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय
  • सुक्या मासळी स्टोअर करून त्याचा व्यवसाय
  • ड्रायक्लीनचे दुकान
  • डायग्नोस्टिक लॅब रिपोर्ट जनरेशन चा व्यवसाय
  • कोंबडी खाद्य बनविणे
  • रोपवाटिका चालविणे
  • कापड उद्योग
  • दुग्ध व्यवसाय चालू करणे
  • मसाले बनविणे
  • कॉफी किंवा चहा पावडर बनवण्याचा व्यवसाय
  • अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय
  • बेडशीट किंवा टॉवेल बनवण्याचा व्यवसाय
  • ब्युटी पार्लर
  • बांगड्या बनविण्याचा व्यवसाय
  • चटई बनवणे
  • वर्तमान पत्र विकणे
  • मातीची भांडी बनवणे
  • मिठाई बनवणे इत्यादी

महिला उद्योजिका योजनेसाठीच्या पात्रता (eligibility for Mahila Udyagini Yojana )

  1. महिला महाराष्ट्रात राहणे आवश्यक आहे.
  2. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न दीड लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  3. महिलेचे वय 18 ते 45 या वयोगटातील असावे.
  4. विधवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या महिलांसाठी कोणती वयाची अट या योजनेद्वारे ठेवण्यात आलेली नाही.
  5. घेतलेले कर्ज आपल्याला सात वर्ष या कालावधीपर्यंत परत करायचे आहे.

महिला उद्योजिका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (documents for Mahila Udyagini Yojana)

  • दोन पासपोर्ट साईट चे फोटो
  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • महाराष्ट्रात रहिवासी आहे याचा रहिवासी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • बँक पासबुक

हिला उद्योजिका योजनेची उद्दिष्टे (Purpose of Mahila Udyagini Yojana)

  • या योजनेद्वारे महिलांना सक्षम बनविणे हा आपल्या सरकारचा प्रमुख उद्दिष्टे आहे.
  • स्वावलंबी महिला घडविणे हा देखील या योजनेचा उद्दिष्ट आहे.
  • या योजनेअंतर्गत महिलांना जास्त व्याजदर घेऊन से सुरुंग करण्यापेक्षा या योजनेअंतर्गत कमी व्याजदरामध्ये स्वतःचे लघु उद्योग सुरूरता यावे.
  • शारीरिक दृष्ट्या अपंग किंवा विकलांग महिलांसाठी किंवा विधवा महिलांसाठी ही योजना बिनव्याजी आहे त्यामुळे त्यांना या योजनेचा जास्त फायदा होणार आहे जेणेकरून त्या आर्थिक दृष्ट्या अधिक सक्षम होतील व त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावेल.

महिला उद्योजिका योजनेसाठी अर्ज कसा करावा (How to apply for Mahila Udyagini Yojana )

महिला उद्योगिनी योजनेसाठी आपण दोन प्रकारे अर्ज करू शकतो.

1.ऑनलाइन

अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

2.ऑफलाइन
आता बघूयात ऑफलाइन पद्धतीने कसा अर्ज करायचा.

  • या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर आपल्याला आपल्या जवळील बँकेची संपन्न संपर्क साधावा लागेल.
  • बँकेची संपर्क साधून आपल्याला तिथून फॉर्म घेणे गरजेचे आहे तो फॉर्म व्यवस्थित रित्या भरणे हे आपले कर्तव्य आहे.
  • दिलेली सर्व कागदपत्रे त्या फॉर्म सोबत जोडून बँकेत जमा करणे.
  • कर्ज मिळेपर्यंत बँक कडून अपडेट घेत रहाणे महत्त्वाचे आहे.
  • कोणत्याही एनबीएफसी द्वारे देखील आपल्याला या महिला उद्योगिनी योजनेसाठी कर्ज मिळेल.


निष्कर्ष

भारतामध्ये असेही सात पैकी फक्त एकच महिला ही आर्थिक दृष्ट्याक्षम आहे. महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत आपल्या सरकार आपल्या देशातील महिलांना आर्थिक दृश्य सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी 88 वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग हे आपल्यासमोर सरकार घेऊन आले आहे .ज्याद्वारे महिला आपले स्वतःचे छोटे छोटे उद्योग सुरू करून, आपली आपल्या घरासाठी व घरच्यांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. यासाठी बिनव्याजी कर्जदेखील महिलांना मिळत आहे. विधवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती या महिलांना या योजनेअंतर्गत वयाची कुठली अट नसून बिनव्याजी कर्ज मिळत आहे. तर इतर महिलांना देखील कमी व्याजदरामध्ये प्रयोग कर्ज उपलब्ध होत आहे ही योजना आपल्या भारताला सक्षम बनवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना आहे. तरी मी या योजनेद्वारे आपणा सर्वांना या योजनेची उद्दिष्टे, कागदपत्रे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपल्याला हा लेख आवडला असेल अशी आशा करते हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना खरोखर या योजनेची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा लेख पोहोचेल धन्यवाद.

FAQ’S-

१.महिला उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर-महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत सर्व सरकारी व खाजगी बँक आपल्याला कर्ज उपलब्ध करून देतात जसे की पंजाब नॅशनल बँक, सिंध बँक,सारस्वत बँक एनबीएफसी बँक देखील आपल्याला कर्ज उपलब्ध करून देतात त्यामध्ये बजाज फायनान्स देखील आहे.

२.महिला उद्योगिनी योजना कोणी सुरू केली?

उत्तर-महिला उद्योगिनी योजना आधी केंद्र कर्नाटक राज्य सरकारने सुरू केली त्यानंतर ती यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर केंद्र सरकारने ही योजना राबविण्याचे ठरविले आता ही योजना बालविकास मंत्रालयाकडून राबवली जाते.

३.महिला उद्योगिनी योजना अंतर्गत बिन व्याजी कर्ज मिळते का?

उत्तर-हो महिला उद्योगिनी योजना अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शारीरिक दृष्ट्या विकलांग विधवा अशा सर्व स्त्रियांना बिनव्याजी कर्ज मिळते.

वाचा :-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }

योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.

जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना