Site icon yojanaguarantee.com

Lek Ladki Yojana |लेक लाडकी योजना २०२४.

Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana

LEK LADKI YOJNA

लेक लाडकी योजना{Lek Ladki Yojana} सुरु करण्याचा सरकारचा मानस

मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींना समाजात उच्च व समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी तसेच मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरीव मदत व्हावी, याकरिता शासनाने माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून
नवीन लेक लाडकी योजना सुरु केली आहे. लेक लाडकी योजनेच्या अनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या घरांमध्ये १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये देण्यात येतील.

कुटुंबामध्ये एक मुलगी व एक मुलगा असल्यास या योजनेचा लाभ मुलीला मिळेल.तुमच्या घरात नुकत्याच एका चिमुरडीने जन्म घेतला आहे का? असेल तर लेक लाडकी योजना त्या छोट्या चिमुरडी च भविष्य बदलणार आहे. तिला जन्म झाल्या पासून तर वयाच्या अठराव्या वर्षा पर्यंत टप्याटप्याने पैसे मिळणार आहेत,तर जाणून घेऊया कसे मिळणार आपल्या लाडक्या लेकीला आर्थिक सहाय्य.मुलींचा शिक्षणाचा स्तर व मुलींचा जन्मदर वाढवा, यासाठी माझी कन्या भाग्यश्री (MAZI KANYA BHAGYASHRI) ऑगस्ट २०१७ मध्ये सुरु केली होती. त्यामध्ये एका मुलीवर श्स्राक्रिया केल्यास ५०,००० रुपये मात्र त्या मुलीच्या नावावर २५,००० रुपयाच्या दोन ठेव पावत्या दिल्या जात होत्या, तसेच दाम्पत्यास एक मुलगा व एक मुलगी झाल्यास हा लाभ दिला जात नव्हता.

लेक लाडकी योजना मुलीच्या उज्वल भविष्यासाठी एक क्रांतिकारी योजना ठरणार आहे. यावर पुनर्विचार होऊन शासनाने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी तसेच मुलींची शिक्षणातील टक्केवारी वाढवण्यासाठी प्रोत्साहन व होणाऱ्या मुलींना शिक्षणास मदत व्हावी , या हेतूने हि नवीन योजना सुरु केली आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार घेऊन आले आहे ” लेक लाडकी योजना ” जर तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. लेक लाडकी या योजने अंतर्गतपिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबात जर मुलीचा जन्म झाला तर टप्या टप्याने मुलीला अनुदान देण्यात येणार आहे . आपल्या राज्यातील मुलींचे सक्षमीकरण करणे हे मुळ उदिष्ट लेक लाडकीयोजने अंतर्गत पूर्ण केले जाणार आहे.

लेक लाडकी योजनेमुळे मुलीचा मृत्युदर कमी करण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे.या योजनेमुळे मुलींचे बाल विवाह कमी होऊन पालक मुलींच्या शिक्षणा वर भर देणार आहेत. आर्थिक मदत झाल्यामुळे देशातील मुलींचे कुपोषण कमी करण्यावर राज्यसरकार चा भर या योजने अंतर्गत असणार आहे.

पात्रता काय आहे लेक लाडकी योजने साठी –

{ELIGIBILITY CRITERIA FOR LEK LADKI YOJNA}:

पिवळे रेशन कार्ड धारक किंवा केशरी रेशन कार्ड धारक लेक लाडकी योजने चा फायदा घेऊ शकणार आहेत.

का सुरु केली लेक लाडकी योजना(Lek Ladki Yojana)-

WHY GOVERNMENT STARTED LEK LADKI YOJNA:

१. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवणे.
२ मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
३. मुलीचा मृत्युदर कमी करणे.
४. बालविवाह रोखणे.
५. मुलींचे कुपोषण कमी करणे.
६. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य करण्यासठी प्रोत्साहन देणे.

टप्या टप्याने कसे मिळणार पैसे पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक लाभार्थीला
मुलीच्या

जन्मानंतर – ५००० मात्र,
इयत्ता पहिली – ६००० मात्र,
इयत्ता सहावी – ७००० मात्र,
इयत्ता अकरावी – ८००० मात्र,
वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर – ७५००० मात्र.

