Ujjwala Gas Yojna 2.0 | (प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0)
आपल्या देशातली स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपले केंद्र सरकार घेऊन आले हे उज्वला गॅस योजना. आजही आपण बघतो ग्रामीण भागातील स्त्रिया स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करतात. चुलीमुळे वायू प्रदूषण होते तसेच अनेक स्त्रियांना दम्याचा त्रास देखील होतो. चुलीसाठी लागणाऱ्या लाकडांसाठी वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात केली जाते. याचे अनेक दुष्परिणाम आपल्या निसर्गावर होत आहे. जसे की वृक्षतोडीमुळे पाऊस कमी पडणे, वाढते प्रदूषण तसेच घरातील लहान मुले आणि स्त्रियांचे आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक लहान मुलांना व स्त्रियांना दम्याच्या आजाराला देखील सामोरे जावे लागत आहे.
यावर पर्याय म्हणून आपले केंद्र सरकार घेऊन आले आहे उज्वला गॅस योजना 1 मे 2016 साली उज्वला गॅस योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस चे मोफत कनेक्शन दिले गेले. गॅसच्या कनेक्शन साठी कुठलीही रक्कम त्यांच्याकडनं घेतली गेली नाही. तसेच प्रत्येक वर्षांना १२ सिलेंडर साठी २००/- रुपयांचे अनुदान देखील जाहीर करण्यात आले.परंतु आत्ताच सरकारच्या नवीन आलेल्या निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2023 पासून उज्वला गॅस धारकांना गॅस सिलेंडरवर चारशे रुपये सबसिडी जाहीर केली. याच योजनेला उज्वला गॅस 2.0 या नावाने ओळखले जाते.
या योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन गॅस साठी लागणारा स्टो आणि वापरासाठी पहिल्यांदा भरलेली सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत 2026 पर्यंत 75 लाख मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्धार आपल्या सरकारने केला आहे.पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाद्वारे या योजनेची राबवणूक होत आहे.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 ची ठळक मुद्दे :- {Important Points of Ujjwala Gas Yojna 2.0}
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 ची ठळक मुद्दे :- {Ujjwala Gas Yojna 2.0 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Ujjwala Gas Yojna 2.0 | (प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | मोफत गॅस सुविधा |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Ujjwala Gas Yojna 2.0 | (प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 1800-266-6696 |
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Ujjwala Gas Yojna 2.0 ):-
- आपल्या देशातील महिलांचे व बालकांचे आरोग्य सुधारावे यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
- ग्रामीण भागात चुली पेटवण्यासाठी झाडे कापली जातात त्यावर या योजनेद्वारे प्रतिबंध लादला जाणार आहे.
- वायु प्रदूषण देखील या योजनेअंतर्गत कमी होणार आहे.
- महिला आपले जीवनमान व राहणीमान सुधारण्यावर या योजनेअंतर्गत भर देतील.
- स्वयंपाक घरात वापरले गेलेले स्वच्छ इंधनामुळे आहार देखील उत्कृष्ट रित्याचा होणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिला व लहान मुले यांच्या आरोग्यावर या योजनेअंतर्गत चांगला परिणाम होणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Ujjwala Gas Yojna 2.0) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- जनधन बँक खाते नंबर
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)[documents for ujjwala gas connection]
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेची पात्रता (Eligibility for Ujjwala Gas Yojna 2.0 ) :-
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड उपलब्ध असावे.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षे असावे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- या योजनेची सबसिडी बँकेत जमा होऊन होणार असल्या कारणामुळे अर्जदार महिलेचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
- उज्वला योजनेअंतर्गत यापूर्वी कोणतेही गॅसचे कनेक्शन अर्जदार महिलेने किंवा तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी घेतलेली नसावे.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Ujjwala Gas Yojna 2.0) :-
उज्वला योजना अंतर्गत आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता जाणून घेऊया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल-
- उज्वला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात गॅस वितरण केंद्रात जावे लागेल.
- इथून आपल्याला उज्वला गॅस चा अर्ज घ्यायचा आहे.
- आता आपल्याला विचारलेल्या सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे व त्यासोबत वरील दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- आता कागदपत्राची योग्य ती तपासणी करून आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
आता जाणून घेऊया ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा भरता येईल-
- आपल्याला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करायचे आहे.
Ujjwala Gas Yojna 2.0 | (प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0)
- आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला आपल्याला हव्या त्या कंपनीचा गॅसची निवड करायची आहे जसे की भारत गॅस, एच पी गॅस.
- आता आपल्याला नवीन जोडणी साठी ऑनलाईन अर्ज यावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर आपल्याला टाइप ऑफ कनेक्शन मध्ये उज्वला गॅसची नाव टाकायचे आहे व त्यासोबत आपल्याला आपले राज्य व जिल्हा सिलेक्ट करायचा आहे.
- आता आपल्यासमोर एक यादी ओपन होईल त्यामध्ये आपल्या घराजवळ जे गॅस वितरण केंद्र आहेत त्याचे नावे असतील.
- आता आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील गॅस वितरण केंद्राचे नाव सिलेक्ट करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर आपल्याला सर्व विचारलेल्या प्रश्नांची माहिती भरायची आहे.
- वरील सर्व कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करायची आहे.
- आता आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने या योजनेचे लाभ घेऊ शकतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-उज्वला योजना अंतर्गत आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.
२. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.pmuy.gov.in/mr/index.aspx
३.प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.0 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर- योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.
४. योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील बीपीएल कुटुंबे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे कुटुंबे आणि मागासवर्गीय कुटुंबीय योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5. या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन तसेच पहिल्या महिन्याची टाकी मोफत मिळणार आहे तसेच प्रत्येक महिन्याच्या टाकी भरणावर ४००/- रुपये सबसिडी मिळणार आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.