Site icon yojanaguarantee.com

National Mission on Natural Farming 2024 नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना !

National Mission on Natural Farming 2024

National Mission on Natural Farming 2024

National Mission on Natural Farming 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने Ministry of Agriculture & Farmers’ Welfare च्या अंतर्गत, केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून, नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग (एनएमएनएफ), अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली.

15 व्या वित्त आयोगापर्यंतचा (2025-26) या योजनेसाठी एकूण रु. 2481 कोटी (भारत सरकारचा वाटा – रु. 1584 कोटी, राज्याचा वाटा – रु. 897 कोटी) इतका खर्च अपेक्षित असणार आहे.

देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्याकरिता, भारत सरकारने Ministry of Agriculture & Farmers’ Welfare च्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगची (एनएमएनएफ) सुरुवात केली आहे.

सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे, हे एनएमएनएफ चे उद्दिष्ट आहे. मिशनची आखणी, शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी आणि बाहेरच्या गोष्टींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत होईल, हे लक्षात घेऊन करण्यात आली आहे.

नैसर्गिक शेतीमुळे मातीचे आरोग्य सुधारेल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक कृषीशास्त्राला अनुरूप लवचिकता वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल. नैसर्गिक शेतीचे हे फायदे आहेत.

पुढील दोन वर्षांत, इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतींमधील 15,000 क्लस्टरमध्ये एनएमएनएफ ची अंमलबजावणी केली जाईल, आणि 1 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन, 7.5 लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती (NF) सुरू केली जाईल.

नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, SRLM / PACS / FPO ई. क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर, शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनांची सहज उपलब्धता करण्यासाठी त्यावर आधारित 10,000 जैव-साधन सामुग्री केंद्रे (BRCs) स्थापन केल्या जातील.

एनएमएनएफ अंतर्गत, कृषी विज्ञान केंद्रे (KVK), कृषी विद्यापीठे (AUs) आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे 2000 नैसर्गिक शेती (NF) मॉडेल प्रात्यक्षिक फार्म म्हणून स्थापन केले जातील, आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी, ट्रेनर्स नियुक्त केले जातील. इच्छूक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रात्यक्षिक फार्ममध्ये NF पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाईल. 18.75 लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापरून किंवा बीआरसी कडून खरेदी करून जीवनामृत, बीजामृत इत्यादी साहित्य तयार करतील. क्लस्टर्समधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी 30,000 कृषी सखी/सीआरपी देखील भरती केले जातील.

शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रणाली आणि सामायिक ब्रँडिंग निर्माण केले जाईल. National Mission on Natural Farming 2024 अंमलबजावणीचे ताजे जिओ-टॅग आणि मॉनिटरिंग ऑनलाइन पोर्टलद्वारे केले जाईल.

स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे, केंद्रीय पशुपालन फार्म/प्रादेशिक चारा केंद्रांवर NF मॉडेलचे प्रात्यक्षिक फार्मचा विकास, स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी जिल्हा/ब्लॉक/GP स्तरावर बाजार जोडणी, यासारख्या योजनांद्वारे APMC (कृषी उत्पन्न बाजार समिती) मंडई, हाट, डेपो या ठिकाणी भारत सरकार/राज्य सरकारे/राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनांचा लाभ दिला जाईल.

याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना RAWE कार्यक्रमाद्वारे आणि NF साठी समर्पित पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमांच्या माध्यमातून National Mission on Natural Farming 2024 शी जोडले जाईल.

नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट आणि उद्देश National Mission on Natural Farming 2024

नैसर्गिक शेतीचे महत्त्व (Importance of Natural Farming)

नैसर्गिक शेतीचे फायदे (Benefits of Natural Farming)

  1. उत्पन्न वाढ
    नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीप्रमाणेच किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादन घेतल्याचे दिसून आले आहे.
  2. उत्तम आरोग्य
    नैसर्गिक शेतीत कोणत्याही कृत्रिम रसायनांचा वापर होत नाही, त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. या शेतीत उत्पादित अन्न अधिक पोषणमूल्ययुक्त असते, त्यामुळे ते उत्तम आरोग्य देते.
  3. पर्यावरण संवर्धन
    नैसर्गिक शेती मातीतील जैविक जीवन सुधारुन मातीचे आरोग्य सुधारते, कृषी जैवविविधता वाढवते आणि पाण्याचा योग्य वापर करते. शिवाय, यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचे प्रमाण कमी असल्याने पर्यावरणावर याचा सकारात्मक परिणाम होतो.
  4. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ
    कमी खर्च, जोखीम कमी आणि उत्पादन टिकण्याची क्षमता जास्त यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. याशिवाय, आंतरपीक पद्धतीमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास देखील मदत होते.
  5. रोजगार निर्मिती
    नैसर्गिक शेतीमुळे ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचे शहरी भागातील स्थलांतर कमी होऊ शकते.

नैसर्गिक शेतीमुळे शेतकरी, पर्यावरण आणि समाज या तिन्ही घटकांसाठी दीर्घकालीन फायदे आहेत.

अधिक माहितीसाठी खाली काही लिंक देत आहोत.

NATIONAL MISSION ON NATURAL FARMING MANAGEMENT AND KNOWLEDGE PORTAL

PIB UPDATES

निष्कर्ष – National Mission on Natural Farming 2024

National Mission on Natural Farming 2024 नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना !, यामध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ’s :-

१. National Mission on Natural Farming 2024 काय आहे ?

उत्तर – देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्याकरिता, भारत सरकारने Ministry of Agriculture & Farmers’ Welfare च्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगची (एनएमएनएफ) सुरुवात केली आहे.

२. National Mission on Natural Farming 2024 Web-Portal ?

उत्तर –https://naturalfarming.dac.gov.in/NaturalFarming/

३. National Mission on Natural Farming 2024 कोणासाठी आहे ?

उत्तर – सर्व भारतीयांसाठी आहे.


पुढील लेख देखील वाचावेत!

Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन

Exit mobile version