अशा प्रकारे १,०१,००० मात्र एवढी रक्कम लेक लाडकी या योजने अंतर्गत पिवळ्या केशरी रेशन कार्डधारकाला मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेचे(Lek Ladki Yojana) फायदे –
{BENEFITS}:

१. लेक लाडकी योजने च्या अंतर्गत पात्र मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी मदत दिली जाते.
२. मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा पाच हजार रुपये दिले जातात.
३. इयत्ता पाहिलीत गेल्यावर पाच हजार (५०००) रुपये मात्र दिले जातात.
४. मुलगी सहावी इयत्तेत गेल्यानंतर सहा हजार रुपये मात्र (६०००) दिले जातात.
५.मुलगी अकरावी इयत्तेत गेल्यानंतर अकरा हजार रपये मात्र दिले जातात.
६. त्याच प्रमाणे मुलगी १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला ७५,००० रुपये मात्र यानुसार एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते.

अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने पैसे मिळाल्यामुळे आपल्या मुलींचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे.हे टप्पे टप्प्याने मिळणारे पैसे आपण मुलींचे शिक्षणासाठी वापरू शकतो त्यामुळे मुलींचे उज्वल भविष्य घडवण्यास व भारतामध्ये मुलीहे टप्पे टप्प्याने मिळणारे पैसे आपण मुलींचे शिक्षणासाठी वापरू शकतो त्यामुळे मुलींचे उज्वल भविष्य घडवण्यास व भारतामध्ये मुलींचे प्रमाण वाढवण्यास उपयोग होणार आहे.

शासन निर्णय. {GR DOWNLOAD HERE}

अर्जाची pdf. {FORM PDF DOWNLOAD HERE}

अति व शर्ती : {TERMS AND CONDITION’S for Lek Ladki Yojana} :
१. १ एप्रिल २०२३ रोजी आणि त्या नंतर जन्माला येणाऱ्या १ किंवा २ मुलीना पैसे मिळतील.
२. इयत्ता सहावी ला पहिले अपत्य असेल किंवा इयत्ता पहिली ला दुसरे अपत्य असेल तर आईवडीलाचे कुटुंब नियोजन शस्रक्रिया प्रमाणपत्र आवश्यक.
३. कुटुंब नियोजन शस्रक्रिया प्रमाणपत्र सादर केल्या नंतर जुळी असल्यास दोन्ही मुलींना भेटणार लाभ भेटेल.
४. महाराष्ट्र राज्याचे रहीवाशी असणे आवश्यक.
५. बँक खाते महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक.
६. लेक लाडकी योजनेसाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
७. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.

प्रकिया काय आहे लेक लाडकी योजनेची- {PROCESS TO JOIN LEK LADKI YOJNA} :

१. तुमच्या घरात १ एप्रिल २०२३ ला मुलीने जन्म घेतला असेल तर तिला जन्मानंतर ५०००/-मिळणार आहेत त्यासाठी पालकांनी आपल्या मुलीचा जन्म दाखला,वार्षिक उत्पन १ लाख पेक्षा कमी किंवा १ लाख असल्याचा उत्पन्नाचा दाखला,
मुलीचे आधार कार्ड,पालकाचे अधार कार्ड,बँकेचे पासबुक,पासपोर्ट साईज फोटो,रेशन कार्ड, पालकांचे कुटुंब नियोजन शस्रक्रिया प्रमाणपत्र आपल्या जवळच्या अंगणवाडीत घेऊन जाणे.
२. अंगणवाडी सेविका आपल्या कागदपत्राची प्राथमिक पडताळणी करतील.
३. अंगणवाडी सेविका online अर्ज भरून देतील.


