how to apply for digital property card?-आता घर बसल्या प्रॉपर्टी कार्ड कसे मिळवावे ?

how to apply for digital property card-डिजिटल प्रॉपर्टी कार्ड कसे मिळवावे?

स्वामित्व योजनेच्याअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराची आणि जमिनीची मालकी निश्चित करणारे असे प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) (property card) देण्यात येत आहे. ज्या प्रकारे सातबारा उताऱ्यावर व्यक्तीच्या मालकीची शेत जमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे बिगर शेतजमीन असलेल्या भागामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता आहे, म्हणजे घर आहे की व्यवसायाची इमारत आहे, याची नोंद प्रॉपर्टी कार्डवर असणार आहे.

या योजनेच्याअंतर्गत संपूर्ण देशातील गावांचे ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणातून प्रत्येक घराचा नकाशा तयार केला जाईल आणि त्या घराचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून नागरिकांना दिले जाईल.

आता, डिजिटल स्वरूपातील प्रॉपर्टी कार्ड( (property card) कसे काढायचे, याची सविस्तर माहिती आपण येथे घेऊ.

सरकारने मालमत्तेसंबंधीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि कागदपत्रांचे व्यवस्थापन सुलभ रित्या करण्यासाठी डिजिटल प्रॉपर्टी कार्ड प्रणालीची सुरुवात केली आहे. या डिजिटल कार्डच्या माध्यमातून तुमची प्रॉपर्टी अधिक सुरक्षित आणि व्यवस्थापनासाठी सोपी बनवली गेली आहे.

डिजिटल प्रॉपर्टी (property card)कार्ड म्हणजे काय?

डिजिटल प्रॉपर्टी कार्ड (property card) हे तुमच्या मालमत्तेची नोंदणी करणार एक आधुनिक डिजिटल साधन आहे. यात तुमच्या मालमत्तेची सर्व माहिती सुरक्षित डिजिटल स्वरूपात असणार आहे, ज्यामुळे मालमत्तेची नोंदी आणि संबंधित व्यवहार पारदर्शकपणे करता येतील.

डिजिटल प्रॉपर्टी कार्डचे (property card) प्रमुख फायदे:

  1. सुरक्षितता: कागदपत्रांच्या फिजिकल स्वरूपातील प्रती सांभाळण्याची गरज आता नाही. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे.
  2. कधीही, कुठूनही इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मालमत्तेची माहिती कोणत्याही वेळी पाहू शकता.
  3. प्रक्रियेत पारदर्शकता: डिजिटल प्रक्रियेमुळे व्यवहार पारदर्शक होतील आणि गैरप्रकारांची शक्यता कमी होईल.
  4. वेळ आणि पैसा वाचतो: फिजिकल कागदपत्रांपेक्षा डिजिटल कार्ड मिळवणे अधिक सोपे आणि कमी खर्चिक आहे.

डिजिटल प्रॉपर्टी कार्ड(property card) कसे मिळवावे?

डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्राच्या भूमिअभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे प्रॉपर्टी कार्ड तुम्ही काही सोप्या प्रोसेसने ते डाउनलोड करू शकता.

जर तुम्ही इथे प्रथमच आला असाल, तर सर्वप्रथम “New User Registration” या पर्यायावर क्लिक क्लिक करून तुमची नोंदणी ते करून घ्या. त्यानंतर, “Regular Login” पर्याय निवडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा किंवा “OTP” लॉगिनचा वापर करू तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

New User Registration करताना एक नवीन फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला खाली दिलेले तपशील भरावे लागतील:

  1. वैयक्तिक माहिती – Personal Information
  2. पत्ता माहिती – Address Information
  3. लॉगिन माहिती – Login Information

नोंदणी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल. त्यानंतर, तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉगिन करू शकता.

  1. वेबसाईट वर जा: प्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
  2. लॉगिन करा: तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून OTP द्वारे लॉगिन करा.
  3. माहिती भरा: त्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची माहिती, जसे की जिल्हा, तालुका, गाव आणि CTS क्रमांक भरून शोधू शकता.
    CTS म्हणजे सिटी सर्व्हे नंबर आहे. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर, प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात.
    जर तुम्हाला CTS नंबर माहिती नसेल तर प्लॉट नंबर तुम्ही इथे टाकू शकता.
  4. शुल्क भरा: प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्यासाठी लागणारे शुल्क तुम्हाला इथे भरावे लागेल. (उदा. ग्रामीण भागासाठी ₹45).
    (तसेच शहरी भागासाठी डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी ₹150 ते ₹300 पर्यंत खर्च येतो.) हा शुल्क दर विविध जिल्ह्यांनुसार वेगवेगळा असू शकतो, त्यासाठी तुम्ही संबंधित स्थानिक प्रशासनाच्या वेबसाईटवरून अधिक माहिती याबद्दल मिळवू शकता.
  5. प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करा: सर्व माहिती भरून झाल्यानंतर, तुम्ही डिजिटली साइन केलेल्या प्रॉपर्टी कार्डची PDF डाउनलोड करू शकता.
digital property
digital property

निष्कर्ष:-

डिजिटल प्रॉपर्टी कार्ड(property card) हे तुमच्या मालमत्तेचे असलेले डिजिटल प्रमाणपत्र आहे, जे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त उपयुक्त आहे. त्यामुळे मालमत्तेची कागदपत्रे सांभाळणे पूर्वीच्या काळापेक्षा आता खूप सोपे झाले आहे आणि त्यामुळे गैर प्रकारांना आळा बसला आहे.

FAQ :-


1. डिजिटल प्रॉपर्टी (property card)cकार्ड या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- bhulekh.mahabhumi.gov.in

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.