काय कागदपत्रे आवश्यक आहेत
{LEK LADKI YOJNA DOCUMENTS LIST} :
१. जन्म दाखला {BIRTH CERTIFICATE}
२. उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख असावे किंवा त्या पेक्षा कमी) {INCOME CERTIFICATE}
३. लाभार्थीचे आधार कार्ड {APPLICANT AADHAR CARD}
४.पालकचे आधार कार्ड {PARENT’S AADHAR CARD}
५.बँकेचे पासबुक {BANK PASSBOOK}
६.रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी) {RATION CARD}
७.मतदान ओळखपत्र (शेवटच्या हप्त्यासाठी) {VOTER’S ID]
८.सम्बन्धित टप्यावरील लाभाकरिता शाळेचा दाखला {BONAFIED}
९.पालकांचे कुटुंब नियोजन शस्रक्रिया प्रमाणपत्र {FAMILY PLANNING SURGERY CERTIFICATE}
१०.अर्जदारास शेवटच्या लाभासाठी अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणा पत्र देणे गरजेचे आहे. {UMARRIED CERTIFICATE OF BENEFICIARY}

लेक लाडकी योजने साठी १८ वर्षानंतर जमा करायची कागदपत्र-
{LEK LADKI YOJNA DOCUMENTS LIST AFTER 18 YEAR’S OF AGE} :
१.मतदान ओळखपत्र
२.अविवाहित असल्याच मुलीचे स्वयं घोषित पत्र

लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घ्यावा.
{HOW TO TAKE BENEFITS OF LEK LADKI YOJNA} :

१. लेक लाडकी योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे द्यावा .
२. अंगणवाडी सेविका ऑन लाईन फॉर्म भरून देणे गरजेचे आहे.
३. अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यासेविका कागदपत्राची पडताळणी करतील
४.१ महिन्याच्या आत काही कागदपत्र राहिले असतील तर त्याची कागदपत्राची पूर्तता करावी.

FAQ: LEK LADKI YOJNA 2024 MAHARASHTRA APPLICATION FORM DOCUMENTATION AND ELIGIBILITY CRITERIA.

१ . लेक लाडकी योजना म्हणजे काय ?
लेक लाडकी योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे पुढचे रूप आहे.

२. लेक लाडकी योजनेसाठीची वयोमर्यादा काय आहे ?
लेक् लाडकी योजनेसाठी ०१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलीचे पालक अर्ज करू शकतात तसेच ०१ एप्रिल २०२३ याच्या आधी जन्मलेल्या मुलीचे अर्ज ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत करू शकतात.

३. लेक लाडकी योजने ची फॉर्म भरण्याची लिंक कुठे आहे ?
लिंक वर देत आहे त्यावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा.

४.लेक लाडकी योजनेचे पैसे कसे मिळणार?
मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा पाच हजार रुपये दिले जातात.
इयत्ता पाहिलीत गेल्यावर पाच हजार (५०००) रुपये मात्र दिले जातात.
मुलगी सहावी इयत्तेत गेल्यानंतर सहा हजार रुपये मात्र (६०००) दिले जातात.
मुलगी अकरावी इयत्तेत गेल्यानंतर अकरा हजार रपये मात्र दिले जातात.
त्याच प्रमाणे मुलगी १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला ७५,००० रुपये मात्र यानुसार एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते.

 ५.अर्ज कुठे करावा?

लेक लाडकी योजना आपल्या जवळील अंगणवाडी जाऊन अंगणवाडी सेविके जवळ अर्ज व सर्व कागदपत्रे जमा करावी करावा.

निष्कर्ष :

प्रिय वाचक आम्ही दिलेल्या या पोस्ट मध्ये लेक लाडकी योजनेबद्दल माहिती देण्यात आली आहे जे पालक आपल्या पाल्याचा अर्ज करू इच्छितात त्यांना अर्ज कसा करावा , कुठे करावा, लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे , पात्रता, नियम, अटी व शर्ती आम्ही दिलेल्या आहेत.
आम्ही आशा करतो तुम्हाला हा आमचा लेख नक्कीच आवडेल व फॉर्म भरताना तुम्हाला उपयोगी पडेल , तुमच्या मित्रांना/ आप्तेष्टांनाही हि उपयोगी पडेल असा हा लेख त्यांना हि पाठवा आपलेच YOJNA GUARANTEE.COM

वाचा-

योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}

Lek lakdi yojna 2024 – Lek ladki yojna website Online apply
information in marathi pdf form age limit criteria benefits documentation list
all information given by YOJNA GUARANTEE.COM
Thank you for Watching.

Exit mobile version